भाऊबंध

Submitted by भागवत on 25 May, 2015 - 03:07

दिवाकर आणि नरेश हे दोन चुलतभाऊ एका निसर्गरम्य गावात वाढली. गाव तस लहान...एका बाजूने वाहत जाणारी नदी... दुसर्‍या बाजूला डोंगर... चारही दिशेला असलेली खेडी... जवळच असलेले २ तलाव... मेन रोडमुळे वाहनाची वर्दळ... आणि मधोमध मंदिर...

त्यांची घरे एकमेकांच्या बाजूस होते. तसे तर एकमेकांची ओळख सांगताना ते फक्त हा माझा भाऊ आहे अशी करून देत. चुलत वा सख्खे भाऊ असे मनात सुध्दा येत नसे. ते बालपणाचे सुरेख दिवस होते. सगळी भावंड मिळून खेळत, अभ्यास करत व दंगा-मस्ती करून मस्त पैकी एकत्र जेवण करत असत. दोघा मधला ‘बॉन्ड’ खुपच छान होता. त्यांच्या सोबत अजूनही भावंडे होती पण दोघं मिळून खुप धिंगाणा, गोंधळ करत. पूर्ण गाव भर फिरून येताना खुपच मजा येत असे.

दिवाकर हा शांत आणि कमी बोलणारा होता. त्याला फक्त २-३ मित्र होती. त्यांचे जग म्हणजे नरेशशी मैत्रीच होती. नरेश बोलका आणि मनमिळाऊ असल्यामुळे तो सगळ्याचा लाडका होता. तो सगळ्या सोबत मिळून-मिसळून रहायचा. त्याला खुप मित्र होती. मोठा नरेश खुपच अभ्यासु आणि हुशार होता. बालपणाची ते सुखी ३-४ वर्षे भुरकण उडून गेली. तो आत्ता नावाजलेल्या स्कूल शाळेत दाखल झाला. नरेश हॉस्टेल मध्ये राहत असे. दिवाकर गावातील शाळेत शिकत असे. शाळेत त्यांची प्रगती व्यवस्थित चालू होती. त्यांचे वडील नोकरी करत. हॉस्टेल मुळे नात्यामध्ये वेळ आणि अंतर आले.

नरेशच्या वडीलाचे दुकान होते. नरेश उन्हाळी आणि दिवाळीच्या सुट्यांमध्ये गावाकडे यायचा. दिवाकर आपल्या भावाची सहा महीने वाट बघत बसायचा. नरेश सुट्टीवर आल्या नंतरच दिवाकर कधी एकदा भेटतो असे व्हायचे. सुट्टीचे दिवस हातातील वाळू सारखे भुरकण उडून जात असत. त्या दिवसात नरेश भेटेल म्हणून काकांच्या दुकानात बसून राहत असे. पण दुकानात काम असल्यामुळे जास्त काही बोलता यायचे नाही. आत्ता जास्त खेळणे व्हायचे नाही. पण भावामध्ये बंध तुटले नव्हते. ते एकमेकांना पत्रा मधून भेटायचे. जसे वय वाढले त्यांच्यामधील अंतर वाढत गेले. नात्या मधला बंध टिकून रहाण्यासाठी मायेचा ओलावा हवा असतो. अंतर किती ही असली तरी फरक पडत नाही.

मोठी झाल्या नंतर दोन्ही भाऊ आप-आपल्या कामात व्यस्त झाली. फॅमिली,जॉब्स आणि व्यवहार या सगळ्या मध्ये दोघ व्यस्त झाली. नरेश कामा निमित्त दुसर्‍या राज्यात ७-८ वर्ष राहत होता. दिवाकर सुद्धा बरेच वर्ष दोन मेट्रो सिटी मध्ये ‘जॉब’ करून मुंबईत स्थायिक झाला. मधल्या ७-८ वर्ष मध्ये दोघांमध्ये थोडाच संपर्क उरला.
मैत्रीचे बंध एका क्षणात तुटत नाहीत. मैत्री ही लहान रोपा सारखी असते जो पर्यंत आपण रोपाला पाणी टाकतो तो पर्यंत ते टवटवीत असते तसेच मैत्रीला एकत्र आनंदाचे पाणी टाकल्या शिवाय ती तग धरू शकत नाही. एकमेका पासून लांब असल्यामुळे आधी भेट, पत्र, मग फोन, मग संपर्क आणि शेवटी मैत्रीचा बंध विरळ झाला. आजच्या इलेक्ट्रॉनिक गँझेट च्या जगात त्यांचे व्हर्चुअली भेटणे व्हायचे. पण आत्ता त्यांच्या भेटण्यात तो ओलावा नव्हता. तो बंध सुध्दा आत्ता विरळ झाला होता. तो बंध फक्त व्हर्चुअल सोशँल आइडेंटिटी पुरता उरला होता. कधी-कधी सोशँल साईटवर आपण फोटो टाकतो किंवा मत मांडतो. पण त्यामुळे दुसर्‍याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे वाद-विवाद सुद्धा होतात.

दिवाकर ने सोशँल साईटवर वर आपला फोटो टाकला पण नरेशला त्याच्या फोटोची कॉपी केली असा गैरसमज निर्माण झाला. त्या एका क्षुल्लक कारणामुळे दोघा मध्ये भांडण झाले. ते एकच कारण दुरावा वाढवण्यासाठी पुरले. दोघांची सोशँल साइटवर मत मांडायची पद्धत वेगवेगळी असायची. एखाद्याच्या फोटोला आपण सोशँल साइट वर लाइक करतो त्यापेक्षा त्या व्यक्तिला प्रत्यक्ष भेटून अनुभव सांगणे जास्त परिणामकारक होऊ शकते. मतं जरी वेगळी असली तरी एकमेकांच्या अभिव्यक्ति स्वातंत्र्य जपली जायची.

पण जेव्हा नरेश परत मुंबईत राहायला आला. दोघा कडे भेटायला वेळ नसायचा. जो दिवाकर भावाला भेटण्यासाठी ६ महीने वाट बघायचा आणि नरेश गावी आल्यांनंतर काकांच्या दुकानात २-२ तास बसून रहायचा फक्त २ मिनिट बोलण्यासाठी. तो आत्ता ४ महीने संपुन सुध्दा भावाला भेटला नव्हता. दोन्ही फॅमिली मध्ये कार्यक्रमा निमित्त संपर्क झाला. तेव्हा सुध्दा काही खास बोलणे व्हायचे नाही.

दिवाकर शॉपिंग ला जाताना नरेश अचानक रस्त्यातच भेटला. एकमेकास बघून त्यांना खुपच आनंद झाला. हॉटेल मध्ये जाऊन नाश्ता केला. लहानपणी च्या आठवणी जाग्या झाल्या. लहानपणी ते एकत्र शाळेत जात. घरी येताना दंगा मस्ती करत घरी येत. त्यांचे दररोज भांडण होत असे. पण संध्याकाळ पर्यंत दुरावा दूर होऊन एकत्र येत. एकमेकांची विचारपूस करून झाली. मग विषय सोशँल साईट कडे वळला. त्यांना मग स्वत:च्या चुकाची जाणीव झाली. लहान गोष्टी साठी मैत्रीला गेलेला तडा त्यांनी तो समजूतदारपणा च्या गिलाव्या ने सावरून घेतला. एका शहरात असल्यामुळे परत भेटी-गाठी परत सुरू झाल्या. लहानपणाची मैत्री आठवली आणि दोस्ती मुक्त छंद प्रमाणे उडायला लागली. फॅमिली कार्यक्रमा निमित्त प्रत्यक्ष भेटी वाढल्या. अचानक भेट होऊन मनावरचे काळे ढग दूर होऊन मन आकाश्याप्रमाणे निरभ्र झाले. विश्वासाचे आणि मैत्रीचे बंध परत द्रढ झाले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users