Submitted by vilasrao on 3 July, 2015 - 05:30
जपून ठेवली सुखे असे मकान दाखवा
विकेल जे सुखे मला दुकान दाखवा !
कठीण कातळातला झरा उगाच आटतो
मला बळेच म्हणतो जरा तहान दाखवा !
उदास ही नभे अजून सांगतील का मला?
असेल पंख छाटले तरी उडान दाखवा !
नकोत बंधने मला न कायदा तुझा मना
खरेच पाळले कुणी असा 'महान 'दाखवा !
तहानभूक जेवढी दान आज हेच तुझे
न संपते खरे जरी अदेयदान दाखवा !
विलास खाडे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा