सायनस बलूनोप्लास्टी बद्दल कोणाला माहिती आहे का?

Submitted by sneha1 on 8 July, 2015 - 12:32

नमस्कार!
कित्येक वर्षांपासून सायनस आणि अ‍ॅलर्जी चा त्रास चालू आहे. अ‍ॅन्टिबायोटिक्स घेऊन कंटाळा आल्यावर ENT कडे जाऊन स्कॅन करून घेतला. त्याच्या मते septum deviation (मधला नाकाचा पडदा सरकणे) आहे आणि turbunates enlarge झाल्या आहेत. त्याने आधी nebulizer वापरायला सांगितला.. त्याने आराम पडतो पण तरीही कधीकधी त्रास होतो आणि ते रोज करायचा कंटाळा येतो. दुसरे ऑप्शन म्हणजे सायनस बलूनोप्लास्टी..ह्याच्यामधे नाकामधे बलून सरकवतात आणि पडदा मूळ जागी आणतात. आणि turbunates ना लेसर ने जाळणे. ह्या दोन्ही ऑफिस प्रोसिजर्स आहेत.. शेवटचे ऑप्शन सर्जरी जे मी करणार नाही..
तर कोणी हे केले आहे का? फायद्याचे आहे का? माझे नेती वगैरे सगळे प्रकार करून झालेत.
धन्यवाद!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साइनससाठी antibiotics ?
एखाद्या वासाची ,तापमान,आर्द्रतेची ती रिअॅक्शन असते. अॅलपॅथिकवाल्यांना सर्वच बाबतीत समजतं अशी ते समजूत करून देतात.ज्या रोगांवर ते खटाटेप करतात आणि आपला पैसा वाया घालवतात ( कबुल करत नाहीत )ती दुखणी होमिओपथी चुटकिसरशी सोडवते.
( मी कोणताही डॅाक्टर नाही ).

मी सुध्दा सायनस च्या कटकटीला सामोरं जातोय.. डॉकटरांनी ऑपरेशन चा एक धोका पण सांगितला, की नाकाच्या याच भागातून काही अशा नर्व्हज जातात ज्या पापणीच्या हालचालींना नियंत्रित करतात. ऑपरेशन वेळी जर त्यांना चूकून धक्का लागला ... तर .. आपण नको तेव्हा डोळा मारू लागतो. आणि या भीतीने मी परत औषधोपचारवर उतरलोय.

septum deviation हा बहुतांशी अनुवांशिक किंवा अपघाताने होतो. यात प्रामुख्याने दोन नाकपुड्यापैकी एकाचा मार्ग अरुंद किंवा बंद होतो. आपल्या सायनसमध्ये जी हवा खोळती असते त्यामुळे चेह-याचे एकूण वजन कमी असते मात्र नाकाचा पडदा सरकल्याने सायनस त्रास वाढतो आणि ओघाने डोके,नाक जड वाटू लागते. अशा वेळी योग्य निदान अत्यंत महत्वाचे आहे.बलूनोप्लास्टी बाबत माहिती नाही .मुळ पडदा जागेवर येवू शकतो याबाबत ठाम नाही.
स्कॅन रिपोर्ट मध्ये नेमके काय दिसते त्यावरच पुढचा उपचार अवलंबून आहे . चांगले तज्ञ गाठा सर्जरीबाबत मतांतरे आहेत. (सर्जरीमध्ये वाढलेला अतिरिक्त भाग काढला जातो म्हणजे श्वसनाचा मार्ग मोकळा केला जातो) व्ययक्तिक अनुभव -मी सेप्टोप्लास्टी (एन्डोस्क्पोपिक सर्जरी) नंतर सायनस प्रॉब्लेमपासून १०० % मुक्त झालो आहे.
मात्र सर्जरीनंतर १५ ते २५ दिवस आराम आणि तज्ञांच्या सल्ल्यान्युसार उपचार हे अत्यंत महत्वाचे. सर्जरीनंतर दुस-या दिवशी घरी सोडत असले तरी दोन आठवडे पेनफूली घालवावे लागतील.

तुम्ही मुंबईला आहात का?

आम्ही इथे योगा शिकवतो. माझ्याकडे सायनसच्या अनेक तक्रारी येतात. नेती ही क्रिया नंतरची झाली. पण त्यापुर्वी कपालभाती आणि उज्जेयी करुन पाहिली का पहाटे पहाटे? सुरवातीला रात्री थोडे कमी आणि लवकर जेवण करायचे. फरक पडतोच पडतो. आणि सातत्या पाहिजे. दोन दिवसात फरक पडणार नाही पण एक दोन महिन्यात नक्कीच फरक पडतो. फक्त योग्य व्यक्तिकडून हे आधी शिकायला हवे.

मी अमेरिकेत आहे..आणि इथे होमियोपॅथी शक्य नाही मला.
कपालभाती काही दिवस करून बघीतली..उज्जेयी माहित नाही Happy

आणि सर्जरी मला करायची नाही..म्हणूनच बाकीचे उपाय आधी बघायचे आहेत मला..

You can get homeopathic treatment and medicines here in USA . I am myself homeopath in fremont CA . We get medicines in shops like whole food or vitamin shoppee.

काल मलाही सर्दीचा त्रास झाला होता. (सायनस चा). डोळे लाल झालेले आणि तसाच आज अंघोळ करून अर्जंट मीटींगसाठी गेलो. जातानाच जबरदस्त अ‍ॅटॅक आला. कालच्या पेक्षा मोठा. कसाबसा पोहोचलो खरा, पण आपुले मरण पाहीले म्यां डोळा अशी अवस्था झाली.

सत्तराव्या+ वर्षी तुम्ही मी टिंग वगैरे करू शकता, हे वाचून तुमच्याबद्दलच्या आदर दुणावला. काळजी घ्या. तुमच्यासारख्या ज्येष्ठांची देशाला गरज आहे.