दक्षिण काशी - श्री क्षेत्र हरिहरेश्वर

Submitted by जिप्सी on 20 May, 2015 - 11:58

हरिहरेश्वरचा समुद्रकिनारा
प्रचि ०१

प्रचि ०२

(दोन्ही प्रचि पूर्वप्रकाशित)

रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर हे ठिकाण "दक्षिण काशी" म्हणुन ओळखले जाते. एका बाजुला हरिहरेश्वराचा डोंगर तर दुसर्‍या बाजुला निळाशार समुद्र यामुळे तीर्थाटन आणि पर्यटन असे दोन्हीही होतात. हरिहरेश्वर, कालभैरव योगेश्वरी, सिद्धिविनायक व हनुमान अशी चार मंदिरे तसेच समुद्रकिनारी असणारे विष्णुपद, गायत्रीतीर्थ, वक्रतीर्थ, सूर्यतीर्थ, यज्ञकुंड, विष्णुतीर्थ अशी अनेक ठिकाणे आहेत. कर्नाटकातील गोकर्ण ते ठाणे जिल्ह्यातील निर्मळ हे पाचशे मैलांचे दक्षिणोत्तर अंतर व ४८ मैल रुंद एवढा प्रचंड परिसर हा श्री क्षेत्र हरिहरेश्वराचा परिसर मानण्यात येतो. सावित्रीला दिलेल्या वराप्रमाणे ब्रह्मदेवाने सावित्रीसह यज्ञ केला. या हरिहरेश्वर क्षेत्राच्या दक्षिण दिशेला व उत्तर दिशेला बारा ज्योतिर्लिंग स्थाने आहेत. देशात ऐकूण १०८ तीर्थस्थाने असली तरी प्रमुख तीर्थ हरिहरेश्वर मध्ये आहे असे मानले जाते. हरिहरेश्वरचा महापवित्र क्षेत्र असा उल्लेख 'श्री हरीहरेश्वर माहात्म्य' पोथीमध्ये आहे. हरिहरनावाच्या पश्चिमाभिमुख असलेल्या या देवात हरिस्वरूप व हरस्वरुप या दोन्हींचा संगम झाला आहे. मंदिर जरी समुद्र किनार्‍यावर असले तरी प्रदक्षिणा मार्ग डोंगरा वरुन व समुद्रा मधुन आहे. कोकणपट्टीतील एक निसर्गरम्य असे पवित्र तीर्थस्थान.

सर्वसाधारणपणे प्रथम काळभैरवाचे दर्शन, नंतर हरिहरेश्वराचे दर्शन करून परत काळभैरवाचे दर्शन घ्यावे अशी प्रथा येथे आहे. या क्षेत्रात ज्या चार टेकड्या आहेत त्यांच्यासारखी रचना हरिहरेश्वराच्या लिंगावर दिसून येते. या दोन्ही देवळात दर्शन घेतल्यावर कराव्या लागणाऱ्या प्रदक्षिणेचा मार्ग डोंगर आणि समुद्राजवळच्या खडकांवरून जातो. या मार्गावरील शे-दीडशे पायऱ्या खाली उतरून त्या डोंगराची प्रदक्षिणा केली जाते. या संपूर्ण प्रदक्षिणेचे अंतर एक कोस असल्याने तिला कोसाची प्रदक्षिणा असे म्हणतात. या मार्गातून दिसणारा समुद्र आणि तिथले सृष्टीसौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. या क्षेत्राला नयनरम्य समुद्रकिनारा लाभला आहे.
(साभारः विकिपीडिया)

केळशी-वेळास-बाणकोट मार्गे हरिहरेश्वरला येताना वेसवी गावातुन "जंगल जेट्टीतुन" गाड्या बागमांडला येथे आणाव्या लागतात. तेथुन हरिहरेश्वर केवळ ४-५ किमी अंतरावर आहे.

वेसवी गावातील जेट्टी
प्रचि ०३

प्रचि ०४
बागमांडला जेट्टीवर वाळुने भरलेला ट्रक उतरताना
प्रचि ०५

प्रचि ०६
श्री क्षेत्र हरिहरेश्वर मंदिर (मंदिरात व परीसरात फोटो काढण्यास बंदी आहे.)
प्रचि ०७

प्रचि ०८
हरिहरेश्वरचा समुद्रकिनारा
प्रचि ०९
प्रदक्षिणा मार्ग. पाणी आणि वार्‍याच्या मार्‍याने डोंगरात साकार झालेले विविध मनमोहक आकार.
(प्रदक्षिणा मार्ग अतिशय धोकादायक असल्याने भरती/ओहोटीचे गणित बघुन (स्थानिकांना विचारूनच) जावे.
प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३
सूर्यास्त
प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६
कसे जालः
मुंबईहुनः मुंबई - पनवेल - पेण - नागोठणे (वाकण) - कोलाड - माणगाव - लोणेरे फाटा - गोरेगाव - म्हसळा - श्रीवर्धन (२ किमी आधी) - हरीहरेश्वर.
(अंदाजे १८० ते २०० किमी)

पुण्याहुन पुणे - पौड - मुळशी - ताम्हिणी घाट - माणगाव - लोणेरे फाटा - गोरेगाव - म्हसळा - श्रीवर्धन (२ किमी आधी) - हरीहरेश्वर.
(अंदाजे १७० ते १९० किमी)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहिती ..... फोटो खूपच छान.......
लहान असताना एकदा गेलो होतो....... त्यावेळी म्हसळ्याला होतो रहायला....अगदी मी 1ली -2री ला असताना.... १९३-९५ मध्ये असेल कधी तरी.....
आत्ता परत नक्की जानार ..........

मस्त फोटो. माझी हरीहरेश्वरला जायची खूप दिवसाची इच्छा आहे. हे फोटो बघुन आणि पतिसाद वाचुन ती आणखी प्रबळ झाली.

हरिहरेश्वर म्हणजे माझे अजोळ. त्यामुळे यावर कधिही कुठेही काहि लिहिलेलं पाहिलं. की अत्तीशय बरं वाटतं. आणि अजुन एक माणूस आपल्या गावाला जोडला गेला,याचा आनंदही होतो.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!! Happy

सशल, अमितव प्रतिसाद खुप आवडला Happy Happy

एकच शंका - दक्षिण काशी म्हणजे कोल्हापूर ना ?>>>>संपदा, हरिहरेश्वरलाही दक्षिण काशी (कोकणातील) म्हणतात. Happy

हरीहरेश्वरचा समुद्रकिनारा हा बाहेरुन बघायलाच उत्तम आहे. यात पोहण्याची रिस्क घेऊ नये. त्याकरता जवळचा दिवेआगरचा किनारा सेफ. त्यात त्या खडकात झालेल्या कपारींमुळे जीव वाचण्याची शक्यता शुन्य. >>>>>केपी +१००००. प्रदक्षिणा मार्गावर पाण्यामुळे शेवाळं पण साचलंय सो जरा जपुनच. दिवेआगर, आर्वी बीच, श्रीवर्धनचा किनारा त्यामानाने बरा.

जिप्सींचे काढलेले फोटो नी त्यांचा कॅमेरा पळवायला मला कोण मदत करायला तयार आहे ?<< जिप्स्यालाच पळवून नेउ या ना !!>>>>>:हाहा:

टिना, मस्त फोटो Happy

शिंचे हे देवळाच्या परिसरातही फोटो काढायला बंदी का करतात काय कि>>>>>>लिंबुदा Happy Happy

हरी आणि हर.. सहसा एका जागी असत नाहीत, ते इथे आहेत. तसेच इथे अस्थिविसर्जनासाठी पण जातात.>>>>> दिनेशदा +१

एकदम नोस्टाल्जिक. लहानपणी दरवर्षी उन्हाळ्याची सुट्टी श्रीवर्धनला. हरेश्वरला जायचं म्हणजे आजोबा आणि आम्ही पोरं सकाळी उठून भरभर आंघोळी उरकून चालत मग तरीतून आणि मग डोंगर ओलांडून जायचो. बाकी मोठी माणसं मग सावकाश एस्टीनी येत. तिकडे दर्शन घेऊन मग प्रदक्षिणा, मग बागमांडला/ दिघी मिळेल त्या गाडीने श्रीवर्धन आणि मग बग्यामामांच्या खानावळीत गरमा गरम आमटी भात आणि ताजं लोणचं असं जेवण.मग दुपारभर पत्ते किंवा व्यापार किंवा खांबखांब काहीच नाही तर झोपळ्यावर घालवून मग सूर्यास्तापर्यंत समुद्र. अधेमधे आंबा पडल्याचा आवाज आला की बाहेर पळणे. रात्री घरी आल्यावर परत गप्पा, भुताच्या गोष्टी आणि झोप. मज्जेचे दिवस.>>>

अमितव खूप छान गोड लिहिले आहेस अगदी. ह्याला थोडे पुढे ने आणि एक लेख लिहि मस्त वाचनिय होईल बघ.

मला निसर्ग हा दूरुनच आवडतो. मी गोव्याला सुध्दा फक्त समुद्राच्या काठाकाठाने फिरलो.

मी असं वाचलंय की कोकण हे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जावं हे प्रयत्न पांडवानी केले, त्यांच्या वनवासाच्या पिरेडमध्ये म्हणून कोकणात बरीच शंकराची देवळे पांडवानी बांधली आहेत असं म्हणतात आणि बऱ्याच देवळांना एकच स्टोरी आहे कि कोंबडा आरवायच्या आत पांडवाना एका रात्रीत बांधायचं होतं पण जमलं नाही.

केवळ सुंदर! एकसे एक फोटोज.

धोक्याच्या सुचना >>> कांदापोहे +१. त्या पाण्याला ओढही खूप आहे असं ऐकलंय.

खुप छान प्रचि ... सर्व फोटो अप्रतिम आले आहेत ....पुन्हा एकदा जावे वाटले ... खुप छान निसर्ग आहे ..

Pages