रसायन जिवनाचे ढवळून गेला !

Submitted by vilasrao on 31 May, 2015 - 14:01

प्रवाह काळाचा जवळून गेला !
रसायन जिवनाचे ढवळून गेला !

नसे दुख: तळाला न सुख काठाला
मनाचा खोल डोह नितळून गेला !

राजा तू का असा? मी रंकच बरा !
तू कसा पुढे पदर पसरून गेला !!

आजन्म 'न पिण्याची' शपथच घेतली !
प्याला रडता जसा विसळून गेला !!

शोधाया वेदना भटकला वेडा
'कवि' कोणी मला 'तो' कवळून गेला ! !

विलास खाडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users