चिंगी आणि मॅगी.

Submitted by ऋन्मेऽऽष on 9 June, 2015 - 07:27

चिंगी आणि मॅगी.

चार दिवस झाले आमच्या शेजारच्या चिंगीला घरचा डाळभात गोड लागत नाहीये. डाळ आणि भात मुळी गोड नसतोच असे पांचट युक्तीवाद नको, चिंगीच्या भावना समजून घ्या. सारे काही जेवण साग्रसंगीत असावे पण कोणीतरी नेमके त्यातील मीठ काढून घ्यावे तसे कोणी तरी चिंगीच्या जेवणातील नेमके सार काढून घेतलेय.

आता या रविवारची गोष्टच घ्या ना. झाले काय, चिंगीचे बाबा नेहमी सारखे घरात प्यायला बसले. एका हातात मद्याचा ग्लास, दुसर्या हातात चैतन्यकांडी, आणि धूर् खिडकीच्या बाहेर. समोर कागदाच्या पुडक्यात शेवचकली चकण्याला, आणि सोबत पेप्सीकोल्याचा ग्लास हातात घेऊन त्या चकण्यावर ताव मारणारा तिचा दादा.

पण या सर्वात आज चिंगी कुठेच नव्हती. आजच्या मैफिलीत तिला स्थान नव्हते. कारण तिच्या मॅगी नूडल्सवर बॅन आला होता. बिचारी एका ताटलीत मॅगीचा टोमेटो सॉस घेऊन चाटत बसली होती. पण त्याने तिचे तोंड आंबटच होत होते. प्लीज, मॅगीचा सॉस आंबटच असतो असा पांचट युक्तीवाद नको, चिंगीच्या भावना समजून घ्या.

पेप्सीच्या बुडबुड्यात हरवलेला तिचा दादा आणि धुराच्या वलयात गुडूप झालेले तिचे बाबा यांच्या पासून नजर फिरवतानाचा तिची नजर जवळच पडलेल्या सिगारेटच्या पाकिटावर स्थिरावली..... आणि युरेका युरेका.. चिंगीला आपले राष्ट्रीय बालखाद्य परत मिळवायची आयडीया सुचली. चिंगी आनंदाने बेभान होत नाचू लागली, गिरक्या घेऊ लागली.. आजच ती राष्ट्रपतीकाकांना याबद्दल पत्र लिहिणार होती..

आयडिया पण किती किती सिंपल.. आता मॅगी बाजारात विकायला ठेवण्यास कोणाची काही हरकत नसणार होती.. फक्त मॅगीच्या पाकिटावर एक सूचना तेवढी लिहायची होती..
मॅगी खाणे आरोग्याला हानीकारक आहे!
Eating Maggy is injurious to Health.

- ऋन्म्या

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आईशपथ, माझ्या मुलीने मला हाच प्रश्न विचारला परवा, 'जर मॅगी तब्येतीला वाईट आहे म्हणून त्यावर बॅन आणला तसा दारू आणि सिगरेट वर का आणत नाहीत?'. आता बोला !!

मस्तच. Happy

ऋष्या,
मुलगी हुशार आहे आपली Happy
व्हॉटसपवर देखील मेसेज फिरत होता की सिगारेट दारू मधून असे काय जीवनसत्वे मिळतात जे त्यावर बंदी येत नाही. मलाही हे सुचायचे प्रेरणा तेच असावे. आणि तसेही व्यसनांच्या विरोधात लिहिणे हा माझा आवडीचा विषय आहे.

बन्डु, तुम्हाला मॅगी सुरक्षित पद्धतीने खायची आणखी एक सेफ पद्धत सांगतो.

ही पद्धत माझ्या फार्मसी शाखेच्या एका मैत्रीणीने मला आजच व्हॉटसपव पाठवली आहे.

Those who still wants to eat maggi just add dilute HCl in it...

Lead will be precipitated but some will remain in the solution...

So, pass H2S gas, a black lead precipitate will be obtained...

Filter out the black precipitate and add NaOH to resulting solution for neutralization of the solution....

Also, the heat released during neutralization will cook maggi...

बाकी आपापल्या रिस्कवर हे वेगळे सांगायला नको
Happy

Those who still wants to eat maggi just add dilute HCl in it...

Lead will be precipitated but some will remain in the solution...

So, pass H2S gas, a black lead precipitate will be obtained...

Filter out the black precipitate and add NaOH to resulting solution for neutralization of the solution....

Also, the heat released during neutralization will cook maggi...

<<
थोडक्यात काय, तर थोडं लिंबू पिळा. उकडलेलं अंडं त्यात घाला, अन मग जस्ट चिमूटभर सोडा. फिनिस. लिंबू इज अ‍ॅसिड. अंडं उकडून हायड्रोजन डायसल्फाईड ग्यास येतो (म्हणून चांदीच्या भांड्यात उकडलेली अंडी ठेवत नाहीत, इयत्त्ता ८वी केमेस्ट्री : शा.का.द्या. मला पैकीच्या पैकी मारकं.) इनो मधे NaOH ऐवजी NaHCO3 असतं. न्यूट्रलायझेशनला चालतं.

लिंबू पिळल्यास HCl न्यूट्रलाईज करत बसायची गरज नाही. Wink

सही ईब्लिस.. आपली पोस्ट त्या फार्मस्यूटीकल मैत्रीणीला उलट फेकून मारतो आणि तिला हक्काबक्का नूडल्स करून सोडतो. (आपली परवानगी गृहीत धरतो :). )

वरील फॉरवर्ड विषयी

आम्ले (अ‍ॅसिड्स) हे उत्तम डिहायड्रेटिंग कारक असतात, खासकरून तृणधान्ये, साखर यांच्यावर त्यांची क्रिया जबरदस्त प्रमाणात होते. वरील कृती केल्यास मॅगीच्या मुख्यत्वे तृणधान्याने बनवलेल्या नूडल्स मधून पाण्याचा सर्व अंश निघून फक्त कार्बन अर्थात कोळसा उरेल. मग कोळसा खाणार का?

बाकी तुझ्या इतक्या चांगल्या जमलेल्या लेखावर असे अनावश्यक फॉरवर्ड्स न टाकलेलेच उत्तम!

मस्त रे ऋन्मेऽऽष .
लेख छान आहे . आयडियाची कल्पना पण भारी.

( त्या फिल्मी लोकांना सोडलेस तर चांगला लेखक आहेस)

https://www.facebook.com/rajan.houzwala/posts/1107327579282946?fref=nf
ही श्टोरी इथे आज सापडली.

>>>>>

हायला साहित्यचोरी Happy

आपण त्याखाली मायबोली लिंक दिलीत हे चांगले केले, धन्यवाद Happy

..

ईतर प्रतिसादांचेही धन्यवाद Happy

MAGGI BAND HONYA CHE KAARAN

Nakki vacha

नमो सरकारने वारंवार स्विझर्लंड सरकारला भारतामधील काळा पैसाधारकांची नावे जाहीर करण्याची विनंती केली.... पण दर वेळेस त्यांनी ठेंगा दाखवला....पण स्विझर्लंड सरकारला कल्पना नाही नमो हि काय चीज आहे ... जन्मजात व्यापारी आणि त्यात राजकारणी असल्यामुळे ह्या माणसाला कोणाला आणि कुठे पाचर मारायची हे बरोबर ठावूक आहे. 

NESTLE हि FOOD PRODUCT मधील जगातील नंबर एक कंपनी .... ती आहे स्विझर्लंडची.... ह्या कंपनीवर स्विझर्लंडचे बरेच अर्थकारण अवलंबून आहे ..... हीच कंपनी भारतामध्ये 'मॅगी' विकून करोडो रुपये कमावते. आता भारतामधून मॅगीच हद्दपार केले आणि भारताने स्विझर्लंड ठासून ठेवली ... असो म्हणतात ना नाक दाबले कि तोंड उघडते..... आत्ता स्विझर्लंडवरून काळा पैसा धारकांची नावे जाहीर झाल्यास आश्चर्य वाटायला नको. ...मान गये मोदीजी आपको ..!

This is a what's app forward. Found it to be logical hence posted it here. We will know the result hopefully soon enough.

ऋन्मेश तुमच्याशी अगदि सहमत.
बाप रे अगदि खराय! हे असच होणार आहे.
मस्तच लिहिलय. लिहीण्याची स्टाइल आवडलि. लहान मुलाशी बोलत बोलत कसं त्याला पटकन लस टोचतात तसच काहीस...

काही अत्यंत मुर्ख लोकांनी बनवलेला व्हॉट्सप मेसेज आहे. यावर विश्वास ठेवणे म्हणजे स्वतःच्या अकलेचे दिवाळे वाजवून घेणे

असो

धन्यवाद

ऋन्मेऽऽष . मस्त लिहिलंय.तुझ्या लिखाणाची शैली मला आवडते.

Pages