स्पिनॅच स्टफ्ड बेक्ड सॅल्मन

Submitted by डीडी on 15 June, 2015 - 05:03
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 
    - २ सॅल्मन स्टिक्स (साधारण ४" X २" प्रत्येकी)
    - ३ टेबलस्पून आलं-लसूण-कोथंबीर पेस्ट
    - २ टीस्पून काळं मिरी भरड
    - २ लाल मिरच्या
    - १ लिंबाचा रस
    - १ टीस्पून व्हाईट पेपर पावडर
    - १ टीस्पून गरम मसाला पावडर
    - २ टीस्पून ऑलीव्ह ऑइल
    - मीठ

स्टफिंगसाठी

    - ३-४ मुठी पालकाची पानं
    - २ टेबलस्पून कॉर्न
    - २ टेबलस्पून गाजराचे बारीक तुकडे
    - २ लसूण पाकळ्या
    - मीठ
क्रमवार पाककृती: 

सुरुवातीला सॅल्मन (त्याच्या फिक्कट नारंगी रंगामुळे असेल कदाचित) खायची इच्छा व्हायची नाही. पण एकदा खाल्ल्यावर खूप आवडला. सॅल्मनमध्ये प्रोटीन, ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स आणि व्हिटामिन D भरपूर प्रमाणत असल्याने हा मासा खूप हेल्दी समजाला जातो.

सॅल्मन स्टिक स्वच्छ धुवून घ्यावी. दोन्ही बाजूला साधारण अर्धा इंच जागा ठेवून स्टिकला मध्ये खाच द्यावी. खाच इतकीही डिप असू नये कि स्टिक दुसर्या बाजूने उघडली जाईल. स्टिकला बाहेरून आणि खाचेमध्ये मीठ आणि लिंबू हलक्या हाताने चोळून घ्यावे आणि किमान १० मिनिटं मॅरीनेट होण्यासाठी ठेवावे.

आता स्टिकला आलं-लसूण-कोथंबीर पेस्ट, बारीक चिरलेल्या लाल मिरच्या, आणि मिरी भरड लावून घ्यावी. वरून चिमटीने गरम मसाला आणि व्हाईट पेपर पावडर भुरभुरावी आणि १५-२० मिनिटं मॅरीनेट होऊ द्यावी.

स्टफिंग

अर्धा टीस्पून ऑलीव्ह ऑइल वर २ लसूण पाकळ्या ठेचून फोडणी करावी, आणि त्यावर चिरलेल्या पालकाची पाने, कॉर्न आणि गाजर परतून घ्यावे. चवीपुरते मीठ आणि थोडे पाणी घालून शिजवावे. पालक साधारण अर्धकच्चा शिजवावा.

ओव्हन 200°C ला १० मिनिटे प्री-हिट करावा. सॅल्मन स्टिक्सवर थोडे ऑलीव्ह ऑइल स्प्रे करून ओव्हन मध्ये साधारण १५ मिनिटे बेक करावा.

सॅल्मन ऑयली फिश प्रकारात मोडत असल्याने पूर्ण बेक्ड स्टिक छान ज्युसी होते.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी १
माहितीचा स्रोत: 
इंटरनेट आणि स्वतःचे प्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव .. इंटरेस्टींग ..
फोटो क्लास आलाय.. झक्कास एकदम ..
ते राईस आहे न बाजुला.. ? गोलगोल .. बडीशेप सारखे दिसताहेत मस्त .. Happy

वाह!!! salmon steak ची महातोंपासु रेसिपी दिस्तीये.... माझ्या आवडत्या दहात... रॉ साल्मन ही माझी फेव आहे !!!