आळकुड्या
भरपूर कांदे (अळकुड्यांच्या पावपट तरी)
भक्कम तेल
तिखटपूड
मीठ
धणेपूड
हळद
आमचूर पावडर
कढीलिंबाची पानं
मोहरी
हिंग
-अळकुड्या प्रेशर कुकरात मऊ शिजवून घ्याव्या.
-गार झाल्यावर सालं सोलून बारीक तुकडे करावे.
-कांदा उभा आणि पातळ चिरून घ्यावा.
-तेलात मोहरी हिंगाची फोडणी करून त्यात कढीलिंबाची पानं घालावी.
-कांदा घालून खमंग परतावा.
-कांदा परतून होत असताना हळद, तिखट, मीठ, धणेपूड आणि आमचूर पावडर असे सगळे घटक एकत्र करून ठेवावे.
-ह्यातली अर्धी पूड कांद्यावर घालून परतावी, तर अर्धी चिरलेल्या अळकुड्यांना लावावी.
-अळकुड्या कांद्यावर खरपूस परताव्या.
-कुकरमधून काढलेल्या अळकुड्या पूर्ण गार होऊ द्याव्या. २ तास फ्रिजमध्ये ठेवल्या तर बुळबुळीतपणा कमी होतो.
-प्रेशरकुक करताना काही आंबट घालू नये.
-कांदा अगदी लाल होईपर्यंत परतावा. नाहीतर त्याचा गोडीळपणा विचित्र लागतो.
-आमचूरपावडरीखेरीज दुसरं आंबट घालू नये.
-तेलात कंची मारायची झाल्यास भाजी करू नये.
-फायनल प्रॉडक्ट अजीबात बुळबुळीत किंवा तारा सुटलेलं होत नाही.
-३० मिनिटं हा प्रत्यक्ष कृतीचा वेळ आहे. अळकुड्या शिजवण्याचा वेळ ह्यात धरलेला नाही.
फायनल प्रॉडक्ट मस्त दिसतंय..
फायनल प्रॉडक्ट मस्त दिसतंय.. उकडलेल्या अळकुड्या खायला आवडतात त्यामुळे भाजी नक्कीच आवडेल असं वाटतंय.
उकडलेल्या अळकुड्या फ्रिजात ठेवल्या की त्याचा चिकटपणा कमी होतो असंच ना?
म्हणजे उद्या सकाळी भाजी करायची तर आज रात्री अळकुड्या उकडून फ्रिजात ठेवायला हव्यात.
अळकुड्या नुसत्या मीठ घालून
अळकुड्या नुसत्या मीठ घालून उकडूनही आवडतात. नाहीतर उकडून **ट्यासारखीच (नैवेद्याची) भाजी.
अशीही करून बघेन आता.
(पण आपल्याकडे अळकुड्या फारशा खात नाहीत हे जयाम्माला कोणीतरी धीर करून सांगायला हवं. :P)
मस्त भाजी.
मस्त भाजी.
स्स्स्स्स्स्स...सिंपली
स्स्स्स्स्स्स...सिंपली तोंपासु!!!!
ह्या अळकुड्या जमिनित पेरल्या
ह्या अळकुड्या जमिनित पेरल्या तर आळू ची भाजी उगवते का?
हो सुरेखा१ उगवते.मी नेहमी
हो सुरेखा१ उगवते.मी नेहमी लावते.फक्त एवढेच की कधी कधी खाजरा आळु उगवू शकतो.
भाजी मस्त दिसत आहे .
भाजी मस्त दिसत आहे .
वेगळी आहे रेसीपी . हो आणि
वेगळी आहे रेसीपी . हो आणि अधिक टिपा मस्त करून बघायला पाहिजे.
फोटो पण सॉलिड आलाय. मऊसुत
फोटो पण सॉलिड आलाय. मऊसुत पोळी आणि झणझणीत भाजी
dhanashri, धन्यवाद. मला हे
dhanashri, धन्यवाद.
मला हे माहित नव्हत.
सगळ्यांना प्रतिक्रियांकरता
सगळ्यांना प्रतिक्रियांकरता धन्यवाद!
>>मऊसुत पोळी आणि झणझणीत भाजी
धनुडी, भाजी सुपरपुचाट आहे. रंग काश्मिरी तिखटामुळे.
उसगावात अळकुड्या मिळतात का?
उसगावात अळकुड्या मिळतात का? >> इंग्रो ला लायसन मिळणार नाही अळकुड्या नसल्या तर
कढिपत्ता, हि मिरची मिळत नसे त्या काळात इं ग्रो मधे अळकुड्या मिळत होत्या .
काहि काही दुकानात त्या जॉर्ज वॉशिंग्टनच्या जमान्यातल्या असतात , पण असतात
अळकुड्या आणण्यात आल्या आहेत.
अळकुड्या आणण्यात आल्या आहेत. रबरबीत चिखलात माखल्या आहेत. लवकरच त्यांना व्यवस्थित स्वच्छ करून भाजीत सद्गती देण्यात येईल.
फोटू भारी.. ४था जरा जास्तच
फोटू भारी.. ४था जरा जास्तच आवडला..
आरवी! मला आधी नॉन वेज वाटले!
आरवी! मला आधी नॉन वेज वाटले! शेजारच्या वैदर्भीय काकू (शेवैका) भारी करायचा ही भाजी! पण त्या ख़ास विदर्भ स्टाइल मध्ये अरवी म्हणायच्या...
मस्त रेसिपी आमच्यात 'मुडली'
मस्त रेसिपी
आमच्यात 'मुडली' म्हणतात अरवीला. माझी आवडती भाजी. मी ओव्याची फोडणी घालून साधीच करते भाजी. आता या पद्धतीने करून बघेन.
धन्यवाद! अळकुड्यांना 'मुडली'
धन्यवाद!
अळकुड्यांना 'मुडली' म्हणतात हे नव्हतं माहिती.
माझी आई "अटकोळे" म्हणते आणि
माझी आई "अटकोळे" म्हणते आणि बाबा रामाने वनवासात खाल्ले ते हे कंद (डोन्ट टेक इट सिरियसली). उपासाला उकडून खाई. ते तसेच खायला आवडतात. इथे पण इं.ग्रो. आणि चा.ग्रो. मध्ये नेहमी मिळतात. अजून भाजी-बिजी करायची डेयरिंग झाली नाहीये. तेल खूप घालावं लागेल असं दिसतंय. फोटो (आणि पोळी) छान आहे.
भगत ताराचंद मधे 'अरबी' असे
भगत ताराचंद मधे 'अरबी' असे म्हणतात. त्यांच्या स्पेशालिटी मधे अरबी मटार किंवा अरबी काजू कॉम्बिनेशन असतेच.
इथे बघून आज पहिल्यांदाच
इथे बघून आज पहिल्यांदाच अळकुड्यांची भाजी केली.
मस्तं झाली आहे.
इतकी वर्षे कर्नाटकात राहून आणि बाजारात ही भाजी सर्रास मिळत असूनही कधी केली नव्हती.
धन्यवाद मृण्मयी.
Pages