कला सादर करीत आहे - समीप रंगमंच (दोन एकांकीका)

Submitted by निकीत on 29 June, 2015 - 15:09

कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन (सॅन फ्रॅन्सिस्को बे एरिया) अर्थात कला BMM 2015 मध्ये सादर करित आहे:

थेट प्रेक्षकांशी संवाद साधणार्‍या दोन एकांकिका समीप रंगमंच मध्ये (३ जुलै दुपारी १:३० ते ३:३० - Room ACC 201 - पु. ल. देशपांडे सभागृह).

१. “I have never” (लेखन: अमृता हर्डीकर)
10750177_10154876767925176_1120236000281543860_o.jpg
सिलिकॉन व्हॅली (बे एरिया) मधील पाच मित्रांची, त्यांच्या स्वप्नांची, त्यांच्या अपेक्षांची, त्यांच्या लग्नांची, आणि एकमेकांविषयीच्या काळजीची ही हलकीफुलकी गोष्ट. एका संध्याकाळी मित्राच्या केळवणासाठी जमून टल्ली होत एकमेकांची यथेच्च टिंगलटवाळी करत गोष्ट पुढे जाते.

२. “Pizza” (लेखन: प्रदीप वैद्य)
zslide2.jpg
भारतातल्या शहरी जगण्यामध्ये “अमेरिकत्व” जोम धरू लागलंय. आर्थिक आणि राजकीय पातळीवर सर्व काही विकत घेता येणं किंवा घेऊ शकणं ह्याचं प्रतीक म्हणजे पिझ्झा. जागतिकीकरणामुळे समोर आलेल्या नव्या विवशता, अपरिहार्यता आणि विषण्णता याचं त्याच्यावर topping.

अवश्य यावे !
भेटूच ! Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users