रस्ता

Submitted by vilasrao on 12 June, 2015 - 12:23

आठवणी जणू वदला रस्ता
पाउलखुणांनी सजला रस्ता

ओल्या मेंदित रडली स्वप्ने
खोटी प्रतिष्ठा अडला रस्ता

वेचले खुपते काटे जेव्हा
पायघड्याचांच दिसला रस्ता

दिसला अंधार दिव्याखालचा
मग चालता मज नडला रस्ता

स्मृतिंचे झाले येणे जाणे
रहदारिलाही थकला रस्ता

विलास खाडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users