चला गड्यांनो भेटू या

Submitted by विनायक. दि.पत्की. on 2 May, 2015 - 04:38

आजकाल मित्राना मैत्रिणींना प्रत्यक्ष भेटणे दुर्मिळ होत चालले आहे त्यात whatsapp, facebook मायबोली सारख्या माध्यमानी दुधाची तहान ताकावर म्हटल्या प्रमाणे थोडाफार हातभार लावला आहे पण ग्रुप वर असलेल्या मित्र मैत्रिणींनी सुद्धा केव्हातरी प्रत्यक्ष भेटून आनंद लुटला पाहिजे या साठी भेटलेच पाहिजे ना ?

चला सवंगड्यांनो भेटू या

मनी ची ईच्छा पुर्ण करण्या
एकदा तरी भेटू या
मनमोकळी भेट घेऊनी
सुखदु:ख आपले वाटू या

गुज गोष्टी सांगण्या साठी
ठिकाण आपले गाठू या
ठरवलेले करण्यासाठी
एकदा तरी भेटू या

मनातले काहूर दूर लोटण्या
मौज मजा लुटू या
स्वप्ने रंगवत बसण्यापेक्षा
प्रत्यक्ष एकदा भेटू या

बारीक खोड्या करून आता
चिडवण्या साठी खेटू या
समजूत काढुन हसण्यासाठी
खरेच एकदा भेटू या

गाणे गाऊनी जुन्या आठवणी
परत एकदा घोटू या
प्रगती आपली कळण्यासाठी
खरंच एकदा भेटू या

स्पर्धे मधूनी कौशल्य दाखवत
दुकान आपले थाटू या
देण्या बक्षीस एकमेका
खरंच आता भेटू या

टवाळक्या करत मधुरस
मैत्रीचा मनसोक्त चाटू या
मनोरंजनात चिंब भिजण्या
खरंच एकदा भेटू या

एकदा भेटून परिचय आपुला
नित्य दाटू या
नाते मैत्रीचे सोसूनी अडचणी
अखेर पर्यंत रेटू या

चला गड्यांनो भेटू या
खरंच लवकर भेटू या

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol Lol Happy Happy

खरेच Get together सारखे कार्यक्रम खूप आनंद देतात हे नक्की