सवय

Submitted by योगी on 20 January, 2009 - 03:03

सवय...
तुझी वाट पहाण्याची
तू येणार नसतानाही

सवय...
तुझ्याशी गप्पा मारण्याची
तू ऐकत नसतानाही

सवय...
तुला पहात बसण्याची
तू समोर नसतानाही

सवय...
तुझ्या मिठीत हरवण्याची
तू जवळ नसतानाही

सवय...
अशा कित्येक सवयी सोबत घेउन जगण्याची
तुझ्याशिवाय जगणं शक्य होत नसतानाही...

-योगेश

गुलमोहर: 

छान आहे 'सवय' योगेश.... अश्रु ढाळणारी तर कवितेला दिलेला एक खास टच आहे... मस्तच.

सुन्दर. आवडली ही सवय.
जयदीप ओक
**********
मी दुसर्यांन सारखा होऊ शकत नाही कारण मी माझत्वं घालवु शकत नाही.

तु सवय लावणार मला, तुझ्या पुढच्या कवितेची आतुरतेने वाट पाहण्याची. Happy

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

कुंद कहाँ, पयवृंद कहाँ, अरु चंद कहाँ ,
...................... सरजा जस आगे ...?
बाज कहाँ, मृगराज कहाँ, गजराज कहाँ ,
.................... तेरे साहस के आगे...?

पल्लवी, जयदीप, विशाल,
प्रतिसादांसाठी धन्यवाद...

तु सवय लावणार मला, तुझ्या पुढच्या कवितेची आतुरतेने वाट पाहण्याची.

विशाल, अशी सवय नको लावून घेउस रे बाबा! माझा स्पीड खूप कमी आहे. गेल्या ६-७ वर्षात मी फक्त ४ च कविता लिहील्या आहेत. आणि ही त्यातलीच एक.... Happy

-योगेश

हे बरय, आधी हात धरुन दारु प्यायला बसवायचं आणि मग दारु पिणं कसं चांगलं नाही ते सांगायचं. Proud

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

कुंद कहाँ, पयवृंद कहाँ, अरु चंद कहाँ ,
...................... सरजा जस आगे ...?
बाज कहाँ, मृगराज कहाँ, गजराज कहाँ ,
.................... तेरे साहस के आगे...?

कविता छानच पण अश्रु ढाळणारीच काय प्रयोजन ?

योगेश 'सवय' अप्रतिम आहे. डोळ्यात आलेले अश्रू डोळ्यातच साठवणारी

छायाताई, अश्रू ढाळणारीचं प्रयोजन फक्त वातावरणनिर्मीती करिता आहे. Happy

विशाल... Biggrin

-योगेश

सुंदर आहे कविता...आणखी येऊदेत...थोडासा स्पीड वाढवा ना Happy

*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

अजून काही चांगल्या सवयी लावून घ्याव्या. इतरांसाठी.
.........................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

सुरेख.... !!
स्पीड वाढवा की जरा... लिखाणाची Happy

आपली सवय आवडली, कविता खुप अप्रतीम आहे....

अप्रतिम कवीता !!! खुप आवडली !!!! Happy