पाहिली काल आग डोळ्यांनी

Submitted by वैभव फाटक on 4 July, 2015 - 06:47

पाहिली काल आग डोळ्यांनी
स्वप्न केले महाग डोळ्यांनी

संपली बोलण्यातली ताकद
तू अता हक्क माग डोळ्यांनी

गुंगले मैफिलीत सारेजण
गायला मी 'बिहाग' डोळ्यांनी

लागले जर मनास या चटके
दिसत नाहीत डाग डोळ्यांनी

सांगते नार या समाजाला
थांबवा पाठलाग डोळ्यांनी

वैभव फाटक

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>गुंगले मैफिलीत सारेजण
गायला मी 'बिहाग' डोळ्यांनी<<<

हा शेर, जमीन आणि रदीफ आवडली.

पाठलाग शेर छानच, कदाचित थोडा अधिक कंगोरेदार होऊ शकला असता असे वाटले.

.