चूक

Submitted by गजानन रताळे on 10 May, 2015 - 06:15

जिंकलेले सारे डाव हारून आलो
मी सुखाला माझ्या दूर सारुन आलो

कोणते हे दुःखे का दिले दान वाट्या
खंत माझी जगन्याला विचारुन आलो

आज मी जातांना का तुझी हाक आली
रे कितीदा, हाय तुला पुकारुन आलो

ओढ नाही आज मला तुझ्या अंबराची
मी स्वप्नांना माझ्या ठार मारुन आलो

यायलाच नको होते! तिथे वादळांनी
गाव माझे मी जेथे उभारुन आलो

जन्मलो येथे ही चूक माझीच होती
चूक माझी मी मरना सुधारुन आलो

*जि . एस. रताळे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users