तडजोड

Submitted by कमलेश पाटील on 9 June, 2015 - 02:56

दाटून येतं बरंच काही पण सुचत मात्र काहीच नाहीय.अगदी कोंडी झालीय स्वतःची आणी आयुष्याची पण.दररोज ठरतं नव्याने सुरुवात करायची पण त्यासाठी कुठेतरी पुर्णविराम द्यावा लागतो....पण कुठे हेच ठरत नाहीय.

माझं झालय असं की स्वतःभोवती मी कुंपण घातलंय. कोणाच माहीत नाही पण घातलंय.मग गाताना कसं समेवर येण्यासाठीचा अट्टाहास असतो न अगदी तशीच माझी धडपड चालू असते.धडपड कसली हे तर स्वतःच स्वतःला फसवणं.

कधी कधी वाटतं कोणाशीतरी पोट भरून गप्पा माराव्यात तर कधी कधी वाटतं सगळ्या जगपासुन नाळ तोडून दूर हीमालयात जावं.दुसरा पर्याय फक्त बोलायलाच हं. तेवढा दम किंवा त्याग नाहीय माझ्यात आणी तो सहजासहजी कोणाच्यातच नसतो.असंत फक्त जगाला वेडं ठरवत स्वतःच वेड्यात निघणं.हेच काय ते त्रिकालबाधित सत्य.

लग्नाच्या मांडवात कोडकौतूक करुन घेणार्‍या दोघाही नवरा बायकोला माहीत असतं की हा सगळा फार्स आहे.काही क्षणांच अप्रुप असतं मनात आणी मग त्याच आठवणींवर तरून नेतो आपण आयुष्य.सरबतात मीठ घालून चव आणल्यासारखं. प्रत्येक ठिकाणी ही तडजोड असतेच की एखाद्याला आपलं मानायचं, त्याचासाठी साखरेसारखं विरघळून जायचं.गोडी संपली की सार्‍या आठवणींच मीठ करून बेचव आयुष्याला चव आणायची............

क्रमशः.........

Group content visibility: 
Public - accessible to all site users