माहेर

Submitted by सुमेधा आदवडे on 22 January, 2009 - 21:34

फुलवीले परसात माझ्या वार्‍याने गंधास
झाडं,पानं,फुलं, वेली सार्‍यांस त्याची आस

वार्‍या जा रे काम माझे एक कर खास
निरोप माझा घेऊन जा माझ्या माहेरास

पाहुन ये कसा माझा वाडा आहे सुरेख
आई-बाबांस सांग सुखी आहे त्यांची लेक

गोठ्यातल्या धेनुसही भेटुन ये जरा
आणी प्रेमाने गोंजारुन ये तिच्या वासरा

रातराणीचा माझ्या थोडा गंध घेऊन ये
भावास माझ्या सांग एकदा भेटीस तू ये

ओट्यावरच्या झुल्यावर भरपुर झुलून घे
आठव सारे भरल्या डोळ्यांत माझ्या साठु दे.

सख्यांचीही माझ्या जरा विचारपूस कर
नदीच्या शीत पात्रात मनसोक्त स्नान कर

मायेचा गारवा कवळुन आपल्या मिठीत,
लवकर परत ये पुन्हा माझ्या ओटीत .

गुलमोहर: 

आवडली.

>>मायेचा गारवा कवळुन आपल्या मिठीत,
लवकर परत ये पुन्हा माझ्या ओटीत .>>

मस्त

जयदीप ओक
**********
मी दुसर्यांन सारखा होऊ शकत नाही कारण मी माझत्वं घालवु शकत नाही.

जाताना जा माझ्या माहेरी, वळणावर डौलदार निळी हवेली .....

जुन्या आठवणी जाग्या झाल्या सुमेधा....धन्स... Happy

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु .......
कल्पनेतला ’ताजमहाल’ हिणकस ठरला !!! Happy

छान. Happy
"माझिया माहेरा जा रे पाखरा,
देते तुझ्या सोबतीला आतुरले माझे मन,
वाट दाखवाया नीट माझी वेडी आठवण.."
या कवितेची आठवण झाली.. Happy

मायेचा गारवा कवळुन आपल्या मिठीत,
लवकर परत ये पुन्हा माझ्या ओटीत .

सुंदर.

सर्वांचे मनापासुन आभार ! Happy

*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************