रेल्वे तकरार माहिती हवी आहे.

Submitted by जय@ on 2 June, 2015 - 08:34

IRCTC च्या संकेत स्थळावरून मी २३ मे च्या अगस्तक्रांती राजधानीचे (मुंबई -दिल्ली ) तिकीट बुक केले. शनिवार २३ मे ला पालघरवरून मुंबई सेंटर प्लाटफार्म पोहचलो. मुंबई-दिल्ली अगस्तक्रांती राजधानीचे रद्द करण्यात आली आहे अशी announcement चालू होती.( गुज्जर आंदोलनामुळे) ती रात्र मुंबईला राहिलो . त्या रात्रीतच तीनपट पैसे देऊन air ticket book केले आणि दुसऱ्या दिवशी दिल्लीला पोहचलो. दहा दिवस नैनिताल,मुक्तेश्वर,कौसानी,रानीखेत, जिमकॉर्बेट असा दवरा करून घरी पोहचलो.(मायबोलीकर आणि जिप्सी यांच्या मार्गदर्शनाने)
घरी येउन कॅन्सल झालेल्या गाडीचे पैसे बँक खात्यात जमा न झाल्याने रेलवे customer care ला फोन लावला. customer care अधिकार्याचे म्हणण्यानुसार मी ७२ तासाच्या आत TDR submit करावयास हवा होता.
(What is TDR – TDR means Ticket Deposit Receipt and it can be filed online through IRCTC website. Ticket Deposit Receipt can be submitted to claim refund if customer was not able to perform the journey due to any /or the following reason.
TDR – Ticket Deposit Receipt
•Train Cancelled By Railways and Passenger Not Travelled.)
रेलवेने कॅन्सल केलेल्या गाडीची सुचना ग्राहकाने तुम्हाला का द्यावी ? जर गाडी रेलवेने कॅन्सल केली आहे, गाडी दिल्लीला गेलीच नाही तर रेल्वेने स्वताहूनच ग्राहकाला पैसे परत करावयास हवे.....
बऱ्याच खडाजंगी नंतर हि पैसे परत मिळतील असे मान्यच करावयास अधिकारी तयार झाला नाही. कंटाळून त्यानेही irctc फोन लावा असे सांगून फोन ठेऊन दिला. irctc customer care ला फोन लावला "मी TDR submit करावयास नेटवर्क मधेच नव्हतो तर मी TDR submit कुठून सबमिट करणार" पण त्याचे हि पुन्हा तेच .....
आता मी काय करावे म्हणजे माझे पैसे मला परत मिळतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेल्वेचा तसा नियमच असेल ( आणि त्याला गाडी रद्द होणे असा अपवाद स्पष्टपणे केलेला नसेल ) तर परतावा मिळणार नाही. आपण रेल्वेचे तिकिट खरेदी करतो त्यावेळी त्यांचे सर्व नियम ( कंडीशन्स ऑफ कॅरेज ) स्वीकारतो, असे गृहीत धरले जाते.

ग्राहक मंचात तक्रार करता येईल. पण त्याला सर्व पुरावे जोडावे लागतील. त्यात गाडी रद्द झाल्याचा पुरावाही द्यावा लागेल.

दिनेश दा, मी irctc ला केलेला mail आणि त्याचे मिळाले उत्तर.

To
IRCTC,
I, jaydeep vinod patil, hereby want to share my very bad experience
regarding rules and service provided by IRCTC . I had booked 5 tickets
of mumbai to delhi august kranti rajdhani express on 23 rd may 2015.
But unfortunately the train got cancelled by the railway department
itself. The railway had all the details including mobile no and e mail
id of mine but did not take any trouble to at least inform me about
this. When we went to station for boarding , then after enquiry we
came to know about cancellation of train. Because of this we have to
book a plane ticket on emergency basis as our future program was
already fixed. In this we went through mental ,physical trouble and
financial loss just because of this last minute changes done by indian
railway.
our program was already fixed and we were in remote place for next 6
days where there was no internet connectivity was available. So it was
just next to impossible for us to file TDR on time for cancellation of
our ticket. So now railway is refusing to refund our money of ticket
cancellation. First of all, the train was cancelled by railway
department itself and they didn’t even bother to inform us about it.
And now denying to make the payment for cancellation is really
disgusting.
i called to customer care but they told refund process can not be
done. I am completely fed up with follow ups with IRCTC so please
refund my money earliest and show that IRCTC is there to help the
people and not to trouble them. Otherwise we will have to take this
matter to media to show manmani karbhar of IRCTC.
Hope you will cooperate with us.
My ticket and train details are as mentioned by your reply about
confirmation of my booking.

Dear Customer,

Kindly note that the TDR filing time limit is revised w.e.f. 1/7/2013 upto 2 hours of the actual departure of the train in case of confirmed etickets & within 3 hours of the actual departure of the train in case of RAC or partial WL e-tickets .

As the time for filing the TDR for refund has exceeded, we are unable to forward your case to Railways.

Thanks & Regards
Amrit Pal
Executive/etickets/IRCTC
etickets@irctc.co.in
www.irctc.co.in

जय, हा प्रकार मी पहिल्यांदा ऐकतोय. गंभीर प्रकार आहे जर गाडी रेल्वेनेच रद्द केली होती तर त्यांनी परतावा देणे क्रमप्राप्त होते. वरील विषयाशी निगडीत माहिती लवकरात लवकर प्राप्त करून येथे लिहिन.

मला झालेला मनस्ताप, आर्थिक नुकसान, पुढील कार्यक्रमाचा बट्याबोळ ते राहिले बाजूलाच पण साधे मी दिलेले पैसे हि रेलवे परत द्यावयास तयार नाही. नक्की भारतात लोकशाही आहे का?

नरेश माने,गुज्जर आंदोलना मुळे मुंबई-दिल्ली अनेक ट्रेन कॅन्सल झाल्या त्या सर्व ग्राहकांचे पैसे रेलवे खाऊन बसली आहे. तुम्हाला काही माहिती मिळाली तर नक्की कळवा.

बरीच जुनी गोष्ट आहे.. पण आमची ट्रेन एकदा रुट बदलून पुण्यात न येताच गेली होती... रुळ खचल्यामुळे रेल्वे डिपार्टमेंटनेच रुट बदलला होता.. तरी पण तेव्हा टीडीआर भरल्या नंतरच आम्हाला पैसे परत मिळाले होते..

चाणाक्ष वकील, इथे शब्दात पकडू शकेल. इथे ते अ‍ॅकच्यूल डीपार्चर असे म्हणताहेत. जे कधी झालेच नाही.

मूळ नियमांत ते शेड्युल्ड ( स्केड्यूल्ड ) डीपार्चर असू शकेल.

http://www.maayboli.com/node/17422 पैसे मिळालेच नाहीत कारण गाडी सुटली रात्री २.०० वाचता पण ऑफीशियल डिपार्चर टाईमच्या नंतर मी रिझवेशन कॅन्सल केले होते.

नितीनचंदजी, कमीत कमी तुमची गाडी शेगावला पोहचली तरी होती. पण माझ्या केस मध्ये तर संपूर्ण गाडीच रेल्वेने रद्द केली होती.

प्राथमिक लेव्हलच्या कस्टमर सर्विस बद्दल जर तुम्ही समाधानी नसाल तर सहसा त्यावरच्या लेव्हला पोहोचण्याचा पर्याय असतो. रेल्वेचाही असेल. मुंबईत असाल तर मध्य किंवा पश्चिम (जी असेल ती) रेल्वेच्या ऑफिस मधे जाउन बघा जमले तर.

हे अ‍ॅप्लाय करायला का उशीर झाला त्याबद्दल एखादे पत्र लिहून "विचार करावा" टाइप विनंती केलीत तर कदाचित फायदा होईल.

इतक्या लगेच हे करावे लागते हे अन्यायकारक आहे (कारण प्रवासी व्यक्ती ज्या ट्रीप ला जाणार असते ती पूर्ण झाल्यावर किमान एक आठवडा तरी दिला पाहिजे) पण आता तसा नियम असेल तर आत्ता तुम्ही त्याबद्दल काही करू शकणार नाही.

एक दुसरी शंका - रेल्वेने गाडीच रद्द केली तर यापेक्षा काही वेगळा नियम नाही का?

टीव्ही चॅनेल कडे जाण्याआधी सर्व "सरकारी" पर्याय वापरून पाहावेत असे वाटते.

फारएण्ड जी , मी मुंबई सेन्ट्रल रेलवे ऑफिस मध्ये आता पर्यंत दोन वेळा जाउन आलो. तिकीट खिडकी वरून काढलेले तिकीटाचे पैसे तुम्ही ३० दिवसाच्या आत तिकीट खिडकी वरून परत मिळू शकतात मात्र IRCTC मार्फत online तिकीट काढले असल्यास तुम्हाला ७२ तासाच्या आत online TDR सबमिट करणे बंधनकारक आहे. हेच उत्तर मिळते.
मार्गदर्शना बद्दल धन्यवाद.....!

जय@,

तुमची कैफियत पंतप्रधान कार्यालयाला सुद्धा पाठवा. त्यात अमृत पाल याची नावानिशी तक्रार करा. हा नियम कसा जाचक आहे ते लिहाच, शिवाय लाचखोरी होते आहे असा संशय व्यक्त करा.

I think the clause has been deliberately misinterpreted to harvest money असं वाक्य वापरा.

जे संपत्र पाठवाल त्याच्या विषयस्थानी COMPLAINT असं मोठ्या अक्षरात लिहा.

संपर्कासाठी इथे पुढील माहिती मिळेल : http://pmindia.gov.in/en/interact-with-honble-pm/

शुभेच्छा! Happy

आ.न.,
-गा.पै.