महादजी शिंदे यांचा वीर पराक्रम

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 4 June, 2015 - 12:11

औरंगजेबाच्या मृत्युपासून उत्तर भारतातले मुस्लीम राजेरजवाडे,मुल्ला-मौलवी आणि सर्वसामान्य मुस्लीमाला हे जाणवत होते की मुस्लीम राजवट संपली,मुस्लिमांना फ़ौजेत,नोकर्‍यात जे प्राधान्य होते ते गेले. याचे कारण शोधताना मुस्लिम धर्मापासून ढळल्याने हे झाले आणि मोगलांचा हिंदु सरदार फ़ौज पदरी ठेवण्याने झाले हा शोध मुल्ला-मौलवींनी लावला.
ह्या विचाराचा प्रमुख होता शहा वलीलुल्ला [इ.स. १७०३ ते १७६२. हा सर्वसाधारणपणे जमाते इस्लामी /सौदी अरबियातले वहाबी तत्वज्ञान/देवबंद मधले दार-उल-उलुम यांच्या मुलतत्ववादी विचारांचा होता. ही सर्व ह्याच शहा वलिलुल्ला आणि अब्दुल वहाब यांच्या विचारांची २०/२१ व्या शतकातली अपत्ये आहेत.
याने उत्तरेच्या सर्व मुसलमानांना काफ़िरांचा आणि त्यांच्या राज्याचा [यात मराठे/शीख/राजपुत/जाट सगळे आले] नाश करा इ. शिकवायला सुरुवात केली.

या शहा वलीलुल्लाने मुसलमांनामध्ये भड्कवायला सुरुवात केली .

मग त्याने आणि नजीबने अहमदशाहा अबदालीला भारतात येउन मुस्लिम मुलतत्ववादी राज्य दिल्लीला स्थापन करण्याचे आवाहन केले. शहा वलीलुल्लाचे हे पत्र मुळातुन वाचण्यासारखे आहे. या आधी त्या अबदालीने १७४८,१७५०,१७५१,१७५६ साली भारतावर आक्रमण केले होते
या सगळ्यामध्ये नजीब अर्थात नजीबुदौल्ला/नजीबखान हा प्रमुख होता उत्तर भारतात मराठ्यांविरुध्द लोकमत उभे करणे आणि मुस्लिम एकजूट करणे या हा आघाडीवर होता.
हा अफगाण रोहिला पठाण होता ,१७४३ मध्ये भारतात आला आणि मोगलाकडे सरदारी करत होता. अहमदशाह अब्दालीशी याचे फार जुने लागेबांधे होते आणि १७५७ मध्ये जेंव्हा अब्दालीने दिल्ली काबीज केली तेंव्हा हा अब्दाली सामील झाला.
मग त्याने नजीबाबाद हे शहर उत्तर प्रदेशात वसविले आणि तो जवळजवळ स्वतंत्र झाला .त्याला आणि वलिलुल्लाला मराठ्यांचा नाश हे एकच ध्येय होते.

मराठे जेंव्हा पानिपतात हरले ,तेंव्हा वाचलेले मराठी सैनिक जीव वाचवून छोट्या छोट्या समुहात महाराष्ट्राकडे पळत असतांना त्याना वाटेतल्या खेड्यापाड्यात सुड म्हणून लूटले गेले आणि मारले गेले.

अर्थात पानिपतचे युध्द मराठे लढले म्हणून आजचा भारत अस्तित्वात आला. कारण या युध्दात अहमदशहा अबदालीचे इतके जबरदस्त नुकसान आणि प्राणहानी झाली की तो हाय खाउन परत गेला. पानिपतची लढाईसुध्दा अहमदशहा अब्दालीने अक्षरशः जेमतेम केसाच्या फरकाने जिंकली.अफ़गाणी सैन्याचीही फार कत्तल झाली.

तो परत गेला आणि त्याने पुन्हा भारताकडे बघीतले नाही. पानीपतची लढाई जिंकल्यावर त्याला नानासाहेब पेशवे मोठी फौज घेउन येत आहे ही बातमी कळल्यानतंर तो घाईघाईने परत गेला आणि जातांना दिल्लीच्या मोगल बादशहाला सगळ्यांनी मानावे असा प्रेमळ[???] निरोप देउन गेला.

तो गेल्यावर शीख जे पानीपतच्या युध्दात तट्स्थ होते त्यांनी उठाव करुन लाहोरमधला अब्दालीच्या सुभेदाराची कत्तला केली.त्यांमुळे अहमदशहा अब्दाली १७६४ आणि १७६७ मध्ये भारतात आला पण आधीच्या प्रचंड लढाईतल्या हानीमुळे तो लाहोरच्या पुढे आला नाही. त्याने पुन्हा मध्य भारताकडे बघीतले नाही.
जर मराठे पानिपताला लढले नसते तर अहमद्शहा अबदालीने दूसर्‍यांदा दिल्ली जिंकली असती.[ पहिल्यांदा १७५७ मध्ये] आणि या वेळेला त्याचा सल्लागार आणि धर्मगुरु शहा वलीलुल्ला होता. शहा वलीलुल्ला हा अतिशय प्रभावी मुल्ला होता .त्यामुळे उत्तर भारतात तालिबान सारखे अतीशय कडवट मुस्लिम राज्य आले असते आणि मग भारतभर पसरले असते.कोणास ठाउक याचा पुढे इतिहासावर काय परिणाम झाला असता.

नजीबउद्दौलाचा सुड महादजी शिंद्यांनी घेतला. पानीपतावर झालेल्या पराभवात महादजी शिंदेही जखमी अवस्थेत पळाले होते.त्यानतंर जेंव्हा त्यांनी उत्तर भारत ताब्यात आणला आणि दिल्लीवर आपला कब्जा बसवला.
१७७२ साली त्यांनी नजीबाबादवर हल्ला चढविला तेंव्हा नजीब उदौल्ला १७७० मध्ये मृत्यु पावला होता .त्या मुलगा झपिटाखान नजीबाबाद सोडून पळाला. महादजी शिंदे म्हणाले की नजीब मेला आमचा हिशोब चुकवायचा राहून गेला.

महादजी शिंद्यानी नजीबच्या कुटुंबातल्या बायका,मुले,आबालवृध्द सगळ्यांची कत्तल केली आणि नजीबची कबर खणून त्याची हाडॆ आगीत भस्म केली.आणि त्याचा राजवाडा समूळ पाडला.
१७८२/८३ साली महादजी शिंद्यांनी लाहोरवर हल्ला चढवून ते ताब्यात आणले. त्या वेळेस त्यांना कळले की मूळ सोमनाथचे देऊळ जेंव्हा पाडले तेंव्हा त्याची चांदीचे सुंदर दरवाजे नेउन गझनीच्या मोह्मदाने लाहोरच्या मशिदीला लावली.
महादजी शिंद्यानी ते दरवाजे काढून आपल्या राजधानीत आणली.
त्यावेळेस सोमनाथचे देऊळ हिल्याबै होळकर सोमनाथचे नवीन मंदिर जुन्या अवशेषापासून थोडे दूर बांधत होत्या .
महादजी शिंद्याची फार इच्छा होती की हे दरवाजे परत सोमनाथच्या नवीन मंदिराला लावावे.
पण मंदिराच्या मूर्ख पुजाऱ्यांनी सांगितले की हे दरवाजे मशिदीत लावून अपवित्र झाले आहेत ,या फुटकळ कारणासाठी ते दरवाजे लावायला मुर्खांनी नकार दिला. अतिशय दुख्खी आणि उद्विग्न मनस्थितीत महादजी शिंद्याने मग ते दरवाजे उज्जैनच्या महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि गोपाल मंदिराला लावले जे तिथे आजही बघायला मिळतात.

आता सोमनाथ मंदिराची कहाणी बघू यात....

१]सोमनाथचे पहिले मंदिर हे भगवान श्रीकृष्णाने बांधले अशी आख्यायिका आहे.
२]वल्लभीच्या यादव राजांनी दुसरे मंदिर बांधले .
३]इ.स. ७२५ मध्ये सिंधचा अरब सुभेदार जुनैद याने हल्ला करून हे मंदिर पडले.
४] गुजरातचा प्रतिहार राजा नागभट्ट दुसरा याने हे मंदिर पुन्हा इ.स. ८१५ मध्ये नवीन लाल दगडाचे बांधले.
५] इ.स. १०२४ मध्ये गझनीच्या महमुदाने हल्ला करून हे मंदिर पाडले आणि ते चांदीचे दरवाजे नेले.
६]परमार राजा भोज याने चंदनाचे लाकडी मंदिर इ.स. १०२६ मध्ये बांधले.
७] कुमारपाल राजाने मग इ.स. ११५६ मध्ये दगडाचे मंदिर बाधले.
८] अल्लाद्दीन खिलजीने या मंदिरावर पुन्हा १२९६ मध्ये हल्ला करून ते पाडले.तेंव्हा त्याने ५०,००० लोकांची कत्तल केली.
९]सौराष्ट्राचा राजा महिपाल्देव याने ते मंदिर इ.स. १३०८ मध्ये पुन्हा बांधले.
१०] इ.स. १३७५ मध्ये मुझफ्फरशाह गुजरातचा सुलतान याने परत पाडले.
११] इ.स . १३८७ मध्ये सौराष्ट्र राजांनी ते परत बांधले ..
१२] इ.स. १४५१ मध्ये गुजरातचा सुलतान मेहमूद बेगडा याने ते परत पाडले.
१३] इ.स.१५०० च्या आसपास हे मंदिर पुन्हा बांधले पण छोटेसे .
१४] इ.स. १७०१ मध्ये औरंगजेबाने सैन्य पाठवून हे मंदिर पाडले आणि त्या जागेवर मशीद बांधली.
१५] इ.स. १७८३ मध्ये अहिल्याबाई होळकर, पेशवे आणि नागपूरचे भोसले यांनी मिळून या मशिद्च्या जवळ नवीन मंदिर बांधले.
१६] १९४७ मध्ये सोमनाथ जुनागड संस्थानात येत असे आणि त्या नवाबाने पाकिस्तानला विलीन होण्याच्या करारावर सही केली. पण भारताने नोव्हेंबर १२, १९४७ रोजी सैन्य पाठवून हे संस्थान ताब्यात घेतले.
वल्लभभाई पटेलांनी मग हे मंदिर पुन्हा बनविण्याचे ठरविले.
ते आणि कन्ह्यालाल मुन्शी गांधीजींकडे त्यांचा आशीर्वाद मागण्यासाठी गेले .गांधीजीनी अतिशय आनंदाने या कार्याला आशीर्वाद दिला की हे भारताच्या पुनरुथ्थानाचे प्रतिक होऊन राहील.

फक्त गांधीजीनी सांगितले की या कार्यासाठी सरकारी पैसा मागू नका कारण या देशाच्या हिंदूमध्ये आपल्या वैयक्तिक देङ्ग्यातुन हे मंदिर उभे करण्याची धमक पाहिजे. हे काम समाजाचे आहे सरकारचे नाही. बाकी मंदिर बनविण्यासाठी कायद्याची जी काय मदत लागेल ती सरकार देईल .
मग तिथे असलेली मशीद सरकारी हुकुमाने उचलून थोड्या अंतरावर नेली आणि तेथे नवीन मंदिर बाधण्यात आले.

तेंव्हा महादजी शिंदे आणि सरदार वल्लभभाई पटेलांचे हे खरे हिदुत्व वंदनीय आहे.....

संदर्भ -अजीत सर , सौदी अरेबिया

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वाह ! सुंदर माहिती ..
सोमनाथ मंदिराला बराच इतिहास आहे म्हणायचा ..

महादजी, सरदार पटेल यांचे कार्य उल्लेखनीय..

लेखाबद्दल धन्यवाद ...

<<<<<<<< शहा वलीलुल्ला हा अतिशय प्रभावी मुल्ला होता .त्यामुळे उत्तर भारतात तालिबान सारखे अतीशय कडवट मुस्लिम राज्य आले असते आणि मग भारतभर पसरले असते.कोणास ठाउक याचा पुढे इतिहासावर काय परिणाम झाला असता. >>>>>>>>>
कल्पना करूनच नको वाटत .. त्यांचे अनंत उपकार आहेत आपल्यावर जांच्या मुळे हे टळलं ..
शि.सा.न. त्या वीरांना ..

चांगला लेख.
त्यावेळेस सोमनाथचे देऊळ हिल्याबै होळकर सोमनाथचे नवीन मंदिर जुन्या अवशेषापासून थोडे दूर बांधत होत्या . >>> अहिल्याबाई होळकर असं करा इथे.

Chhaan mahitee, somnathache mandir anek veLaa luTale gele Te vaachale hote, paN evaDhe details maahit navhate.

] १९४७ मध्ये सोमनाथ जुनागड संस्थानात येत असे आणि त्या नवाबाने पाकिस्तानला विलीन होण्याच्या करारावर सही केली. पण भारताने नोव्हेंबर १२, १९४७ रोजी सैन्य पाठवून हे संस्थान ताब्यात घेतले.
वल्लभभाई पटेलांनी मग हे मंदिर पुन्हा बनविण्याचे ठरविले.
ते आणि कन्ह्यालाल मुन्शी गांधीजींकडे त्यांचा आशीर्वाद मागण्यासाठी गेले .गांधीजीनी अतिशय आनंदाने या कार्याला आशीर्वाद दिला की हे भारताच्या पुनरुथ्थानाचे प्रतिक होऊन राहील.

फक्त गांधीजीनी सांगितले की या कार्यासाठी सरकारी पैसा मागू नका कारण या देशाच्या हिंदूमध्ये आपल्या वैयक्तिक देङ्ग्यातुन हे मंदिर उभे करण्याची धमक पाहिजे. हे काम समाजाचे आहे सरकारचे नाही. बाकी मंदिर बनविण्यासाठी कायद्याची जी काय मदत लागेल ती सरकार देईल .

काही जणांकरीता महत्त्वाचे वाक्य आहे

कारण या युध्दात अहमदशहा अबदालीचे इतके जबरदस्त नुकसान आणि प्राणहानी झाली की तो हाय खाउन परत गेला.

....

नेमकं काय नुकसान झालं अब्दालीचं ? मिळालेली लूट घेउन अब्दाली त्याच्या गावी गेला व सुखात राहिला.

पानिपतच्या युद्धानंतर अब्दाली व पेशवे यानी एकमेकाना पत्रे पाठवुन व भेटवस्तू पाठवुन सांत्वन केले होते ना ? पानिपत हे दु:स्वप्न मानुन पेशव्यानी विसरुन जावे असा सल्ला दिला होता ना ?

http://www.esakal.com/esakal/20110113/4725652151994611341.htm

सामान्यानी युद्ध करुन जीव सोडायचे व मंत्र्यांनी एकमेकाना साड्या व मिठाया पाठवायच्या !

सामान्यानी युद्ध करुन जीव सोडायचे व मंत्र्यांनी एकमेकाना साड्या व मिठाया पाठवायच्या !
>>

बाबाहो,

अर्धवट आणि चुकीचाच अर्थ काढा! आणि दाटून लिहा ... चांगल आहे!

महादजीनी १७६१ मध्ये गमावलेलं सगळ कमावलं होत! उत्तर भारतात मराठेशाहीचा दरारा पुन्हा बसवणाऱ्या शिंदेंना प्रणाम!

>>महादजीनी १७६१ मध्ये गमावलेलं सगळ कमावलं होत! उत्तर भारतात मराठेशाहीचा दरारा पुन्हा बसवणाऱ्या शिंदेंना प्रणाम!<<
परंतु दुर्दैवाने, हल्ली महादजी शिंदे कोणाला आठवत नाहित, त्यांच्या शौर्यकथेवर कादंबर्या लिहिल्या जात नाहित, लेख लिहिले जात नाहित, टिव्हिवर मालिका प्रसारीत होत नाहित. जेत्यांचं उदाहरण तरुणांसमोर ठेवण्या ऐवजी चुकिच्या रणनितीमुळे युद्ध हरलेल्यांचं उदात्तीकरण करण्यातच आम्ही समाधान मानतो - हिच मराठ्यांची शोकांतीका आहे...

छान माहितीपूर्ण लेख. इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
इतिहासाचा असा तपशील आम्हाला (नेहरू/गांधी प्रणित आधी निधर्मी नंतर सर्वधर्मसमभावी वगैरे राजवटीत) शाळाकॉलेजात शिकविलाच नाही.

महादजी शिंदे म्हणजे हेच ना ज्यांना पानिपतच्या युद्धात पाय गमवावा लागला?
पुण्यातील वानवडी(?) येथील शिंदे यांची छत्री (समाधी) याच महादजी शिंदे यांची आहे ना?
(अगदी लहानपणाचे आठवते की वडील मुद्दामहुन ती छत्री दाखवायल व तिथे नमस्कार करायला घेऊन गेले होते)

टिव्हिवर मालिका प्रसारीत होत नाहित. >> किती खोटं बोलाल लिंबुकाका ?? the great maratha या शीर्षकाची एक मालिका DD National वर दाखवली गेली होती. उगा आपलं जिथे तिथे नेहरु-गांधींना झोडपायचं कां ?? वर वाचलं नां?? >वल्लभभाई पटेलांनी मग हे मंदिर पुन्हा बनविण्याचे ठरविले.
ते आणि कन्ह्यालाल मुन्शी गांधीजींकडे त्यांचा आशीर्वाद मागण्यासाठी गेले .गांधीजीनी अतिशय आनंदाने या कार्याला आशीर्वाद दिला की हे भारताच्या पुनरुथ्थानाचे प्रतिक होऊन राहील.

फक्त गांधीजीनी सांगितले की या कार्यासाठी सरकारी पैसा मागू नका कारण या देशाच्या हिंदूमध्ये आपल्या वैयक्तिक देङ्ग्यातुन हे मंदिर उभे करण्याची धमक पाहिजे. हे काम समाजाचे आहे सरकारचे नाही. बाकी मंदिर बनविण्यासाठी कायद्याची जी काय मदत लागेल ती सरकार देईल . >>

भाजपाचे दिवस आलेत. उद्या यांच्या शेतात पाउस नाही पडला तर ढगात बसुन गांधीजीनी अडवला व पाकिस्तानला पाठवला असेही हे बोलतील.

भाजपाचे दिवस आलेत. उद्या यांच्या शेतात पाउस नाही पडला तर ढगात बसुन गांधीजीनी अडवला
>> ह्यावरून आठवले … भाजप्यांनी नाही पण आद्यसेक्युलरवादी सागरिका घोसे बैइन्नि पाउस कमी पडणार म्हणून मोदींना दोष जरूर दिलाय Lol

जेत्यांचं उदाहरण तरुणांसमोर ठेवण्या ऐवजी चुकिच्या रणनितीमुळे युद्ध हरलेल्यांचं उदात्तीकरण करण्यातच आम्ही समाधान मानतो!
>>
पराभूताची मानसिकता तशीच असते. आम्ही कसे आणि का हरलो ह्याच रडगाणं कानांना खूप आवडत. त्यातही दुसर्या राजांनी मदत नाही केली, किंवा ऐनवेळी कसा दगा दिला ह्याचा अजून सुरस गोष्टी Lol असो, तो हा विषय नाही.

>>> टिव्हिवर मालिका प्रसारीत होत नाहित. >> किती खोटं बोलाल लिंबुकाका ?? <<<<<
टीव्हीवर मालिका येत नाहीत हे कुणी लिहीलय ते वाचायचे कष्ट तरी घ्या हो माठ टीव्हीकाका.......
उगाच आपल उचलला कीबोर्ड लागा बदडायला अस करू नका.
मी फक्त इतकेच लिहीले की "इतिहासाचा असा तपशील आम्हाला (नेहरू/गांधी प्रणित आधी निधर्मी नंतर सर्वधर्मसमभावी वगैरे राजवटीत) शाळाकॉलेजात शिकविलाच नाही""
तर ते इतके झोम्बावे? ...... झोम्बणारच म्हणा... ऑब्व्हियसली! Proud

limbutimbu,

>> इतिहासाचा असा तपशील आम्हाला (नेहरू/गांधी प्रणित आधी निधर्मी नंतर सर्वधर्मसमभावी वगैरे राजवटीत)
>> शाळाकॉलेजात शिकविलाच नाही

अगदी सहमत. आता हेच पहा ना, मोगलांचं राज्य अस्सल भारतीय आहे असं हे निधर्मी मानतात. मग या न्यायाने स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान महादजी शिंदे ठरतात. नेहरू नव्हेत. कुठल्याही निधर्मी विचारवंताने हे सत्य मांडलेलं दिसंत नाही.

निधर्म्यांना विशिष्ट कुटुंबाची चापलुशी केल्याविना चैन पडत नाही.

आ.न.,
-गा.पै.

इतिहासाचा असा तपशील आम्हाला (नेहरू/गांधी प्रणित आधी निधर्मी नंतर सर्वधर्मसमभावी वगैरे राजवटीत) शाळाकॉलेजात शिकविलाच नाही.>>>>>>>>> खरे आहे शाळेत इतिहासाचा तपशील शिकवलाच जात नाही शिवाजी राजांचा सर्वत्र जयजयकार सुरु असतो त्यांच्या मृत्यू १६८० साली झाला. त्यानंतर आसपास झाडझूडप वाढलेली सर्वत्र जंगल माजलेली त्यांची समाधी ज्योतिबा फुलेंनी शोधून काढली तिथे साफसफाई केली . महाराजांना मृत्युनंतर जवळपास २०० वर्षे दुर्लक्षित करणारा समाज कोणता होता ? ह्याचाही इतिहास शाळेत शिकवला गेला पाहिजे

एक वर्श एक महिना झाला.

पण अजुनही मोदीवाले गांधी नेहरु विसरु शकले नाहीत.

Proud

नथ्थुरामा , तुझे बलिदान वाया गेले रे !