एक बरस बीत गया
झुलासाता जेठ मास
शरद चांदनी उदास
सिसकी भरते सावन का
अंतर्घट रीत गया
एक बरस बीत गया
सीकचों मे सिमटा जग
किंतु विकल प्राण विहग
धरती से अम्बर तक
गूंज मुक्ति गीत गया
एक बरस बीत गया
पथ निहारते नयन
गिनते दिन पल छिन
लौट कभी आएगा
मन का जो मीत गया
एक बरस बीत गया
-अटल बिहारी वाजपेयी.
मला नीट आठवत असेल तर कैदी कविराय की कुंडलिया या काव्य संग्रहात ही कविता आहे. या कवितेला एक ऐतिहासिक संदर्भ ही आहे. पण तो या लेखाचा विषय नाही. अटलजींची ही सुंदर कविता आज आठवण्याच कारण म्हणजे आज मोदी निवडून येण्याला बरोबर एक वर्ष झाल. गेल्या वर्षी आजच्या दिवशी भारताच्या लोकशाहीच एक सशक्त दर्शन घडल. प्रसार माध्यमांनी जवळपास सतत बारा वर्ष केलेल्या टीकेचे धनी असलेला , एकप्रकारच्या वैचारिक अस्पृष्यते चा आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर सामना करीत , कुठल्याही घराण्याच वलय वा पाठबळ नसलेला, लहानपणी एक चहावाला मुलगा असलेला नरेन्द्र दामोदरदास मोदी नावाचा एक माणूस या देशातील लोकांनी विविध पक्षांचे कडबोळे नको म्हणत स्पष्ट बहुमताने पंतप्रधान म्हणून निवडून दिला. मोदी नेता झाले तर लोक मते देणार नाहीत, विविध सहकारी पक्ष दूर जातील, बहुमत कमी पडल तर पाठिंबा देणारे पक्ष मिळणार नाहीत, अशा मतांना ,बातम्याना मागे सारून प्रचाराचा झंझावात व जोडीला सोशल मीडीया चा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत अशक्य वाटणारा विजय मोदींच्या भाजप ने मिळवला. लोक खूप अपेक्षांनी सरकार कडे अच्छे दिन येण्याच्या आशेने पाहू लागले.
आज एक वर्ष पूर्ण झालय. एखाद्या सरकार च्या कामाच मूल्य मापन करायला हा काळ पुरेसा नाही हे खर पण एक वर्ष म्हणजे अगदी कमी ही नाही. तेव्हा काय चांगल घडल वा घडण्याची आशा आहे. काय वाईट घडल वा टाळता आल असत या दोन्ही पैलूंची चर्चा करण्यासाठी हा धागा आहे. संयमित भाषेचा वापर करीत केलेल्या सर्वच प्रतिसादांच स्वागत आहे. मोदी हे नाव अन तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होण हे अपेक्षितच असत पण काळजी घेण्यास संपादक मंडळ समर्थ आहे .
मला सहज आठवणा र्या बर्या वाईट गोष्टी अशा आहेत.
जमेच्या बाजूला
टू जी / सी डब्ल्यू जी / कोळसा / ...... घोटाळ्यांच्या मालीकेने त्रस्त लोकांसाठी वर्षभरात एकही मोठा घोटाळा न होण हा एक सुखद बदल होता.
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, विदेश विभाग विविध दूतावास जनरल सिंग, सुरक्षा प्रमुख अजीत डोव्हाल यांची लक्षणीय कामगिरी, केरळच्या नर्सेस ना इराक मधून सोडवण व येमेन च्या युध्दग्रस्त प्रदेशातून जवळपास पाच हजार भारतीयांना सोडवून आणण.
जनधन योजने अंतर्गत मोठ्या संख्येने बँक खाती उघडणे व मायक्रो बँकिंग ला पाठिंबा देणे .
संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकरांच्या पाठपुराव्याने पंतप्रधानांच्या फ्रान्स दौर्यात राफाएल विमानांची खरेदी व वायुदला ची बराच काळची मागणी पूर्ण होण्या कडे वाटचाल.
मोदींच्या परदेश दौर्यांच्या माध्यमातून प्रथम शेजारी देशांशी व नंतर महत्वाच्या देशांशी संबंध सुधारणे बळकट करणे व्यापार वाढवण्या करता करार मदार.
स्वच्छता अभियान.
रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी रेल्वेचा कारभार सुधारण्यासाठी सुरु केलेला झपाटा.
अनेक मुद्दे आहेत मायबोली करांनी भर घालावी.
नावे बाजू
शेतकर्यांसाठी अजून काही भरीव झालेले नाही. नाशिवंत माला च्या साठवणी साठी गोडाउन्स बांधणी, मधले दलाल मलई खाउन जातात शेतकर्याच्या हाती काही पडत नाही व ग्राहकाला ही खरेदी महाग पडते या फ्रंटवर लवकर काहीतरी व्हायला हव. आत्महत्या करू नये अस शेतकर्याला वाटण्यासाठी आशादायी धोरणे, सरकारच्या विविध खात्यात समन्वय दिसला पाहीजे. अकाली पावसानी शेतकर्यांच प्रचंड नुकसान झाल पण हवामान खात व सरकारची प्रसिद्धी यंत्रणा झडझडून कामाला लागल्यात अस दिसल नाही.
जमीन अधिग्रहण कायद्याच्या बाबतीत आपली बाजू नीटपणे सरकारला जनते समोर मांडता आली नाहीये शेतकरी विरोधी सरकार अशी सरकारची ' प्रतिमा ' बनत चालली आहे.
वीज रस्ते पाणी या बद्दल ज्या वेगाने काम व्हायला हव ते दिसत नाही.
विविध बोलभांड नेते व त्यांची बेताल वक्तव्ये नक्कीच टाळता आली असती. परदेशात भारतातील विरोधी पक्षा ची निंदा करण मोदींनी टाळायला हव होत.
पर्यटनाच्या क्षेत्रात अमाप संधी आहेत पण फारस काही होत नाही अस वाटत आहे.
अनेक मुद्दे आहेत मायबोली करांनी भर घालावी.
लोकांना इन्स्टंट कॉफी हवी असते आवडते. अस मोदी समर्थक म्हणतील पण त्यात चूक काय आहे ? लोकांना तुमच्या कडून खूप अपेक्षा आहेत हेच त्यातून दिसत.
ही टेस्ट मॅच आहे ट्वेंटी ट्वेंटी मॅच नाही. अस ही एक वाक्य शेअर बाजाराच विश्लेषण करणार्या चॅनेलवर एका तज्ञाकडून ऐकल. ते ही योग्य आहे. टेस्ट मॅच चा ही आपला एक मजा असतो शास्त्रीय संगीतातील ख्याल गायना सारखा. महत्वाच्या अनेक विषयांवर सरकारचे खयाल म्हणजे विचार काय आहेत ते अर्थसंकल्पात जेटलींनी थोडफार स्पष्ट केलय, रिजर्व बँकेचे गवर्नर रघुराम राजन यांच्यासारख्या सुयोग्य माणसाच्या सल्ल्याचा मोदी आदर करीत आहेत. अच्छे दिन जरी अजून आले नाहीत अस अनेकांना वाटत असल तरी आशा बाळगायला हरकत नाही अस मला वाटत.