एखादा शेतकरी आत्महत्या करत असतो, आणि मिडिया त्याला वाचवण्याऐवजी त्यात एक सनसनाटी न्यूज शोधत असते.
तो मेल्यावर त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्याऐवजी मग आता कसे वाटतेय तुम्हाला म्हणत त्यांच्या मुलाखती घेत असते.
एखाद्या ठराविक राजकीय पक्षाला फेव्हर करणे, एखाद्याच्या मागे हाथ धुवून लागणे, तर एखाद्याची ईमेज उजळवायचे प्रयत्न करणे, एखादी ब्रेकींग न्यूज आपल्याच चॅनेलवर कशी पहिला दिसेल हे बघणे तर एखाद्या कार्याचे श्रेय घ्यायला धडपडणे..
प्रसारमाध्यमांचे हे बदलते व्यावसायिक रूप आपल्याला काही आता नवीन राहिले नाही.
हि नक्कीच शरमेची गोष्ट आहे पण तरीही हे असेच चालायचे म्हणून आपण स्विकारले आहे,
पण आज खालील बातमी वाचली, आणि खरेच एक भारतीय म्हणून शरम वाटली.
#GoHomeIndianMedia
भारतीय मीडियावर नेपाळींची टीका
नेपाळमध्ये २५ एप्रिलला झालेल्या भूकंपाच्या जखमा भळभळत असताना आणि या तीव्र दुःखातून तेथील जनता सावरण्याच्या प्रयत्नात असताना भारतीय प्रसारमाध्यमांनी मात्र भूकंपाचे कव्हरेज करताना असंवेदनशीलतेचा कळस गाठला, असा संताप नेपाळी जनतेने ट्विटरवर व्यक्त केला. काल दिवसभर #GoHomeIndianMedia हे ट्रेंडिंग ट्विटरवर होते. रविवारी दिवसभरात सुमारे १ लाख ४४ हजार ट्विट पडले होते.
सविस्तर बातमी इथे वाचा - http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Go-home-Indian-media-Nepal...
मला तरी बातमीच्या विश्वासार्हतेबद्दल जराही शंका नाही एवढा विश्वास आहे आपल्या मिडियावर..
पण याउपर आपण स्वत:ही गूगाळून शोधू शकता.
एक संवेदनशील भारतीय नागरीक म्हणून मी याचा निषेध करतो!
पण तरीही एक प्रश्न उरतोच, या प्रकारांना अंकुश कसा लावायचा!?
वर मलाच हिपोक्रसीचा अर्थ
वर मलाच हिपोक्रसीचा अर्थ सांगत आहात!! >> तुम्हाला उद्देशुन एकही पोस्त या धाग्यावर लिहिलेली नाही.
तुमचे नाव आले म्हणजे तुम्हाला उद्देशुन काहीतरी म्हटले असे होत नाही.
ते स्क्रीनशॉट माबो जनांच्या जनहीत मे जारी हय. नकाशासारखे. आहे हे अस आहे.
Pages