बिनधास्त जगा यार....

Submitted by योगेश चव्हाण on 2 June, 2015 - 01:36

मला नेहमी एक कुतुहुल आहे...
लहान मुल गोट्या...विटी दांडु..अस खेळत
असली की आपण त्यांना रागावतो...
त्याच्याहुन मोठी मुल चिंचा..आवळे ..पेरु..कैऱ्या.
.दगड मारुन पाडु लागली ..की आपण त्यांना
शिक्षा करतो..
तारुण्यात आलेली मुल..तारुण्यसुलभतेने प्रेमात
पडली की आपण त्यांना विरोध करतो...
मला एक समजत नाही...यातल काहीच ..कधीच
करायच नसत का??कींवा नक्की ते कोणत्या
वयात करायच असत..??का आपण स्वत: सोडुन
..इतरांनी ते करायच नसत??
त्या त्या वयात ..ते ते करण हे जर पुढची पिढी
बिघडण्याच लक्षण असेल ..अस वागण चुकीच
असेल..तर आपण श्रीकृष्णाच्या बाललीलांना
का नाही चुकीच मानत..??श्रीकृष्णाच्या
बाललीलांची ..त्याच्या रासक्रिडेची
लडीवाळ व्याख्यानं होतात..ती तर आपण
भक्तिभावाने ऐकतो..त्याच्या कृतींना
आध्यात्मक बैठक वगैरे देत त्यातला आंनद
लुटतो.आणि जे नैसर्गिक नाही..समाज
विघातक आहे..ये वर्षोनुवर्षे चालेलच कस??जर ते
नैसर्गिक आहे..तर पिढ्यानपिढ्या आपण
त्याला विरोध का करतो..??संस्कार हे
नकारात्मक ..विरोधीच असावेत का??या
विरोधामागच हे तर खर कारण नसेल ना ..की
नुकतात आपला नवरा मेला म्हणुन सासुन आपल्या
मुलगा ...सुनेच्या संबधात अडथळे निर्माण करत
रहावे..तस आपण आता यातल काही करु शकत
नाही..म्हणुन आपण मोठेपणाचा गैरफायदा घेउन
..पुढच्या पिढीला त्यांच्या सुखापासुन वंचित
करतो..??
तस नाही म्हणता तर हे तुम्हाला पटायला हरकत
नाही..
लहान मुलांनी चिंचा आवळे पाडलेच
पाहीजे..त्यांनी मैत्री आणि मारामाऱ्या
केल्याच पाहीजेत..त्याशिवाय त्याच बालपण
मोठेपणी आठवण्याइतपत अमर कस होईल..तसच
तरुणांनी अभ्यास केला पाहीजे..करिअर
सांभाळल पाहीजे..तसच पुन्हा मुळ जागी येता
येईल इतपत भरकटल पाहीजे..मी तर म्हणेन की
डोळे उघडे ठेउन हे सगळ केलच पाहीजे..प्रेम करण ही
तर त्यांच्या वयाची पद्धतच आहे..भले ते
चुकतील..तरी हरकत नाही..कारण चुक ह्या
शब्दाव्यतिरिक्त..तारुण्यातली चुक ह्या शब्द
समुहाला अन्यथा वेगळी शेडच राहणार नाही...
काही दिवसांपुर्वीप्रेमासंदर्भात एक कविता
ऐकली होती...
प्रेम करा तरुणांनो..
तारुण्य पुन्हा येत नाही
योग्य वेळी प्रेम केल तर..
म्हातारपण जळक लाकुड होत नाही
प्रेम करा अस..जस..
वारकऱ्याच वारीवर असत
दारुड्याच दारुवर असत..
व्यापाऱ्याच धंद्यावर असत
नि कोडग्या राजकारण्याच
सत्ता नि खुर्चिवर असत
अस प्रेम करा की..
प्रेमी युगुलं तुमच नाव घेतील
तुमच्या प्रेमाची प्रेमगीत नाही..
लोकगीत होतील..
-योगेश...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users