अंडा घोटाला

Submitted by वर्षू. on 18 June, 2015 - 03:57
लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३ अंडी, पावभर मटन खीमा, दोन टी स्पून आलं लसूण पेस्ट, पाव चमचा टी स्पून लवंग दालचिनी पावडर, २ लहान कांदे,दोन हिरव्या मिर्च्या, कोथिंबीर, १ टी स्पून कसूरी मेथी, ओल्या लसणाची पात ( ऑप्शनल), ८,१० लसूण कळ्या, २ टीस्पून प्रत्येकी गरम मसाला, काळी मिरी पावडर, धना पावडर, तिखट.
दोन टॉमेटो, हळद, मीठ , एक टी स्पून तेल.

क्रमवार पाककृती: 

तीन पैकी दोन अंडी उकडून , सोलून , किसून घ्या. तिसरं अंड हाफ फ्राय करून ठेवा.
खीमा+ आलंलसूण पेस्ट + लवंग दालचिनी पावडर, कुकर मधे भांड्यात वाफवून घ्या. सुटलेलं पाणी पूर्ण आटवताना खीमा , फ्राय करून घ्या.
हिरव्या मिर्च्या , लसणाची पात आणी कोथिंबीर एकत्र बारीक चिरून ठेवा.
कांदे बारीक चिरून घ्या.
लसूण बारीक चिरून घ्या.
टोमॅटो प्यूरी करून घ्या.

पॅन मधे एक टी स्पून तेल गरम करून , चिरलेला लसूण लाल होईस्तो परता.
त्यावर खीमा घालून थोडा वेळ परता.
आता चिरलेला कांदा घालून तो मऊ होईस्तो परता.
सगळे मसाले, हळद्,मीठ, कसुरी मेथी, कोथिंबीर मिर्ची , घालून जरा परतून टोमॅटो प्यूरी घालून
टोमॅटो चा कच्चट वास जाईस्तो परता.
आता किसलेली अंडी मिसळा, हलक्या हाताने परतताना , थोडे पाणी घाला. मिश्रण दाटसर झालं कि हाफ फ्राय
केलेलं अंड हलक्या हाताने मिसळून, पावा बरोबर सर्व करा.

ठैरो.. अभी घोटाला करना बाकी है

घोटाला केल्याव्र्र

वाढणी/प्रमाण: 
३ जणांकरता पोटभरीचा संडे ब्रंच होईल.
अधिक टिपा: 

मूळ रेसिपीत पॅन मधे भरपूर तेलात(पुर्‍या तळता येतीलश्या प्रमाणात ) हाफ फ्राय बनवलेले आहे.. आणी उरलेल्या तेलात बाकीचे पदार्थ परतले आहेत.
मी हाफ फ्राय मायक्रो मधे बिना तेला/ बटर चे केलंय.पाव ही साधेच घेतले.
चवीत विशेष फरक नाही पडला मात्र कॅलरीज मधे भरपूर पडला असेल..

माहितीचा स्रोत: 
यो रॉक्,मिसेस रॉक्स,'स्मि" आणी नेट
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेरिएशन म्हणून ऑमलेट बनवून आत खीमा भरून फ्रँकी सारखं खायला ही छान लागतं..

घोटाळ्यांचं वेरिएशन काय.. किती तरी प्रकारांनी करता येतो घोटाळा.. Wink

मस्त. एकदम यम्मी दिसतंय. मी याचं नाव खीमा घोटाळा ऐकलंय.
फार मागे एकदा VT स्टेशन जवळच्या पोलिस कॅन्टीनमधे खाल्ला होता - खीमा घोटाळा. महान होता. अजूनही मिळत असेल.

वर्षुदी अंड ठीक आहे पण खिम्यासाठी काहीतरी पर्याय सुचव. सोयाचंक्स नको Sad
बाकी रेस्पी मस्तच. पण मला चालणार नाही हे ही तितकच खरय. एंजॉय कर.

वाह...खुपच छान आणि अनोखी रेसीपी आहे. मी शाकाहारी आहे पण मुलांच्या साठी बनवावच लागतं. हे नक्की करून बघीन.

घोटाला ही रेसिपी बर्‍याच हॉटेल मध्ये दिसते. त्यामुळे नावाच्या नावाने फार गहजब करनेका नै...

@ रॉ हू.. नुक्तंच ऐकलं हे नांव फस्ट टैम.. तेंव्हा मला वाटलं होतं कि बिघडलेल्या ऑम्लेट ला म्हणतात कि कै
घोटाला.. पण यो ने सगळ्या शंका दूर केल्या..

मी तरी पहिल्यांदाच ऐकलं हे नांव.. त्यामुळे फारच्च उत्सुकता वाढून शिगेला वगैरे पोचलेली..

म्हणून इथे शेअर करण्याचा प्रपंच केला.. आणी माझ्यासारखे पहिल्यांदाच हे नांव ऐकलेले कितीतरी आढळले की इकडे.. Happy

इसलिये,' नावात काय आहे,' पटले नै, नाम मे कुछ है भई!!!

मस्त रेसिपी. करुन पहायला हवी. खिमा सध्याचे न्यु फाउंड लव्ह आहे. घोटाळा करायला मजा येईल Wink
हाफ फ्राय कसे केले ? फोटोत हाफ फ्राय आहे की उकडलेले अंडे ?

प्रिंसेस, हाफ फ्राय अंडं मायक्रो मधे केलेलंय, एकूणच तेलावर भर कमी असतो माझा म्हणून..
योक फार शिजायला नको असल्यास एक मिनिट माय्क्रो केलं कि झालं सनी साईड अप.. पण माय्क्रो मधे करताना बोल वर झाकण आवश्यक आहे नाहीतर अंड फुटून ,मायक्रोभर उडून जो काही घोटाळा माजेल,..तो आवरताना नाकी नऊ येतील.. Proud
पूर्ण रेसिपीत एकच टी स्पून तेल वापरलंय, लिटरली!!

दाद, आपकी दाद का शुक्रिया!! Happy

Pages