तुला कापते रे तुला कापते

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

(ग दि मा, राजाभाऊ आणि बाबुजींची क्षमा मागून 'तुला पाहते रे तुला पाहते' ह्या अजरामर गीतचे स्वैर विडंबन लिहीण्याचा प्रयत्न )

तुला कापते रे तुला कापते
तुझी पर्स माझ्या मनी राहते
जरी साधीभोळी तुला कापते

तुझ्या पगाराचा जीवा ध्यास लागे
तुझ्या मिळकतीने मनी खर्च जागे
तुझ्या कार्डने मी मॉल नाहते

किती भाग्य थोर ह्या साधेपणीही
दिसे वस्तू निद्रेत जागेपणीही
उगी का वाण्याचे बील वाढते

कधी बोका पाहतो का बडग्याला
पती न्याहळी का कधी शेजारणीला
लाटणे घेऊनी मी सदा राहते
(चू भू द्या घ्या )

विषय: 
प्रकार: 

मस्त...

केदार, स्वानुभव नाही ना? Wink

विनय

केदारा ..मस्तच रे ....
लाटणे से बचके रहना रे बाबा Happy

Happy
मला शीर्षकावरुन विडंबन भाजीपाल्यासंबंधी असेल असे वाटले होते. Happy

केदार पहिली दोन कडवी मस्त झाली आहेत. तिसरे तेवढेच बघितले (किंवा विडंबनाचा विषय तो असता ) तर चांगले आहे, पण तुझा विषय बायकोचे खर्च करणे हा असल्याने विसंगत वाटते.

खुSSSSप छान विडंबन! Happy

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
एक लोहे की कुल्हाडी उस वक्त तक लकडी का छिलका नही उतार सकती जब तक लकडी का ही दस्ता उसमें शामिल ना हो....! \
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

केदार छान विडंबन.. कुणीतरी बरच कापलेलं दिसतय! Happy

धन्यवाद विनय, अथक, सँटीनो, रुनी, अमोल, नयना, भावना और बाकी सब पढने वाले (ऑल इंडीया रेडीयो सटाईल) Proud
विनयदा : स्वानूभव नाय
अथक : आज्ञा प्रमाण गुरुजी

मला शीर्षकावरुन विडंबन भाजीपाल्यासंबंधी असेल असे वाटले होते. >>> मला मासे आठवले Biggrin
चांगलं आहे विडंबन... कितिला कापलं मग ? Happy

डॅफ Happy पक्की मासेखाऊ वाटत Happy
अजून कापणारी नाय्ये Proud

केदार, धम्माल लिहिलयस
*
मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर - "माझं एक स्वप्न आहे की, एक दिवस माझी चार छोटी मुलं अशा राष्ट्रांत राहतील की जिथे कातडीच्या रंगावरुन नाही तर शीलसंपदेवरुन त्यांची पारख केली जाईल."

झक्कास रे केदार! Happy मस्त!
ही लोक स्वानुभव का स्वानुभव का असे का विचारतात?????
सरळ सरळ सान्गाव की माणसान, आपण समदु:खी आहोत म्हणून! Proud
...;
आपला, लिम्बुटिम्बु

एक नंबर केदारा, मजा आली रे!!
(मुळ गाणं माझं फार्फार आवडतं, त्यामूळे मी चालीत पण म्हणलं रे.. :))

सरळ सरळ सान्गाव की माणसान, आपण समदु:खी आहोत म्हणून! >>> Lol

--
आतली पणती, तेवायला अशी;
अंधाराची कुशी, लागतेच..!!

लिंबूदा Proud
धन्यवाद लिंबूदा साजीरा आणि अश्विनी Happy

मस्त.. Happy
पण अमोलशी सहमत.. कडव तेही जमलयं, पण कवितेत विसंगत वाटतेय.. ह्यावर दुसरे होऊन जाऊ दे.. विडंबन रे.. Happy

केदार, क्लासच...

अजुन काही येऊ दे.
----------------------------------------------------------------
है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

धन्यवाद अनघा Happy
दूसर लिहीलय ना भोंडला Proud