कुणी काम देता का काम?

Submitted by पल्ली on 22 January, 2009 - 04:21

अरे मला कुणी काम देता का काम?
ह्या ग्राफिक डीजायनरला
घरी बसुन पोळ्या लाटणार्‍या
ह्या भुकेला कलाकाराला
कुणी काम देता का काम?
खूप कविता खरडल्या,
खूप लेख झोडले,
खूप काहीच्या काय लिहिलं,
पण दिव्यातल्या राक्षसाला
सारखं काम करण्याचंच व्यसन लागलं.
बिच्चार्‍या ह्या राक्षसाला
कुणी काम देता का काम?
वादळ गेलं, वारं गेलं,
पाऊस गेला, थंडी गेली,
आता उन्हाळाही जातोय,
काळाच्या चक्रात मागे पडलेल्या
ह्या भिकार्‍याला
कुणी काम देता का काम?
हास्याची टोपी घातली,
सुखी माणसाचा सदरा घातला,
सलवारही उधारीवरच आणली,
कामाची तेवढी ओढ राह्यली,
स्वप्नातही काम पाहणार्‍या
ह्या कामपिपासुला
कुणी काम देता का काम?

गुलमोहर: 

काम म्हणजे रती मदनातला कामदेव नाही हं.
काम म्हणजे काम ) >> ह्यो खुलासा केला ते लय झ्याक काम केलं बघा पल्लीताय Proud

**********************************
मै पल दो पल का शायर हूं ..

छान ! आवडले. भावलेही ! Happy
---हास्याची "टोपी" घातला,----
टोपी की मुखवटा, की टोप ?

लई भारी...

>>हास्याची टोपी घातला
"हास्याची टोपी घातली" असं हवं होतं का हे?

-योगेश

लई भारी पल्ले. माझे पण सध्या हेच गीत गाणे चालु आहे Sad अगदी अगदी मलापण तंतोतंत लागू होतं हे विडंबन काव्य.
काम म्हणजे रती मदनातला कामदेव नाही हं. >>>> हे स्पष्टीकरण दिलेस ते बरं झालं Wink फिदीफिदीफिदी

तुम्हा कविलोकांना कसं काय सुचत लोकांच्या मनातलही देव जाणे Happy
मी पण सद्ध्या बेकार ( म्हणजे दोन कार वाला नाही बरं का Happy ) आहे , काम देता का काम Happy छान लिहीलेस पल्ले .

मस्त

जयदीप ओक
**********
मी दुसर्यांन सारखा होऊ शकत नाही कारण मी माझत्वं घालवु शकत नाही.

mastach ahe....

(काम म्हणजे रती मदनातला कामदेव नाही हं.
काम म्हणजे काम स्मित ) Biggrin

फंडू Happy

कै च्या कै ! काय पण काय मागतेस माते ? कॉस्ट कटिंगचे दिवस आहेत. इथे कंपन्यातुन दोन दोन आठवड्यांचे ले ऑफ घेतले जाताहेत्..आणि काम पाहीजे म्हणे !!! Biggrin

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु .......
कल्पनेतला ’ताजमहाल’ हिणकस ठरला !!! Happy

बदल केलाय रे... काय बाई पोरं तरी!
विशाल, मला काम पाहिजे रे Lol

शक्य नाही सध्यातरी. मीही बेकारच आहे.
.........................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

अप्रतिम

फक्त काम या शब्दाला जास्त भाव दिला आहे

तुझ्या हाकेला ओ मिळो
लवकर तुलाही खो मिळो .
सतत तत्पर होऊन बस
तुझ्या विनवणिला हो मिळो .

कठीण आहे बाई, भारतात असतीस तर निदान लिज्जत पापड वाल्यांशी ओळख तरी करुन दिली असती तुझी... Biggrin

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु .......
कल्पनेतला ’ताजमहाल’ हिणकस ठरला !!! Happy Rofl

आषय छान आहे पण मुळ कोणत्या कवितेचे हे विडंबन आहे?

जे.डी भुसारे

"हास्याची टोपी घातली,
सुखी माणसाचा सदरा घातला,
सलवारही उधारीवरच आणली,"

पल्ले, या कडव्यातील सलवार कुणाची आणली आहेस? ते नाही लिहीलस॑?

"आपकी ये बात मेरे कुछ पल्ले नही॑ पडी !"

पल्ले, एक सा॑गु, माणसाच॑ आयुष्य हे उधारी-पाधारीतुन जगायच॑ नसत॑ ग॑ ! आपल॑ आयुष्य हे आपल॑च असाव॑, ते कोणत्याही कारणास्तव कुणाच्या आधिन असउ नये !
(कवीतेवर टिका नाहीये, माझ॑ वैयक्तीक मत आहे. आयुष्याबद्दल॑.......)
चढवलेला मुखवटा छान आहे..........
अस॑ जगन॑ फार कमी व्यक्तीना जगता येत॑.......
तुला लवकरच॑ काम मिळो हिच आशा.... शुभेच्छा......
लोभ असावा,
रवी......

सर्व छान पण शेवटचा कंस दंश करतो. त्याची गरज नाही वाट्त. पहा विचार करून. Happy

you may meet me in details at ....... www.layakari.com
I am here too in part ..... http://adnyaatvaas.blogspot.com

अज्ञात, सुधारणा केलीय. Happy

<<आषय छान आहे पण मुळ कोणत्या कवितेचे हे विडंबन आहे?>>
जे.बी. हे शिरवाडकरांच्या "नटसम्राट" नाटकातल्या..कुणी घर देता का घर्...या स्वगताचे विडंबन आहे.
बरोबर ना माते. शेवटचा कंस काढलास ते खुप छान केलेस मला पण खुप खटकत होता तो.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु .......
कल्पनेतला ’ताजमहाल’ हिणकस ठरला !!! Happy

पल्ली, माझ्या मनातलंच उतरवल आहेस.
विडंबन नाही सत्य आहे.
------------------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

विशाल,
पल्लीच्या वतीने शिरवाडकरांच्या "नटसम्राट" नाटकातल्या..कुणी घर देता का घर्...या स्वगताचे विडंबन आहे असे सांगीतल्या बद्दल धन्यवाद.

जे.डी भुसारे

पल्लि आत मन्दि अलिच आहे तर कुणी काम देता काम

नविन अवरुत्ति येवु देत मंदी साठी काम

टिव्हिवर नाहीका त्याच सीरीयल पुन्हा पुन्हा मागील जन्म उगाळत बसत