पाळणाघराचा अनुभव

Submitted by cha on 8 May, 2015 - 06:19

पाळणाघर

माझ्या भाच्याला ५ तास पाळणा घरात घातलाय ,,,, आणि तो खूप एन्जोय करतो ...पण माझ्या मुलीच्या बाबतीत माझ धाडस नाहीये होत पाळणा घरात घालायचं (मुलगी १ वर्षाची आहे)

घरी आजी-आजोबा आहेत बघायला … आणि मावशी येतात सकाळी १० - ५ ..

तुम्हाला आलेला पाळणाघराचा अनुभव इथे शेअर करा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण माझ्या मुलीच्या बाबतीत माझ धाडस नाहीये होत पाळणा घरात घालायचं

>> नक्की कश्यामुळे? ती लहान आहे म्हणून? कि मुलगी आहे म्हणून?

मध्ये मी माझ्या मित्र मैत्रिणी कडून चांगले रेसुल्त नाही एकले …

एक म्हणाला … तुझ्या घरी manage होत असेल तर कशाला पाळणा घर बघते आहेस ,,,,
अजून एक म्हणाला ,,,, लहान मुलाचं खान पिन नित नाही होत …………

मुला-मुलांवर , पाळणाघर आणि तुम्हाला नक्की काय हवयं यावर बरच काही अवलंबून असतं .

माझा मुलगा घरी आजी-आजोबांकडेच असतो .
पण ईतर काही जणाचे अनुभव आहेत .

एका मैत्रिणीची मुलगी आता दीड वर्शाची आहे . २-३ महिने झाले , मैत्रिणीने फुल टाईम ऑफिस जॉब चालू केला . लेकीला डे-केअर मध्ये ठेवते.
ईतके दिवस घरून काम करायची. त्यामुळे लेकीला आईचीच सवय. इतर कोणाकडे जायची नाही , बिल्डीन्ग्मध्ये कोणी बोलायला गेलं की कोणाशी बोलायची नाही , चिड्चिड करायची.
आता ईतका बदल झालाय तिच्यात. खूप बोलते , खेळते . आईला सोडून ईतर कोणाकडे बिन्धास्त जाते. चिडचिड पण कमी झाली आहे.

दूसर्या एकीला पाळणा घरात ठेवायचे नव्हते मुलाला , मग ती त्याला आजीकडे ठेवयची , दिवसभर संभाळायला एक मुलगी होती.

एक कलिग वर्शाच्या मुलाला पाळणाघरात ठेउन यायची. चांगलं प्रोफेशनल होतं. एकदा लवकर गेली त्याला आणायला. खिडकीतून बघत होती . एका मावशीने मुलाचा टिफिन कचर्याच्या डब्यात रिकामा केला आणि त्याच्या बॅगेत भरला. हीला फार धक्का बसला. मुलाचे खाण्याचे हाल होत असतील असं जाणवलं .

माझी ओळखीची एक वहिनी पाळणाघर चालवते. अतिशय शिस्तित.बहूतेक मुलं आपल्या हाताने खयला शिकतात. दूपारी सगळ्यानी एक झोप काढायची नाहीतर शांतपणे अभ्यास करायचा अस नियम . संध्याकाळी सगळयाना बाहेर कंपाउन्ड मध्ये खेळायला पाठवते.

इथेच मायबोलीवर पुण्याच्या आजोळ नामक अतिशय उत्तम पाळणाघराच्या चालिकेची मुलाखत आहे. ती शोधा आणि वाचा. माझ्या ओळखीतल्या बर्‍याच जणांना त्या पाळणाघराचा फार चांगला अनुभव आहे

मावशी येतात सकाळी १० - ५ .. >>>>> घरी आजी-आजोबा आहेत आणि मदतनीस आहे तर तुम्ही मुलीला का बरं पाळणाघरात ठेवता? कुठलंही मूल, पाळणाघर नाईलाजाने स्वीकारते.आजी-आजोबा थकले असतील तर गोष्ट वेगळी आहे.स्वतःच्या घराशिवाय उत्तम जागा कुठेही नसते.

आधी थोडा थोडा वेळ पाठवून बघा २ -२ तास. तिला आवडत असेल तर चालू ठेवा. मुलांना त्यांच्या वयाच्या मुलांमध्ये खेळायला मिळाल कि खुश असतात, एकमेकांच पाहून भरपूर शिकतात. तुम्हाला घरी असं वातावरण देण जमत असेल तर ठीक आहे, पण नसेल तर २ तास पाठवून बघा काही दिवस. मुलं आपल्याला सोडून लांब जाताना कायमच वाईट वाटणार आहे especially for first time moms, but if they are going to enjoy and grow, then why not! Happy

>>स्वतःच्या घराशिवाय उत्तम जागा कुठेही नसते.<<
हे जरी खरं असलं तरी मूलाला जर लवकर वयात नवीन जागा, नवीन लोक आणि नवीन भाषा, फूड ह्याची ओळख झाली तर एकूणात बर असतं. पण जसं प्रत्येक मूल युनिक असतं तस तो नियम लावून... आणि त्याची स्वभावगुण पाहून सुरुवातीला दोन तास...(तुम्ही बाहर बसून), मग तीन तास मग चार असे वाढवत जायचे.
उलट परीणाम(सर्व बाबतीत आणखी चिडचिडं, भित्रं , त्रासलेलं) दिसतील तर थांबवून पुन्हा सुरु करायचे.
सुरुवातीला दोन्ही पार्टी गिनिपिग(आई-वडील आणि मूल) असतात.

घरी आजी-आजोबा आहेत आणि मदतनीस आहे तर तुम्ही मुलीला का बरं पाळणाघरात ठेवता? >>> याचा विचार त्यांनी केलाच असेल ना. मुलीला पाळणाघरात ठेवायचे की नाही हा त्यांचा प्रश्न आहे सर्वस्वी . इतरांना त्यावर क्वेश्चन करण्याचा काहीच अधिकार नाही असे वाटत नाही का? !

स्वतःच्या घराशिवाय उत्तम जागा कुठेही नसते >>> हे खरं असलं तरी मुलांनी त्यांच्या वयाच्या मुलांसोबत शिकणं, खेळणं हे सुद्धा गरजेचं आहे.

मुलीला पाळणाघरात ठेवायचे की नाही हा त्यांचा प्रश्न आहे सर्वस्वी . इतरांना त्यावर क्वेश्चन करण्याचा काहीच अधिकार नाही असे वाटत नाही का? !>>>>>>>>माझ्या लिहिण्याचा विपर्यास झाला आहे. ज्यावेळी प.फो.वर अस धागा येतो त्यावेळी प्रत्येकजण त्याचे मत मांडतो.
मला इतर पर्याय नसल्याने माझ्या लेकाला पाळणाघरात सहाव्या महिन्यांपासून ठेवावे लागले.सुरुवातीला २वर्षें, त्याचा वेळ ५-६ तासांचा होता.पाळणाघर चांगले असूनही माझा लेक, पाळनाघरी जायचे असेल तर जमिनीवर लोळण घ्यायचा( वय ७-८ महिने) आठवडाभर हा कार्यक्रम चालला होता.शेवटी चेहरा एवढुस्सा करून तो जायचा.आजही मला त्याबद्दल वाईट वाटते.
नंतरची पाळणाघरेही चांगली होती.पण एकावर्षी मला मुलाला सांभाळणारी मुलगी मिळाली,त्यावेळी तो जास्त खूश असायचा हेही जाणवले.त्यामुळे cha यांना पर्याय आहेत,तर मुलीला बाहेर का ठेवता हा प्रश्न मी माझ्यावरून कळवळून विचारला होता.

माझी मुलगी दुसर्‍या वर्षापासून दहा वर्शाची होईपर्यंत पाळणाघरात होती. प्रत्येक दिवशी जाताना हमसून हमसून रडायची. शेवटी काही वर्षे मी नोकरी सोडली. पुण्यातली जवळपास १० पाळणाघरे पाहिली/बदलली तरी हा पॅटर्न बदलला नाही. मुलगी आता वीस वर्शाची आहे. ती लहानपणचे जे आठवते त्यावरून ती सांगते, दर रविवारी संध्याकाळी तिला धडधडायचे आणि उद्यापसून आपल्याबरोबर आई नाही म्हणून तिला सतत रडायला यायचे. ती स्वतः आता मानसशास्त्र शिकते आहे व असल्या रडक्या बाळांबद्दल त्यांना त्यांच्या अभ्यासक्रमात एक धडा पण आहे. त्यानुसार प्रिमॅच्युअर मुलांना जन्माच्या आधी आईपासून दूर केल्या मुळे त्यांच्यात असुरक्षिततेची भावना प्रबळ असते. आणि त्या असुरक्षिततेमुळे ती सतत आईला चिकटून बसतात. पाळणाघर चांगले असले किंवा वाईट असले तरी. अर्थातच ख्खोदेजा !

घरी मुलाला संभाळायला आजी आजोबा व मावशी असतील तर पाळणाघराचा विचार सुद्घा करु नये असे मला वाटतं. आई बाबा, आजी आजोबा ह्यांच्याबरोबर जी कम्फर्ट लेवल आहे ती पाळणाघरात ह्या वयात मिळणार नाही. अजुन १ १/२ वर्षात मुल शाळेत जावु लागले, सेटल झाले की मग गरज असल्यास विचार करा. पाळणाघर हा उपाय आहे पर्याय नाही.

सुमेधाव्ही | 9 May, 2015 - 17:11 नवीन>>> +१

संपूर्ण पोस्टिला अनुमोदन.

आधीच लोकांशी बोलन वगैरे कमी मग ४थीनंतर हॉस्टल ला गेल्याने थोड़े फार socialising skills अंगी आले. इथे येऊन पुन्हा introversion वाढले.

पाळणा घराकडे lender of last resort सारखे बघा. पर्याय नसतो कधी कधी पण तरीही. माझ्या तिथे कोनाशीच् कधी ओळखी वगरे झाल्या नाही कारण सगळ पब्लिक संध्याकालचि वाट पहायच. कोण तरी येणार आणि घरी नेणार. एक अस डिप्रेसिंग वातावरण असायचे.. घरी कधी जाणार याचे. पुन्हा आज सारखी फुलडे सेंटर्स नव्हती. कोणाच्यातरि घरी जायचे, जेवायचे आणि झोपयचे. खेळणी नाही, वेगवेगळ्या वयाची मूल मग त्यांचे ग्रुप्स वगैरे, मग आपल्याच घरात का नको असेही वाटायचे.

मी आता ही आईला कुठेच् जाऊ देत नाही. Proud

देवकी thanks for your reply.

am having same feeling like u... but to add some smartnesss to my girl.. am looking for the Palana ghar option

ही घ्या आजोळच्या संचालिकांची मुलाखत - मुलाखत

पाळणाघरं इतकी काही वाईट नसतात, प्रत्येकाचा अनुभव वेगळा. मला तरी आजोळचा चांगला अनुभव आला आहे. आपलं मूल हे आपली जबाबदारी असं आम्हा दोघांना वाटतं त्यामुळे आम्ही पाळणाघराचा पर्याय निवडला. घरात मुलगी ठेवणं का कोण जाणे मला अनकंफर्टबेल वाटतं.

आजोळबद्दल मी चांगलं ऐकून होते. पण माझ्या मैत्रिणीचा फारच वेगळा अनुभव....

तिच्या अडीच वर्षाच्या मुलीला पहिल्या दिवशी तिथे ठेवून ती ऑफिसला गेली. संध्याकाळी येऊन बघते तर मुलगी नाही. सगळीकडे शोधलं तरी मुलगी सापडत नव्हती. मैत्रिण रडकुंडीला....

अखेर शोध लागला... काही मुले परस्पर ग्राऊंडला जात असत व्हॅन किंवा रिक्षाने. त्यात ही छोटी जाऊन बसली बाकीच्यांबरोबर आणि गेली कि ग्राऊंडला.तिथे पोचल्यावर रिक्षावाल्यांच्या लक्षात आलं ही रोज येणारी नाही. मग त्यानी परत 'आजोळ' मधे आणुन सोडलं....पण तोवर इथे आकांत झाला होता.

मैत्रिणीचे परत काही धाडस झाले नाही मुलीला तिथे ठेवण्याचे......

माझं मत....

पाळणाघरात ठेवायचेच झाल्यास मोठ्या/professional ठिकाणी ठेऊ नये. वैयक्तिक लक्ष रहात नाही.घरगुती सालस बाई बघून ठेवावे.

माझी मुलगी १० महिन्यांची असल्यापासुन ५ वर्षापर्यंत एका काकुंकडे होती. अगदी घरासारखं जरी नाही तरी छान वातावरण होतं. माझी मुलगी चांगली रमायची.

कशामुले?? तुम्हि घरि नस्ता म्हनुन का?? >> हो आम्ही घरात नसतो हे एक कारण आहेचं. घरी असतानाही मदतीला वगैरे ठेवावी असं नाही वाटतं, घरात कोणी असताना आपण फ्रीली नाही वागू शकतं.

मुलांमधे खेळणं आणि घरी ''राजा" बनून खेळणं ह्यात फरक असेलं असं वाटतं. शेअर करणं, खेळ काळजीपूर्वक वापरणं हे बाहेर चागलं शिकलं जातं. बरं ती मुलगी काय आपलं मूल रडू / ओरडू नये म्हणून त्याचचं ऐकणार.

@गीता Sad

मी स्वतः अनेक वर्ष पाळणाघरात राहिलेय.
एकटेपणाची जाणिव वगैरे यायचीच. इसिक्युअर वाटायचं.तरी माझ्या आईचा जॉब ५ तासांचा होता.
आजकाल मुलांचेआई बाबा (नाईलाजाने) पुर्ण दिवस घरा बाहेर असतात त्या पुर्ण दिवसात मुलांना फार फील होत असेल.
मी अक्षरशः शाळेतून आल्यावर पाळणाघरातल्या काकूंच्या घराचं दार वाजवण्याआधी पार्किंग मधे थांबून रडून घ्यायचे आणि मग डोळे पुसुन दार वाजवायचे.डब्यातलं गार अन्न जायचं नाही पण काकूंना घाबरून खायला लागायचं.दुपारी झोपेचा जो तास होत अत्या तासात झोप यायची नाही तरी डोळे मिटून पडावं लागाय्चं.

हे जरी असलं तरी मी माझ्या वयाच्या इतर मुलांच्या तुलनेत फार पटकन जबाबदार आणि स्वावलंबी झाले होते हे ही खरंच.
शाळेत इतर मुलांच्या आया त्यांचं दप्तर पकडून रोज त्यांना आणायला सोडवायला जायच्या त्याच वेळी मी मात्र एकटी शाळेत जायचे (तिसरीमधे असताना)
रस्ता क्रॉस करताना इतर कोनाच्या आधाराने करायचे पण आपण कोणाला तरी 'मला रस्ता क्रॉस करायला मदत करा' हे म्हणलं पाहिजे हे मला शिकवावं लागलं नाही.

मी इतकी स्वावलंबी आहे त्याचं बरचंस श्रेय पाळणाघरालाच जातं.

पाळणाघराने मला शेअरींगची सवय लावली. आपल्यापेक्षा लहानांची काळजी घ्यायला शिकवलं.
त्यानंतर माझ्या लहान बहिणीला अनेक वर्ष आई घरी येईपर्यंत मीच सांभाळलं .
आजी ओबत राहिले असते तर कदाचित हे चित्र वेगळं असलं असतं.
मी अति लाडावलेली वगैरे झाले असते
(जवळची काही उदाहरणं पाहून हे लिहितेय. सगळ्यांनाच अ‍ॅप्लिकेबल असेल असं नाही)

त्याच पाळणाघरात ताटात अन्न ठेवायचं नाही हे शिकवलं गेलं (आजी सोबत राहिले असते तर कदाचित जाऊ देत म्हणून आजीने टाकू दिलं असतं). तिथे लहान मुलांसाठी गाणी- गोष्टींच्या कॅसेट्स लावल्या जायच्या, त्या ऐकुन ऐकुन मी कथाकथन शिकले. अनेक बाबतीत डेव्हलपमेंट झाली माझी पाळणाघरामुळे Happy

थँक्स Happy

कोणतीच गोष्ट अशी नसते की ज्याचे फक्त फायदे आहेत.
फायद्यांसोब्त तोटे येतात आणि तोट्यांसोबत फायदे.

तुम्हाला तुमच्या बाळाला पाळणाघरात ठेववसं का वाटतंय आणि का वाटत नाहीये त्याची लिस्ट बनवा. एकदम मनापासून खरी खरी कारणं लिहा.

जी लिस्ट तुम्हाला भारी वाटेल ते करा Happy

एकच मुद्दा- आपण लहान असतानाची पाळ्णाघर आणि आत्ताची पाळणाघर यात खुप फरक आहे . तेव्हा संभाव्य धोके आणि फायदे दोनीही वेगळे आहेत. त्याचा जाणिव पुर्वक विचार व्हायला हवा.

Pages