मराठे ज्वेलर्स बीएमएम सारेगम २०१५ - विभूती कविश्वर (सीअ‍ॅटल, वॉशींंग्टन) यांच्याशी गप्पा

Submitted by BMM2015 on 11 June, 2015 - 19:15

मराठे ज्वेलर्स बीएमएम सारेगम २०१५ अंतिम फेरीत निवड झाल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन.

Vibhuti1.jpg1) विभूती, तुम्ही मुळच्या कोणत्या गावाच्या आहात ?

माझा जन्म कोरबा छत्तीसगढ मधला आहे. मी बारावीपर्यंत तिथेच वाढले .
माझं कॉलेजच शिक्षण नागपूरात झालं. सध्या मी सियेट्ल (WA ) येथे राहत असून स्वरसाधना म्युझीक institute चालवते.

2) तुम्हाला संगीताची गोडी / आवड कशी आणि केव्हा लागली ?

मला संगीताचा वारसा माझ्या वडलांकडून मिळाला . माझ्या वडलांनी मला वयाच्या पाचव्या वर्षापासून शास्त्रीय संगीताची तालीम द्यायला सुरुवात केली . हळू हळू मला संगीताची गोडी लागली . सात वर्षाची असतांना मी माझा पहिला stage performance दिला .लहान पणापासून मला लता मंगेशकर आणि आशा भोसले ची गाणी ऐकायला फार आवडायची

3) संगीताचे शिक्षण तुम्ही किती वर्ष घेत आहात ? आणि कोणत्या प्रकारचे संगीत शिक्षण चालू आहे ?

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण मी गेले 20 वर्ष घेत आहे शिवाय काही दिवस मला उपशास्त्रीय संगीताची तालीम घ्यायची पण संधी मिळाली .मला भावगीत ,गझल ,सिनेगीत गायला पण आवडतात

4) संगीतातील तुमचे गुरु कोण ?

साधारणपणे १५ वर्ष मी माझे वडिल श्री लक्ष्मण चौसाळकर यांच्याकडून हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. संगीत विशारद झाल्यानंतर Seattle ला तीन वर्ष मला श्री शरद गद्रेंकडून शास्त्रीय संगीत शिकण्याची संधी मिळाली. त्या नंतर मला एक वर्ष श्रीमती पदमाताई तळवलकर यांच्याकडून शिकायला मिळालं .सध्या मी Seattleच्या श्रीमती श्रीवाणी जडे आणि श्रीमती कुमुद नगरकर यांच्याकडे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीताचं अध्ययन करते आहे.

5) तुमच्या संगीतातली विशेष कामगिरीबद्दल काय सांगाल ?

  • १९९९ मध्ये अन्नु कपूर च्या "क्लोसप अंताक्षरी" मध्ये प्रथम पुरस्कार
  • २००० मध्ये "भोपाल दूरदर्शन" वर गाण्याचा कार्यक्रम करण्याची संधी
  • २००४ मध्ये चंद्रपूरला आयोजित "महाराष्ट्र केसरी" मध्ये १ लाख लोकांसमोर गायची संधी
  • २००९ मध्ये इप्रसारण द्वारा आयोजित "स्वरांगण" स्पर्धेत प्रथम पुरस्कार
  • २०११ मध्ये स्टार प्लस च्या "I am Next Superstar" स्पर्धेत प्रथम पारितोषिक . स्पर्धेचे परिक्षक सोनू निगम आणि सुरेश वाडकर

6) संगीताच्या या आवडीसाठी तुमचे काय विशेष प्रयत्न असतात ?

मी नियमित रियाझ करायचा प्रयत्न करते .विविध प्रकारचे गाणे ऐकते आणि ते बसवायचा प्रयत्न करते.


7) तुमचे आवडते गायक / गायिका आणि आवडते गाणे कोणते ? तुमचे आवडते
एखादे गाणे ? कोणाचे संगीत ऐकायला तुला जास्त आवडते ?

आवडते गायक / गायिका:- लता मंगेशकर ,आशा भोसले,श्रेया घोषाल ,शंकर महादेवन , सोनू निगम ,हरिहरन ,किशोर कुमार

आवडते संगीतकार:- मदन मोहन ,ए आर रेहमान , अजय अतुल ,श्रीनिवास खळे ,पं . हृदयनाथ मंगेशकर

आवडती गाणी:- ऋतू हिरवा (आशा भोसले ), या चिमण्यांनो (लता मंगेशकर),मी राधिका(आरती अंकलीकर),जिव रंगला (हरिहरन आणि श्रेय घोषाल ),हि गुलाबी हवा (वैशाली सामंत )

8) आपल्या बीएमएम सारेगम 2015 च्या अंतिम स्पर्धेसाठी कशा पद्धतीची
तयारी चालू आहे ?

नियमानी रियाज सुरु केला आहे . बीएमएम सारेगम 2015 च्या अंतिम स्पर्धेत उत्तम सादरीकरण करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.

9) संगीता खेरीज आपले अजून काय काय छंद किवा आवड आहे ?

मला अध्यात्मिक पुस्तक वाचायला आवडतात . नृत्य आणि चित्रकलेची पण आवड आहे

10) आपल्या बीएमएम सारेगम २०15 च्या प्राथमिक आणि उपांत्य फेरीची तयारी तुम्ही कशी केलीत ?
मला साडेतीन वर्षाची मुलगी आहे . ती शाळेत गेल्यावर ,त्या वेळेत मी माझे गाणे karaoke वर practice करायचे. या दुव्यावर तुम्ही माझं उपांत्यफेरीतील गाणं ऐकू शकता.

11) आपला कौटुंबिक परिचय ?

माझे पती :- शशांक कवीश्वर Microsoft सियेट्ल मध्ये काम करत आहे.
मला स्वरा नावाची साडे तीन वर्षाची मुलगी आहे.

विभूतीला तुम्ही या दुव्यावर जाउन मतदान करू शकता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users