फ्रेंच ओपन टेनिस - २०१५

Submitted by Adm on 21 May, 2015 - 23:23

यट अनादर ग्रँडस्लॅम.. यट अनादर धागा !

यंदाच्या उन्हाळ्यातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा येत्या रविवारी म्हणजे २४ मे रोजी सुरु होत आहे.

पुरूष एकेरीत नेहमीप्रमाणेच नदाल, जोकोविक आणि फेडरर ह्यांच्यात विजेतेपदासाठी चुरस असेल. यंदाच्या क्ले सिझनमध्ये राफाची कामगिरी नेहेमीसारखी झालेली नाही. ज्योको मात्र अफाट खेळला आहे. राफा जिंकला तरी किंवा हरला तरी इतिहास घडणारच आहे पण कुठला ते बघायचं!

गतविजेती शारापोव्हा यंदाही क्ले सिझनमध्ये फॉर्ममध्ये आहे.

मानांकने आणि ड्रॉ आज जाहिर होणार आहेत. ते आले की इथे अपडेट करेन.

स्पर्धेची वेबसाईट : http://www.rolandgarros.com/en_FR/index.html
(वेबसाईटची मात्र बर्‍यापैकी वाट लावली आहे!)

ह्या स्पर्धेसंबंधी चर्चा करण्यासाठी हा धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोण जिंकतं त्यापेक्षा फेडेक्स हरतोय असं मोटिवेशन असेल कदाचित त्यांचं धागा ऊघडण्यामागे. Wink
म्हातारा का असेना आमचा घोडा रेस मध्ये असेल तरच रेसला आणि बाकीच्यांना ग्लॅमर येते. नाही तर 'कोणी कच्चे कोणी पक्के पण सब घोडे बारा ट्क्के' असे होते, आणि मग कालच्या सारखी बोरिंग मॅच कपाळी मारली जाते.

जोकर चे अभिनंदन करिअर स्लॅम झाले. रिओच्या घोडामैदनात सिल्वर मेडल मिळावे आता म्हणजे ईथल्या बर्‍याच जणांच घोडं गंगेत न्हाईल.
५० वर्शांच्या ओपन एराच्या ईतिहासामध्ये एका जनरेशनचे चार करियर स्लॅम अ‍ॅक्टिव प्लेअर्स, अनबिलिवेबल आहे हे.

'कोणी कच्चे कोणी पक्के पण सब घोडे बारा ट्क्के' >>> Biggrin

पण सिल्वर का रे भौ?

मला जोकोविच अजिबात आवडत नाही पण त्याला गोल्डन स्लॅम करण्याचा चान्स आहे यंदा तेव्हा (मनातल्या मनात) शुभेच्छा दिल्या कालची मॅच संपल्यावर.

अजून फेडेक्स किंवा नादालपैकी (मोस्टली फेडेक्सच :P) एखादा ह्या लिस्टीत असायला हरकत नव्हती. जोको म्हणजे ह्या दोघांनंतर येऊन पेढा खाऊन गेला. Light 1 त्याचे श्रेय आहेच पण. त्याला मीही शुभेच्छा दिल्या. बघूया काय होतेय ते. Happy

मिरास्का वहिनींनी स्विस बँकेतल्या वॉल्टमध्ये ते गोल्ड मेडल लटकावण्यासाठी कधीची खुंटी गाडून ठिवलीय.
म्हणून सिल्वर म्हणालो. Wink

कोण्च्या लिस्टित भास्कराचार्य? नदालचे गोल्डन आणि फेडेक्स चे करिअर स्लॅम तर आधीच झाले आहे.

हायझेनबर्ग, चार मेजर चँपियनशिप सलग जिंकणार्‍या लिस्टीत म्हणत होतो.

न्हाई न्हाई असली काय लिस्ट आम्ही मानत न्हाई, ते एका कॅलेंडर वर्षात जिंकलं तरच जिंकलं म्हणायचं. आताशी दोनच झालेत ह्या वरशाला. Wink

हायझेनबर्ग, करीअर स्लॅमपेक्षा सलग चार जिंकून करीअर स्लॅम हे जास्त स्पेशल नाही का? Happy एका कॅलेंडर वर्षात हे तर अजूनच स्पेशल होईल.

हायझेनबर्ग, करीअर स्लॅमपेक्षा सलग चार जिंकून करीअर स्लॅम हे जास्त स्पेशल नाही का? >> आहे की, पण कोण करतंय त्याच्यावरून ठरवणार ना आम्ही ते किती स्पेशल आहे ते.

अच्छा अच्छा. Happy

तरी एका कॅलेंडर वर्षात पहिल्या दोन एकाच माणसाने जिंकणे हेही १९९२ (जिम कुरीए) नंतर पहिल्यांदाच झालंय. Wink

तरी एका कॅलेंडर वर्षात पहिल्या दोन एकाच माणसाने जिंकणे हेही १९९२ (जिम कुरीए) नंतर पहिल्यांदाच झालंय > एकाच कॅलेंडर वर्षात शेवटचे दोन्ही जिंकणं आमच्या घोड्याने सलग चार वर्षे केलं आहे, ते जास्त स्पेशल आहे.

भम > मिळालेल्या ग्रँड स्लॅम द्वारे पर्स्नॅलिटी, ईंटेलिजन्स आणि करिअर मॅपिंग टेस्ट चालू आहे.

निघाली का धूसफूस बाहेर कसली तरी का असेना >>>> खरं आहे सशल. Happy ते खेळाडू स्वत: इतके जेंटलमन स्पोर्ट्समन असताना इथे ह्यांची धुसफूस, मळमळ वगैरे सुरूच !

सिंडी, तुझा स्पोर्टमनशिपबद्दलचा सल्ला परत इथेही द्यायची वेळ आलेली दिसत आहे!

ज्योकोचे अभिनंदन. Happy

सलग चार जिंकून करीअर स्लॅम >>> अहो ते ग्रॅन्ड स्लॅम. यंदा ऑलिम्पिक्स असल्यानं गोल्डन स्लॅमची संधी आहे म्हटलं.

पग्या, मी आता घोड्यांच्या (आणि गधड्यांच्या) पलीकडे गेले आहे Proud

हायला आम्ही तर मोठ्या मनानं धागा खणून काढून कौतूक केलं, ऑलिंपिक्स मध्ये मेडल मिळावं, वर्षातले अजून दोन स्लॅम्स जिंकावे म्हणून शुभेच्छा ही दिल्या तरी धुसफूस म्हणे. Lol

बरं "मिरास्का" कोण म्हणे? Wink

>> कुरीए

आणि ह्यांच्या आडनावातला शेवटचा र फ्रेन्च उच्चारां प्रमाणे सायलेंट आहे हे मला माहितच नव्हतं. मी आपल्या घाटी इंग्रजीप्रमाणे "कुरीयर" म्हणत होते.

चला आता, असामी आला म्हणजे युज्वल सस्पेक्ट्स चा कोरम झाला म्हणायचा.

फचिन गुड टू सी यू. माबो व्य्सन घालवण्यासाठी तू माझे ईन्स्पिरेशन होतास पण तुझेही पाय मातीचेच निघाले शेवटी. Sad

जोको न आवडण्यामागची काय कारणे आहेत? >> तू घोडा बदली केलीस की काय? की ऊगीच माझ्या खांद्यावरून बंदूक चालवतो आहेस.
ही बघ तुझीच २०११ च्या फ्रेंच ओपन वर्ची कमेंट.>>>>
फेडरर जोकोला हरवू शकणार नाही असे वाटते. क्लेवर फार पॉवर लागते आणि स्टॅमिना पण. जोको तरूण आहे आणि फॉर्मात आहे. त्यामुळे ह्या दोन्हीत तो फेडररपेक्षा सरस वाटतो. <<<<<

आणि ही पोस्ट मॅच कमेंट >>>
जोकोविचने इतका पॉवरफुल खेळ करून सुद्धा तो हरला ह्याचं मला आश्चर्य वाटलं. शेवटी शेवटी फेडरर बहुतेक करून डिफेन्स मोडमध्ये होता असे वाटले. <<<<<

ह्या कमेंट्मध्ये टेनिस स्कील चा ऊल्लेख कुठे आला? Uhoh नाही आला कारण ते जोको कडे नाहीये, आहे ती फक्त पावर आणि स्टॅमिना. तसं म्हण्जे मागच्या पाच वर्षात तो पावर आणि स्टॅमिना वापरण्यात स्कीलफुल झाला आहे हे खरं ! पण अजून फेडरर सारखे टेनिस स्कील मिळ्वायला त्याला खूप्पच मेहनत करावी लागणार आहे. Happy

२०११ च्या फ्रेंच ओपनचा बाफ वाचून फार करमणूक झाली.

तू घोडा बदली केलीस की काय? की ऊगीच माझ्या खांद्यावरून बंदूक चालवतो आहेस
>>
छे रे.. फेडररचा फॅन मी आहेच. पण दुसरा कोणी आवडत नाही असं नाही. आणि जोकोचा खेळ अगदीच नदालसारखा ब्रुट्फोर्स खेळ वाटत नाही. म्हणून आवडतो मला.

टेनिस स्किलपेक्षा कदाचित नेत्रसुखकारक खेळ नाहीये असं म्हणू शकेन. फेडररचा खेळामध्ये एक ग्रेस आहे ती जोकोकडे नसेल, पण अगदीच स्किल नाही असं म्हणणार नाही. नदालविषयी तसं म्हणेन. Lol

हो हो खरं आहे तू म्हणतोस ते!
फेडरर आणि नदालच्या दादागिरीवर टिच्चून, पहिली अनेक वर्षे कोर्ट्वरच्या प्रेक्षकांचाच काय माजी खेळाडू, समीक्षकांचा पाठिंबा नसतांना, युरोपातल्या ईतर देशांच्या मानाने अतिशय कमी टेनिसचा ईतिहास असलेल्या सर्बियासारख्या देशांतून येवून सुद्धा हा एवढा यशस्वी होतो, नुसता होतंच नाही तर कमालीचा सातत्य ठेवतो. हे त्याची प्रचंड मेहनत, स्किल, स्टॅमिना,ईंटेलिजन्स,पाटे, प्रेशर हॅंडलिंग सगळ्या गुणांचं एक पावरफुल्ल मिश्रण असल्याशिवाय का शक्य आहे. आणि ह्या घोडदौडीच श्रेय त्याला देवू तितके कमीच आहे. त्याच्याबद्दल प्रचंड आदर आहेच.

पण टेनिस वैयक्तिक खेळ असल्या कारणाने मला एका पेक्षा जास्त आवडत्या प्लेअर्सची लिस्ट ठेवायला कधीच जमले नाही. फेडरर रिटायर्ड झाल्यावर कदाचित जोकोविकलाच सपोर्ट करेन, पण तो पर्यंत टाईमपास चालू.

Pages