खूप दिवसांनी फेसबूक प्रोफाईलवरची धूळ झटकत, विस्मरणात गेलेला पासवर्ड आठवत, डिअॅक्टीवेट झालेल्या प्रोफाईलला अॅक्टीवेट केले. प्रोफाईलमध्ये कधीकाळी मौजमजेसाठी जमा केलेले सवंगडी कसे आहेत, त्यांची खुशाली घेऊया म्हणून थोडीफार चाळाचाळ केली. तर दहापैकी सात जणांचे प्रोफाईल पिक्चर सप्तरंगी रंगात नटलेले दिसले. फेसबूकवरचेच एखादे फॅड म्हणत इग्नोर करावेसे वाटले, पण उथळ गोष्टींना थारा न देणार्या काही मित्रांनी देखील या ऊपक्रमात सहभाग घेतला होता ते पाहून हे काहीतरी स्पेशल आहे असे जाणवले. चारचौघांना विचारले तर कोणालाही ठामपणे काही सांगता आले नाही. काय ते प्राईड प्राईडसाठी म्हणत थातुर मातुर उत्तर दिले. थोडीफार शोधाशोध करता करता हाताला खालचा फोटो, नेमके कसले प्राईड आणि आपल्या प्रोफाईलला रंगीन करणारे नक्की कश्याचे समर्थन करत होते ते समजले. अर्थात जाणतेपणी वा अजाणतेपणी, दिखावा करायला वा मनापासून हे त्यांनाच ठाऊक.
तर यामागचे कारण असे की नुकतेच अमेरीकेत समलिंगी विवाहांना कायद्याने मान्यता मिळाली. तर ज्यांचा या कायद्याला पाठिंबा आहे त्यांनी तो दर्शवायला आपले प्रोफाईल पिक्चर रंगीत पट्ट्यांत रंगवायचे होते.
सेक्शुअल ओरिएंटेशन - Sexual orientation (मराठीत काय म्हणतात देव जाणे)
पण हा शब्द मला पहिल्यांदा ऑर्कुट प्रोफाईलवर समजला. त्यातील नाव-गाव-फळ-फूल माहितीत आपापले सेक्शुअल ओरिएंटेशन सुद्धा लिहायचे होते. गंमतच वाटली होती. आणि त्यापेक्षा जास्त गंमत तेव्हा वाटली होती जेव्हा काही महाभागांनी आम्ही "स्ट्रेट" आहोत असे प्रोफाईलमध्ये नमूद केले होते. आता ही काय सांगायची गोष्ट आहे का?
.. पण बघता बघता दिवस बदलले, आणि आता ही सांगायची गोष्ट असू शकते असे माझे मतपरिवर्तन झालेय.
असो, तर मग मला माझ्या त्या सर्व फेसबूक बंधूंची फिरकी घेण्याचा मोह झाला.
एकाला सहज विचारले, काय रे तुझे सेक्शुअल ओरिएंटेशन काय आहे?
तर गडी चिडला!
लगेच मला समजून चुकले की याने आपले प्रोफाईल पिक अजाणतेपणे रंगवले आहे.
त्याला म्हटले काही नाही झमन्या, अर्ध्या गावाची तुला माहीती नसते आणि सगळीकडे पुढे पुढे करण्याची घाई असते.
माहिती देताच त्याने घाईघाईत आपले प्रोफाईल पिक्चर बदलले.
हाच प्रयोग आणखी दोघाचौघांवर केल्यावर एक जण असा निघाला ज्याला यामागचे कारण माहीत होते. तसेच आपण अश्या संबंधांना आणि त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्याला सपोर्ट करतो असेही तो म्हणाला.
त्याला देखील मी विचारले, "खरेच नुसता सपोर्ट करतोस की तू देखील त्यातलाच एक आहेस." .. तर हा देखील चिडला! जरा जास्तच चिडला.
थोडक्यात त्याचा सपोर्ट किती पोकळ होता ते मला समजून चुकले. जे स्वत:ला कोणी समजले तर त्याला ती एक शिवी वाटते अश्यांना तो कसा मनापासून सपोर्ट करणार होता.
पुढे दोनेक दिवसातच हळूहळू काही प्रोफाईल पिक्चर बदलताना दिसले. बहुतेक खरे कारण समजल्याने काही जणांनी ओशाळून बदलले असावेत, वा काही जणांनी दाखवला तेवढा सपोर्ट पुरेसा म्हणत बदलले असावेत. तर काही जणांचे प्रोफाईल पिक्चर आजही रंगीत पट्ट्यात दिसत आहेत. खंबीर पाठिंबा!
अर्थात, मला स्वत:ला देखील अजून ठामपणे मत बनवता येत नाहीये की या प्रकारचे संबंध योग्य की अयोग्य? नैसर्गिक की अनैसर्गिक? आजार, विकृती की फक्त एक प्रकारचे सेक्शुअल ओरिएंटेशन..
पण याला किमान अंश भर सपोर्ट करणार्यांना मला एक विचारावेसे वाटते, आपल्या देशात आजही बरेच ठिकाणी आंतरजातीय वा आंतरधर्मीय प्रेमविवाह म्हणजे फार मोठा सामाजिक अपराध ठरवला जातो. या अपराधाची शिक्षा तो समाजच देतो. वेळप्रसंगी पोटच्या पोरांना ठार मारण्यापर्यंत मजल जाते. तर असल्या समलिंगी विवाहांना समर्थन देण्याअगोदर आंतरजातीय प्रेमविवाहांना समर्थन देत या देशातील प्रत्येकाला त्याच्या मर्जीने विवाह करता यावा यासाठी चळवळ उभारावी असे नाही का वाटत?
समलिंगी विवाह आणि आंतरजातीय
समलिंगी विवाह आणि आंतरजातीय विवाह या दोहोंमध्ये आपल्या पसंतीच्या व्यक्तीशी विवाह करण्याची मुभा नसणे वा त्याला विरोध होणे हे बेसिक साम्य नाहीये का?
नाही समलैंगिक विवाह मान्य
नाही
समलैंगिक विवाह मान्य आहे, पण समलैंगिक आंतरजातीय विवाह मान्य नाही. अशा वेळी ही तुलना रास्त ठरली असती.
प्रशू, समलैंगिक विवाह मान्य
प्रशू,
समलैंगिक विवाह मान्य आहे, पण समलैंगिक आंतरजातीय विवाह मान्य नाही.. याचाच अर्थ भिन्नलिंगी आंतरजातीय विवाहही मान्य नाही.. किंबहुना एकूणच आंतरजातीय विवाह मान्य नाही..
अन्यथा कोणी आपल्या मुलांसमोर अशी अट नाही ठेवणार की आंतरजातीय विवाह करायचा असेल तर समलैंगिक केलास तरच परवानगी देऊ..
वर कोणीतरी कुठेतरी एका
वर कोणीतरी कुठेतरी एका प्रतिसादात लिहिलेले की आंतरजातीय विवाह करणे हा कायद्याने गुन्हा नाही, त्याला आधीपासूनच मान्यता आहे..
पण हा कायदा एका वेशीपलीकडे गुंडाळला जातो..
समलिंगी विवाहाचा कायदा झाला तरी अपवाद वगळता हालच होतील त्या जोडीचे..
असो, याचा अर्थ तो कायदा होऊच नये असे नाही. तसेच मी समलिंगी संबंधाचा समर्थक वा विरोधक या दोन्हीपैकी अजूनपर्यंत कोणीही नाही.
पण आंतरजातीय विवाहांचा मात्र नक्कीच कट्टर समर्थक आहे, कारण कुठल्यातरी जातीपातीच्या अनावश्यक रेषा ओढून कोणाला वेगळे करायचा अधिकार कोणालाही नाही.
माझा लेख म्हणजे माझ्या मनातील विचारच असतात, त्यामुळे लेखाच्या शेवटी साहजिकच हि तुलना झालीच की हा तोच समाज आहे जो आंतरजातीय विवाह म्हणजे आजही काहीतरी भयंकर समजतो आणि दुसरीकडे फेसबूकवर जाणतेपणी असो वा अजाणतेपणी समर्थन देत समलिंगी विवाहांमध्ये व्यक्तीस्वातंत्र्य शोधतो.
एक संबधित किस्सा - कॉलेजपासूनचे ६ वर्षे प्रेमप्रकरण असलेल्या माझ्या मित्राने त्याच्या प्रेयसीशी लग्न केले नाही कारण त्यांच्या जातीत भेद होता. त्यात तो सोकॉलड उच्चवर्णीय असल्याने त्याला घरच्यांच्या विरोधात जाऊन तिच्याशी लग्न करता आले नाही. किंबहुना फारसे हातपायही त्याने झाडले नाहीत, त्यावरून मी त्याला बरेच सुनावूनही झाले आहे.. तर हो, त्याचाही प्रोफाईल पिक त्या दिवशी सप्तरंगात नटलेला मला दिसलेला.. मुद्दामच त्याला या लेखाची लिंक मेल केली आहे
समलिंगी विवाह झाले आहेत कि
समलिंगी विवाह झाले आहेत कि भारतीयांमधे सुद्धा..सुखी आहे ते जोडप सुद्धा..
अमेरिकेत जरी समलिंगी विवाहाला कायद्याने मान्यता दिली असणार तरी काही लोक असणारच की विरोधात..भलेही आपल्याएवढा विरोध नाही ( कारण तिकडे चालणारा व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार आणि आपल्याइकडे मरेपर्यंत कुटूंबाशी संलग्न असणे ).
आणि आजकाल आपल्याइकडे सुद्धा आंतरजातीय विवाह सर्रास होताहेत.. काही अपवाद आहेच आहे.. शेवटपर्यंत असणार. कायदा बदलल्याने लोकांची मानसिकता तर बदलणार नाही ना याबाबतची.. तसच आहे.. आजकाल आंतरजातीय विवाह होऊ लागलेले आहेत हा बदल पुर्णपणे पचवायला आपल्यासारख्या लोकांना जरा वेळ द्या पुढच पण स्विकारल्या जाईलच..
आता गाडी कुठल्या स्टेशनात
आता गाडी कुठल्या स्टेशनात आहे? झुमरूतलैया आहे असे वाटते!!
चिकमंगळूर
चिकमंगळूर
९८
९८
99
99
१००
१००
१०१
१०१
स्त्रि आणि पुरुष ह्यांच्यामधे
स्त्रि आणि पुरुष ह्यांच्यामधे लग्न करुन देण्ययाची पद्दत ही समाजाने अर्थात मानवानेच सुरु केली. त्यापुर्वी समलिंग स्त्री आणि पुरुष सुद्धा असतात हे कदाचित त्यावेळीसच्या समाजाला माहिती नसेल. किंवा स्त्रि आणि पुरुष ह्यांच्या अनेक अनेक पिढ्यानंतर कुठेतरी काहीतरी चुकले असेल आणि त्यातून समलिंग स्त्रि पुरुष जन्माला आले असतील तोवर लग्न ही पद्धत अमलात आलेली असेल. लग्न करणे ही जर मानवाने सूरु केलेली पद्धत असेल तर मग समलिंग लोकांनी लग्न करणे ही अजून एक पद्दत मनुष्य सुरु करत आहे. काहींचे म्हणजे आहे मग त्यांना मुलबाळ कसे होईल. जगभरात इतक्या मोठ्या प्रमाणात अबॉर्शन होतात त्याचा आधी विचार करा!!!!
स्त्रि >>> ????
स्त्रि >>> ????
>>>किंवा स्त्रि आणि पुरुष
>>>किंवा स्त्रि आणि पुरुष ह्यांच्या अनेक अनेक पिढ्यानंतर कुठेतरी काहीतरी चुकले असेल आणि त्यातून समलिंग स्त्रि पुरुष जन्माला आले असतील तोवर लग्न ही पद्धत अमलात आलेली असेल<<<
उलटेही झाले असेल एखादवेळी! समलिंगी स्त्री / पुरुषांमुळे कदाचित भिन्नलिंगी स्त्री, पुरुष निर्माण झाले असतील.
उलटेही झाले असेल एखादवेळी!
उलटेही झाले असेल एखादवेळी! समलिंगी स्त्री / पुरुषांमुळे कदाचित भिन्नलिंगी स्त्री, पुरुष निर्माण झाले असतील.>> उलटे शक्यच नाही आहे कारण समलिंगी कुणाला जन्माला घालू शकत नाही.
मी असे कुठेतरी वाचले जर समलिंगी पुरुषाचे विर्य कुणाला डोनेट केले तर जन्माला येणारे मुले हे सुद्धा समलिंगीच असते. हे खरे आहे का?
>>>उलटे शक्यच नाही आहे कारण
>>>उलटे शक्यच नाही आहे कारण समलिंगी कुणाला जन्माला घालू शकत नाही.<<< अरे हो! हे डोक्यातच राहिले नाही.
>>>मी असे कुठेतरी वाचले जर समलिंगी पुरुषाचे विर्य कुणाला डोनेट केले तर जन्माला येणारे मुले हे सुद्धा समलिंगीच असते. हे खरे आहे का?<<<
अरे बाप रे
>>>मी असे कुठेतरी वाचले जर
>>>मी असे कुठेतरी वाचले जर समलिंगी पुरुषाचे विर्य कुणाला डोनेट केले तर जन्माला येणारे मुले हे सुद्धा समलिंगीच असते. हे खरे आहे का?<<< अस असल्यास स्पर्म डोनर च्या कॉलम मधे समलिंगी चालेल का असा पण प्रश्न असेल नै का ?
(No subject)
बी, समलैंगिकता अनुवंशिक असते
बी,
समलैंगिकता अनुवंशिक असते का नाही याचा शोध घेतल्यास आपल्या शंकेचे उत्तर मिळेल.. माझ्यामते तसे नसावे..
टीना आणि ऋन्मेष मलाही खात्री
टीना आणि ऋन्मेष मलाही खात्री नाहीच असे असेल म्हणून पण मी असे वेगवेगळ्या ठिकाणी वाचले म्हणून इथे विचारुन पाहिले.
>>>समलैंगिकता अनुवंशिक असते
>>>समलैंगिकता अनुवंशिक असते का नाही <<<
ते तर म्हणतायत समलिंगियांना वंशच होत नाही. मग अनुवंशिक कशी असेल? नाही का?
भाबडे प्रश्न विचारतोय म्हणून राग मानू नयेत.
पण जर समलिंगींना समलिंगीशी
पण जर समलिंगींना समलिंगीशी लग्न करून दिले नाही, भिन्नलिंगीय व्यक्तीशी लावले तर त्या संबंधातून संतान तर होणारच ना.
ते अपत्य एक भिन्नलिंगीय आणि
ते अपत्य एक भिन्नलिंगीय आणि एक समलिंगीय अश्या दोघांचे असेल ना पण? मग ती अनुवंशिकता समलिंगीयाचीच असेल असे कसे ठरेल? आणि समलिंगीयाचे लग्न भिन्नलिंगीयाशी जबरदस्तीने लावून दिल्यावर समलिंगीय आपली लैंगीकता अपत्यप्राप्तीच्या हेतूने तात्पुरती बदलेल का? हा एक नवाच प्रश्न आहे.
>>समलिंगीयाचे लग्न
>>समलिंगीयाचे लग्न भिन्नलिंगीयाशी जबरदस्तीने लावून दिल्यावर समलिंगीय आपली लैंगीकता अपत्यप्राप्तीच्या हेतूने तात्पुरती बदलेल का? हा एक नवाच प्रश्न आहे.>>
मी अशी बरीच उदाहरणे इथे बघीतली आहेत. मुळात कल समलिंगी. मात्र धर्माचा पगडा, समाजाची भीती/दबाव यामुळे मूळ कल लपवून चार चौघांसारखे आयुष्य जगण्याचा प्रयत्न, त्यातून डेटिंग, लग्न , मूलबाळ. खोटे जगण्याचा ताण, डिवोर्स. बरेचदा 'अफेअर' कळल्यावर कुटुंबात उठलेले वादळ, मुलाबाळांनी , नातेवाइकांनी सबंध तोडणे वगैरे. सगळ्यांसाठी फार क्लेशकारक!
माझ्या नवर्याच्या मित्राची बहीण आहे. ती काही काळ नवर्याची कोवर्करही होती. त्यामुळे तीनदा लग्न एक मुलगा वगैरे फार जवळून बघीतले. या बाईने एक्स हजबंडची शेवटच्या आजारात सेवाही केली. शेवटी मुलगा कॉलेजला गेल्यावर योग्य पार्टनर शोधून खरं जगायला सुरुवात केली. सुदैवाने मुलाने, भावाने समजून घेतले, पाठ फिरवली नाही.
समलिंगीयाचे लग्न
समलिंगीयाचे लग्न भिन्नलिंगीयाशी जबरदस्तीने लावून दिल्यावर समलिंगीय आपली लैंगीकता अपत्यप्राप्तीच्या हेतूने तात्पुरती बदलेल का? >> लैंगीकता बदलणे कसे काय शक्य आहे? जर एखाद्या शरिराविषयी आकर्षणच नसेल तर त्या शरिरासोबत समागमन कसे काय करायला जमेल? जर लैंगिगता बदलता आली असती तर कुठला प्रश्नच उरला नसता. सगळे काही सोपे झाले असते.
बी, तुम्हाला माझ्या
बी,
तुम्हाला माझ्या प्रतिसादांचा मथितार्थ लक्षात आलेला दिसत नाही. असो
स्वाती२,
तुम्ही दिलेले उदाहरण फारच कल्पनातीत वाटले वाचायला. असे काही अनुभव इथल्यांना येऊ शकत नाहीत.
बी,
>>>लैंगीकता बदलणे कसे काय शक्य आहे? जर एखाद्या शरिराविषयी आकर्षणच नसेल तर त्या शरिरासोबत समागमन कसे काय करायला जमेल? जर लैंगिगता बदलता आली असती तर कुठला प्रश्नच उरला नसता. सगळे काही सोपे झाले असते.<<<
मुळात गफलत तुमच्या गृहीतकात आहे की भिन्नलिंगियांचे संबंध सुरू झाल्यावर कुठेतरी काहीतरी चुकल्यामुळे 'समलैंगीकता' निर्माण झाली. ती चुकून निर्माण झाली नसून ती नैसर्गीकपणे अस्तित्त्वात येते. त्यामुळे पुढचे सर्व प्रतिसाद हे मजेमजेतील आहेत. समलैंगीकता नैसर्गीक असल्यामुळे तुमच्या पुढच्या एक दोन थिअरीज संदर्भहीन ठरतात.
बेफिकिर तुम्हाला सुद्धा माझे
बेफिकिर तुम्हाला सुद्धा माझे प्रतिसाद लक्षात येत नाही आहेत. तुम्हाला काहीही करुन एक दोन तीन परिच्छेद लिहायचे असतात. मी जे लिहिले ते खूप क्लीअरली लिहिले आहे. आणि तुम्हाला असे उद्देशून त्यात काहीही नव्हते.
==
किंवा स्त्रि आणि पुरुष ह्यांच्या अनेक अनेक पिढ्यानंतर कुठेतरी काहीतरी चुकले असेल आणि त्यातून समलिंग स्त्रि पुरुष जन्माला आले असतील तोवर लग्न ही पद्धत अमलात आलेली असेल.>> इथे मला हे म्हणायचे आहे की समलिंगी हा प्रकार खूप नंतर जन्माला आला असावा जेंव्हा लग्न ही पद्धत आधीच रुढ झाली असावी. जेंव्हापासून स्त्रि पुरुष हे दोनच जेन्डर आहेत तेंव्हापासून कदाचित समलिंगी नसतील. आता ह्या पलिकडे मला अजून क्लॅरीटी आणता येत नाही. सो बाय. ( इथे मला भिन्न लिंगांचे संबंध चुकले असे मुळीच म्हणायचे नव्हते. )
>>>तुम्हाला काहीही करुन एक
>>>तुम्हाला काहीही करुन एक दोन तीन परिच्छेद लिहायचे असतात. <<< हा हा
हे बरे आहे जेंव्हा सॉरी
हे बरे आहे जेंव्हा सॉरी म्हणायची वेळ येते तेंव्हा हा हा केले की झाले.
<तुम्ही दिलेले उदाहरण फारच
<तुम्ही दिलेले उदाहरण फारच कल्पनातीत वाटले वाचायला. असे काही अनुभव इथल्यांना येऊ शकत नाहीत.>
कृपया हे वाचा - http://www.huffingtonpost.com/betwa-sharma/gay-indian-men-speak-out-_1_b...
असे असंख्य लेख तुम्हांला सापडतील.
माझ्या परिचयातल्या दोघांचे दोन घटस्फोट झाले आहेत, आणि दोघंही तिसर्या लग्नाच्या तयारीत आहेत. घरचे समजावूनही ऐकत नाहीत.
Pages