मराठे ज्वेलर्स बीएमएम सारेगम २०१५ - योगेश रत्नपारखी (सीअ‍ॅटल, वॉशींंग्टन) यांच्याशी गप्पा

Submitted by वैभव on 13 June, 2015 - 14:57

मराठे ज्वेलर्स बीएमएम सारेगम २०१५ अंतिम फेरीत निवड झाल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन.
Yogesh Ratnaparakhimb.jpg १) योगेश, तुम्ही मुळचे कुठले?

मी मूळचा अकोल्याचा. पण आता आईवडील पुण्याला असतात. त्यामुळे माझा भारतातला मुक्काम पुण्यात असतो. उच्च शिक्षणासाठी मी २००१मध्ये डॅलसला आलो. मागच्या तीन वर्षांपासून मी सिएटलमध्ये आहे.

२) तुम्हांला संगीताची गोडी / आवड कशी आणि केव्हा लागली?
घरी संगीताचे वातावरण असल्याने गाण्याची केव्हा आवड लागली कळलेही नाही. सौ. मालती आगाशेंकडे मी गाणे शिकायला सुरवात केली. आईवडिलांचे प्रोत्साहन मला सगळ्यांत उपयोगी ठरले.

३) संगीताचे शिक्षण तुम्ही किती वर्षे घेत आहात? आणि कोणत्या प्रकारचे संगीतशिक्षण चालू आहे?

मी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गेल्या वीसएक वर्षांपासून शिकत आहे. त्याबरोबर नाट्यसंगीत, गझल, भावगीत, भक्तिगीत हे गीतप्रकारही माझ्या गुरूंकडून आणि इतरांचे ऐकून शिकत असतो.

४) संगीतातील तुमचे गुरू कोण?
सौ. मालती आगाशे, पंडित यशवंतबुवा जोशी, डॉ. राम देशपांडे आणि अलीकडे श्री. प्रसाद खापर्डे.

५) तुमच्या संगीतातल्या विशेष कामगिरीबद्दल काय सांगाल ?

  • वयाच्या सोळाव्या वर्षी मी संगीत विशारद संपूर्ण केले.
  • भारतात असताना विविध स्पर्धांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये गायन.
  • Arts Stage, Asian Heritage Festival, Swarali, Indian Performing Arts Project Seattle यासारख्या संस्थांमध्ये गायन.
  • डॅलस का तारा, देस्तानी आयडॉल, Crescendo या सारख्या स्पर्धांमध्ये पहिले पारितोषिक.
  • मीनाक्षी शेषाद्री यांच्याबरोबर ओडिसी नृत्याला शास्त्रीय गायनाची साथ.

६) संगीताच्या या आवडीसाठी तुमचे काय विशेष प्रयत्न असतात?
नियमित रियाझ, श्रवण, शिकणे आणि शिकवणे. सागळ्यांत महत्वाचे म्हणजे गाण्याची संधी मिळाली की गाणे.

७) तुमचे आवडते गायक / गायिका आणि आवडते गाणे कोणते? तुमचे आवडते एखादे गाणे? कोणाचे संगीत ऐकायला तुम्हांला जास्त आवडते ?
लता मंगेशकर - आनंदवनभुवनी
संगीतकार - श्रीनिवास खळे, यशवंत देव, अजय अतुल

८) आपल्या बीएमएम सारेगम २०१५च्या अंतिम स्पर्धेसाठी कशा पद्धतीची तयारी चालू आहे?

रियाझ आणि निवडलेल्या गाण्यांची तालीम.

९) संगीताखेरीज आपले अजून काय काय छंद किवा आवड आहे ?

प्रवास, आपुलकीच्या माणसांबरोबर गप्पा, वाचन.

११) बीएमएम सारेगम २०१५च्या प्राथमिक आणि उपांत्य फेरीची तयारी तुम्ही कशी केलीत ?
रियाझ आणि निवडलेल्या गाण्यांची तालीम. माझं उपांत्य फेरीतील गाणं इथे ऐकू शकता.

११) आपला कौटुंबिक परिचय ?
माझी पत्नी, धनश्री आणि आमचा ७ वर्षांचा मुलगा, सोहम.

योगेशला तुम्ही या दुव्यावर जाऊन मतदान करू शकता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users