जीवन किती घनदाट वन

Submitted by बेफ़िकीर on 10 June, 2015 - 06:06

गझल - जीवन किती घनदाट वन

जीवन किती घनदाट वन
विकलांग तन, विचलीत मन

येते, जिथे होते सुरू
ही वाटही आहे गहन

मरणासही तल्लफ सदा
जन्मासही माझे व्यसन

मेले तरी मतभिन्नता
काही दफन, काही दहन

नाही पुन्हा स्मरलो तुला
मी पाळले माझे वचन

तू साठवत आहेस धन
मी माणसे करतो जतन

नुसती पहा माझ्याकडे
बघ सावळे झाले गगन

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मरणासही तल्लफ सदा
जन्मासही माझे व्यसन

मेले तरी मतभिन्नता
काही दफन, काही दहन

फार सुरेख बेफी !! Happy

येते, जिथे होते सुरू
ही वाटही आहे गहन

नाही पुन्हा स्मरलो तुला
मी पाळले माझे वचन

तू साठवत आहेस धन
मी माणसे करतो जतन

नुसती पहा माझ्याकडे
बघ सावळे झाले गगन

सुंदर शेर, खुप आवडले.

वा वा क्या बात है

जीवन किती घनदाट वन
विकलांग तन, विचलीत मन >> सुंदर सुरुवात

<< येते, जिथे होते सुरू
ही वाटही आहे गहन

मरणासही तल्लफ सदा
जन्मासही माझे व्यसन

मेले तरी मतभिन्नता
काही दफन, काही दहन >> खलास, सहजता आणि मांडणीतील नजाकत ....आणि गहन आशय ...ग्रेट कॉंबो

नुसती पहा माझ्याकडे
बघ सावळे झाले गगन >> खूप सुरेख.