चुकार..

Submitted by के अंजली on 3 May, 2015 - 12:12

मनात दडला चुकार पाऊस
अवेळ पाऊस रिमझिमतो
बनात फिरुनी अधीर गाणी
पुन्हा कुणाची गुणगुणतो..

भरुन वारा पिसाटलेला
उनाड वाटा भिरभिरतो
घरात शिरुनी भरात फिरुनी
उभार अंगी थरथरतो..

पल्याड नावा अल्याड गावा
काठ नदीचा डुचमळतो
उधाण हाका भरात नौका
पाउस वेडा भरकटतो..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनात दडला चुकार पाऊस
अवेळ पाऊस रिमझिमतो
बनात फिरुनी अधीर गाणी
पुन्हा कुणाची गुणगुणतो>>> भारी ! आवडेश

पूर्ण कविता सुंदर