माझी आई

Submitted by rakhee_siji on 26 May, 2015 - 11:28

प्रत्येकासाठी आई हे अगदी जिव्हाळ्याचं स्थान असतं. प्रत्येकासाठी आई हे एक दैवतच असतं.
माझ्यासाठीही माझी आई म्हणजे प्रेम आणि जिव्हाळा आहे.
कशी आहे माझी आई? साधी भोळी आम्हा मुलांवर प्रेम करणारी आणि माझ्या पप्पांना कायमच साथ देणारी .
मी घरातली धाकटी म्हणून सर्वांचीच लाडकी, आणि म्हणूनच कायमच आईच्या अगदी जवळ असणारी, आईच्या कायमच कुशीत असणारी. आईनी माझे खूप लाड केलेत, खूप कमी ती माझ्यावर रागावली असेल. मला एकच प्रसंग आठवतो जेंव्हा तिनी मला मारलं असेल. मी तिसरीत होते. माझी शाळा घराच्या जवळच होती आई रोज माझी शाळा सुटायच्या वेळेस दारात माझी वाट पाहत बसायची. एक दिवस मी परस्पर तिला न सांगता मैत्रिणीकडे गेले. ती इकडे वाट पाहत बसली आणि सगळ्या मुलांना विचारात होती. तिला कळल कोणाकडून तरी तशी तिने मला मारत मारत घरी आणले. घरी मी आणि ती दोघीही खूप वेळ रडत होतो.
त्यानंतर तिने माझ्यावर कधीच हात उचलला नाही.
आज माझ्या मुली शाळेतून पाच मिनिटे जरी उशिरा आल्यातर माझा काळजाचा ठोका चुकतो आणि मला आज कळतं कि आईचं तेंव्हा काय झालं असेल. तिनी मला नेहमीच अभ्यासात आणि काहीही करायला encourage केलं. तिला नेहमीच माझं खूप कौतुक आहे. मला माझ्याबद्दल जेवढा विश्वास नसेल त्याच्यापेक्षा जास्त तिला माझ्यावर विश्वास आहे.
आई हे अजबच मिश्रण असतं नाही? ती कधी मैत्रीण असते, कधी guide असते खुपदा shock absorber असते. सगळ्या जगाचा राग, वैताग आपण तिच्यावरच काढतो हो न?
माझी लेक आता वयात आली तेंव्हा तिची खूप चिडचिड होत होती. तिला काय करू सुचत नव्हत. माझ्यावर चिडली आणि म्हणाली you owe me mamma आणि मी शांतपणे तिच्या पाठीवर हात फिरवत होते. तेंव्हा मला कळलं आई होणे म्हणजे काय ते.
माझी आई खूपच सक्रिय आणि रसिक आहे. माझे आई पप्पा जीवन भरभरून जगतात मला याचा खूप अभिमान आहे. आणि तेच आमचे प्रेरणा स्थान पण आहेत. आई नेहमीच निरोगी होती मी तिला आजारी कधी पाहिलच नाही.
पण ऑगस्ट २००८ मध्ये राखी पौणिमेच्या दुसर्या दिवशी तिला उठताच येईना. त्याच्या आदल्या दिवशी आम्ही सर्व भावंड सणासाठी आईकडेच होतो. तिला वाटले अति कामामुळे, थकल्यामुळे असे असेल, पण पप्पा मात्र लगेचच तिला डॉक्टरकडे हॉस्पिटलला घेऊन गेले. डॉक्टरांनी दिवसभर खूप tests केल्या. डॉक्टर म्हणाले बर झाले वेळेत आणले म्हणून. तिला दुर्मिळ असा GB syndrome झाला होता. वर्षभर ती पलंगावर होती. डॉक्टरकडे जायला घाबरणारी माझी आई हे उपचार मात्र तिने शांतपणे करून घेतले, आणि आम्हालाच धीर दिला . ती परत चालू शकेल कि नाही असे वाटत असतांना ती आपल्या इच्छाशक्तीच्याबळावर वर्षभरात चालू लागली. आणि आता ती परत पप्पांबरोबर सहलींवर जाते. दोघे मिळून गच्चीवरती बागेत काम करतात. आई नाटक, सिनेमे बघते आणि आयुष्य भरभरून जगते.
आपण आपल्याच माणसांना कधी धन्यवाद देत नाही. आज आईचा ६३ वा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने मला सांगायचे आहे "आई खूप खूप thank you सगळ्याच गोष्टींसाठी. आणि वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छ्या"
आज देवाजवळ हेच मागणं आहे कि माझ्या आईला निरोगी आरोग्य , भरपूर आयुष्य आणि भरभरून सुख दे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.
आणि तुमच्या आईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
जीबी सिंड्रोममधून पूर्णं बरं होऊन आयुष्य पुन्हा तितक्याच आनंदाने जगत असल्याबद्दल अभिनंदन.

खुप छान वाटलं. मनोधैर्य असेल तर कुठलाही आजार पळवून लावता येतो.. निदान त्याचा त्रास तरी कमी होतो.
त्यांना आम्हा सर्वांकडून शुभेच्छा !

आवडले. तुमच्या आईना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. त्यान्ची हरेक मनोकामना पूर्ण होऊ दे आणी उत्तम आरोग्य लाभु दे.

मनापासून सर्वाना खूप खूप धन्यवाद. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आईला नक्की देईन.
खूप छान वाटले इतके प्रतिसाद पाहून, खरंच मन भरून आले.