शेजार..

Submitted by मोहन ब. शिंदे on 9 June, 2015 - 11:27

शेजार..

कोणत्या नभाच्या पार गेलो
दूर पावले बस चार गेलो…

भेटल्या नकारांच्या शुभेच्छा
देत नेहमी होकार गेलो..

मज हसून वदले दुःख माझे
मृगजळी सुखाच्या फार गेलो..

हा सुगंध आला ओळखीचा
कां उगाच दारोदार गेलो…

चेहरा तुझा चंद्राप्रमाणे
बघत पोर्णिमा अनिवार गेलो…

उमलल्या कळ्या हृदयी कुणाच्या
गात गीत मी हळुवार गेलो..

धावले न कुणी ऐनवेळी
बघत कोरडा शेजार गेलो…

ढाल पाहुनी लाचार त्यांची
करत म्यान मग तलवार गेलो…

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणत्या नभाच्या पार गेलो
दूर पावले बस चार गेलो…>>व्वा

उमलल्या कळ्या हृदयी कुणाच्या
गात गीत मी हळुवार गेलो.. >>व्वा

ढाल पाहुनी लाचार त्यांची
करत म्यान मग तलवार गेलो>>व्व्व्वा

छान गजल!!