२ गटारी अमावस्या ???

Submitted by हेमन्त् on 19 June, 2015 - 00:33

दरवर्षी आषाढी अमावस्येला गटारी अमावस्या साजरी करतात. यावर्षी दोन आषाढ महिने असल्याने गटारी दोनदा साजरी करायची का ? अशी प्रामाणिक शंका भाविकांनी व्यक्त केली आहे....
.
.
.
तज्ञ आणि अनुभवी लोक मार्गदर्शन करतील का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गटारी अमावस्या हा सण माझ्या माहितीनुसार गटारांची, ड्रेनेजलाईनची पूजा करून साजरा करतात, सोबत साफसफाई आणि स्वछताही होणार असेल तर दोनदा काय चारदा करा Happy

हो दोनदा साज-या कराव्या, जंगी पार्टी करुन समस्त माबोकरांना आमंत्रण द्यावे. खर्चाला तोटा करु नये. जलपानाबरोबर मद्यपान आणि शाकाहाराबरोबर मांसाहाराची चोख व्यवस्था करावी.

रश्मी हसलात ते माझ्या पोस्टला तर नाही..

कारण माझ्या माहितीप्रमाणे हिंदू संस्कृतीनुसार आषाढी अमावस्या दिव्यांची पूजा करून साजरी केली जाते..

तर आणखी कुठल्याश्या संस्कृतीनुसार या दिवशी सार्वजनिक गटारे जे आपल्या शहराला स्वच्छ ठेवतात त्यांच्या सन्मानार्थ त्यांची पूजा केली जाते.. जसे दसर्‍याला शस्त्रपूजन केले जाते, स्वरस्वतीपूजन असते, अगदी तसेच..

आता श्रावणात नॉनवेज खायचे नाही तर त्याआधी शेवटच्या दिवसात भरपेट उत्सव साजरा केल्यासारखे खा म्हणत हा दिवस हल्ली काही वर्षांपासून फॅड म्हणून गटारी या नावाखालीच साजरा केला जातो...
अर्थात यात मद्य पिणेही आलेच.. आणि ते प्यायल्यावर माणूस गटारात लोळायचे चान्सेस वाढतात म्हणून काही जणांना त्यावरून हे गटारी नाव आलेय असा भ्रम होतो ईतकेच.

अधिक माहीतीसाठी या धाग्याला जरूर भेट द्या.

http://www.maayboli.com/node/50033

ऋन्मेष मी तुझ्या आधीच्याच पोस्टला हसले होते कारण खूप आशादायक आहेस तू. उलट लोक आजकाल या अमावस्येचे खरे नाव ( दिव्याची अमावस्या, दीप पूजा, दीप दान ) विसरले आहेत. श्रावण ( चातुर्मास ) सुरु व्हायच्या आत कधी एकदा चिकन-मटण खातो, पितो असे काही लोकाना होते. आणी त्यातुनच या गटारी पद्धतीचा जन्म झाला असावा.:फिदी:

राहिले गटार साफ करायचे तर भारतातले किमान ७० टक्के लोक गटारीत कचरा टाकणे हे आपले आद्य कर्तव्य आहे असे समजून घाण करतात आणी वरतुन सफाईवाल्यान्च्या नावाने बोम्ब मारतात. हे लोक आधी जेव्हा डस्टबीनमध्ये कचरा व्यवस्थीत टाकतील तेव्हाच गटारी मोकळ्या श्वास घेतील.

रॉबीनहूड, अहो, तशी तर जगात सर्वत्र रोजच गटारी चालते. अगदी भारतात देखील!
आ.न.,
-गा.पै.

पैलवान:
माझ्या माहितीप्रमाणे गटारी अमावस्या असा कोणताही सण हिंदू धर्मात सांगितलेला नाही.>> अगदी खरं..

ऋन्मेष:
मला तरी गटारीच्या उगमाचं कारण आपण शेवटल्या प्रतिक्रियेत सांगितल्याप्रमाणेच वाटतंय..

रश्मी:
गेले दोनतीन दिवस WhatsAppवरून शिवसेनेेवर टीका करणाऱ्यांनी आपली प्रतिक्रिया वाचावी.. (अापल्या मताशी पूर्ण सहमत..)