कोलंबी सुका मसाला

Submitted by परदेसाई on 26 June, 2015 - 14:21
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. अर्धा किलो कोलंबी.
२. १ मध्यम कांदा बारीक चिरून.
३. ४ / ५ सुक्या मिरच्या.
४. ४/५ लवंगा.
५. १ टेबलस्पून जीरे.
६. दालचीनीचा लहान तुकडा
७. थोडी हळद.
८. १ टेबलस्पून आले पेस्ट.
९. १ टेबलस्पून व्हिनेगर्/लिंबूरस.
१०. १/२ टीस्पून मीठ.
११. दोन टेबलस्पून तेल.

क्रमवार पाककृती: 

१. कोलंबी सोलून त्यातली शीर काढून टाकून स्वच्छ करून घ्या.
२. सगळे मसाल्याचे पदार्थ व व्हिनेगर्/लिंबूरस एकत्र वाटून एकजीव करून घ्या (पाणी न टाकता मिक्सरमधे फिरवा).
३. कढईत तेल टाकून त्यावर कांदा नीट भाजून घ्या.
४. त्यावर वाटलेला मसाला टाकून तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
५. त्यात मीठ व कोलंबी टाका. झाकण ठेऊन कोलंबी शिजेपर्यंत शिजवा. मधून मधून परतून घ्या..

वाढणी/प्रमाण: 
२/३ जणांसाठी.
अधिक टिपा: 

१. पाणी न टाकता हा सुका मसाला करायचा असतो.
२. वरून आवडत असल्यास कोथिंबीर टाकू शकता.
३. चपाती/पराठ्याबरोबर मस्त लागतो. शक्यतो ताजाच खावा.
४. तिखटाचा त्रास असेल तर मिरच्या जरा कमीच टाका...
५. कोलंबी ऐवजी काय/काय टाकावे ते स्वतःच ठरवा...

माहितीचा स्रोत: 
परूळेकर/ काळे पाककॄती पुस्तक व थोडासा प्रयोग...
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान रेस्पी. बरट्यांसारखीच पाणी न घालता करायची आहे. अर्थात मसाला वेगळा आहे.
प**, ब** किंवा यूनिकॉर्नचं शिंग घालून करून पाहीन. Wink

मस्त वाटत आहे रेसिपी ..

>> आजचा बेत.

अगदी अजचाच असं नाही पण बटाटे/ पनीर/ कच्ची केळी/अरवी वगैरे घालून लवकरच .. Wink

कोलंबी वीक पॉईंट.. मस्त स्टार्टर सारखे दिसतेय.. लेमनज्यूस बरोबर एकेक तोंडात टाकत खायला मजा येईलसे वाटतेय Happy

बरटं इज विदाउट आलं आणि धिस इज विदाउट लसूण. तर घरातलं काय संपलंय त्याप्रमाणे कधी बरटं आणि कधी सुका मसाला करता येईल. कोळंबी हा कॉमन घटक ठेवल्याबद्द्ल धन्य्वाद.
कृतीवरून आणि फोटोवरून आवडेल असं वाटतंय.