बीएमएम २०१५ - नावनोंदणीकरता शेवटचे ५ दिवस

Submitted by BMM2015 on 17 June, 2015 - 11:48

नमस्कार मंडळी,

२४ वर्षांनंतर दक्षिण कॅलिफोर्नियात भरणारं बृहन्महाराष्ट्र मंडळाचं १७वं अधिवेशन काही दिवसांतच सुरू होईल. नावनोंदणीसाठीची अंतिम तारीख २१ जून आहे. तेव्हा त्वरा करा.

अधिवेशनाच्या भोजन समितीने तुमच्यासाठी मेजवानीची तयारी केली आहे, ती तुम्ही या दुव्यावर पाहू शकता.

तीनही दिवस भारतातील आणि उत्तर अमेरिकेतील कलाकारांचे अनेक उत्तम कार्यक्रम पहाण्याची संधी. कार्यक्रमाची यादी या दुव्यावर पाहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवीका,

तिकिटं उपलब्ध आहेत. सीट नंबर फक्त मुख्य सभागृहातल्या कार्यक्रमांकरता आहे. आणि सभागृहाची रचना चांगली असल्याने सर्वांना नीट दिसेल कार्यक्रम.

धन्यवाद.

आम्हाला मेन ईवेंट (३,४ आणि ५) करायचा आहे. त्याची माणशी फी $३०० आहे. त्यात जेवणाची सोय धरून आहे का?

जेवण धरून फी असल्यास , त्यात मधूमेहीं करता काही खास खाण्याची सोय आहे का?