कैसा जगेन आता ?

Submitted by इस्रो on 4 May, 2015 - 03:30

गझले तुझ्याविना गं कैसा जगेन आता?
नातेच या जगाशी मी संपवेन आता

नजरेस या जगाच्या येणार ना जरी मी
तू पाहशील तेथे तुज आढळेन आता

बदूंक वा सुर्‍याची नाही गरज मुळीही
बंदी गझल लिहाया करता मरेन आता

करतील लोक सारे माझीच रोज चर्चा
एखाद गझल मीही ऐसी रचेन आता

तू लावलास 'इस्रो' इतका लळा कशाला?
डोळ्यातुनी तुझ्यारे मी ओघळेन आता

- इस्रो [भ्रमणध्वनी ९९२१ १०४ ६३०]

Group content visibility: 
Public - accessible to all site users