मनाचे स्थितंतर

Submitted by विनायक. दि.पत्की. on 18 May, 2015 - 06:20

कधी कधी असे होते
नको तेच समोर येते
घडणारे घडून जाते
अन खुदकन हसु येते

आधीच कामाचा असतो भार
त्यात दोनाची होती चार
क्षमतेवर मग होतो वार
आणी आनंद होतो पसार

व्दिधा अवस्था बेचैन मन
नको तेथेच खर्चते धन
व्यर्थ भारानेच शिणते तन
पळभर हायहाय करती जन

कालांतराने दाह कमी होतो
उत्साह आशा पुर्ती करतो
चुकीचा भाव अहंकार जिरवतो
गेलेला आवाज परत खणखणतो

आपलेच मन दुर्बल असते
अनेक शंकात फसत बसते
केव्हाही उत्तर एकच असते
वेळेवर लक्ष दिलेले नसते

Group content visibility: 
Public - accessible to all site users