मी तुझ्यावर प्रेम केले

Submitted by जयदीप. on 12 May, 2015 - 09:25

फार ती भावूक झाली
लेखणी बंदूक झाली

मी तुझ्यावर प्रेम केले
फार मोठी चूक झाली

मी तिला माहीत झालो
ती मला ठाऊक झाली

लागले किरकोळ होते
वेदना घाऊक झाली

वाढते वय मलम झाले
आठवण अंधूक झाली

अंतरे वाढून गेली
बंधने नाजूक झाली

दाटलेला कंठ होता
एक इच्छा मूक झाली

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users