मासिक भविष्य मे २०१५

Submitted by पशुपति on 30 April, 2015 - 12:49

राशिभविष्य
मे २०१५
(के.पी.पद्धतीप्रमाणे)

(टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्य वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा. )

मेष : मेषेचा स्वामी मंगळ द्वितीयात व राहू षष्ठात शरीर प्रकृतीची विशेष काळजी जरुरीचे आहे. विशेषतः ज्यांना मंगळ महादशा किंवा अंतर्दशा असेल त्यांना जास्त जाणवेल. द्वितीयातील मंगळ, बुध आर्थिक बाबतीत फारसे प्रबळ नाहीत पण शुक्र काही लाभ निश्चित करून देईल. चतुर्थातील शुक्र घरातील वातावरण आनंदी ठेवील. पंचमेश रवि लग्नात व शुक्र तृतीयात असल्याने मुलांच्या बाबतीत काळजीचे कारण नाही. जोडीदाराशी सुख संवाद होतील. दशमेश शनि अष्टमात वक्री आहे. त्यामुळे कामाचा ताण काही काळापुरता कमी होईल. लाभेश शनि आहे. आर्थिक आवक फारशी दाखवत नाही. द्वाद्शेश गुरु चतुर्थात असल्याने फारसे प्रवास होऊ शकणार नाहीत. एकंदरीत हा महिना संमिश्र स्वरूपाचा आहे.

वृषभ : वृषभ राशीचा स्वामी शुक्र द्वितीयात व मंगळ बाराव्या स्थानात पैश्याची चिंता दाखवत आहे. कदाचित अडकलेले पैसे हे कारण असू शकेल. तब्येतीवर परिणाम’ होण्याची शक्यता आहे. तृतीयातील गुरु वक्ते, प्रवचनकार इत्यादींना चांगला आहे.तृतीयेश चंद्र एप्रिलच्या मध्यात प्रवास घडवेल. नवीन घर घेणार असाल तर बेत पुढे ढकलणे योग्य होईल. कदाचित मनासारखा काम होणार नाही. पंचमात राहू व रवि बराव्यात मुलांच्या कडे लक्ष द्यावे लागेल असे दिसते. बँकेचे कर्ज घेणार असाल तर पहिल्या आठवड्यात जास्त लाभदायक आहे. कौटुंबिक संदर्भात थोडी नाराजी राहील असे दिसते. अष्टमेश गुरु तृतीयात व बुध लग्नी भाऊ बहिणी संबंधी काही काळजी अगर चिंता दाखवत आहे. दशमेश शनि सप्तमात व शुक्र द्वितीयात व्यापार करणाऱ्यांना लाभदायक आहे. लाभातील केतू व तृतीयात गुरु काही प्रमाणात आर्थिक लाभ दाखवत आहे. परदेशात नोकरी अगर व्यासाय करणाऱ्यांना उत्तम लाभ आहेत. एकंदरीत हा महिना समिश्र स्वरूपाचा आहे.

मिथुन : मिथुनेचा स्वामी बुध द्वादश भावात, रवि लाभत व शुक्र लग्नी व मंगळ द्वादश भावात, हे योग एकमेकांना विरोधी वाटतात. तसेच दुसऱ्या पंधरवड्यात रवि पण बारावा होत आहे. त्यामुळे स्वतःची प्रकृतिची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. आर्थिक बाबतीत पहिले पंधरा दिवस ओके आहेत नंतर चे व्यवहार जपून करावेत अन्यथा पैसे अडकायची भीति आहे. द्वितीय भावातील गुरु व चंद्राची चंचल गती हेच निर्देश करत आहेत. तृतीयेश रवि लाभात व नंतर द्वादश, अनेकांना लांबचे प्रवास घडवून आणेल. ज्या मंडळींना नवीन घर घ्यावयाचे आहे त्यांनी पहिल्या पंधरा दिवसात बुक करून घेतल्यास मनासारखे घर व व्यवहार पार पडतील. लहान मुले तुमच्या भोवती पिंगा घालतील व मोठ्या मुलांचा अभ्यास घ्यावा लागेल. षष्ठातील शनि जुनी दुखणी डोके वर काढण्याचा संभव आहे. सप्तमेश गुरु द्वितीयात व बुध बाराव्या भावात कुटुंबात सुसंवाद राखणे कठिण वाटते. दशमातील केतू व दशमेश गुरु व्यावसायिक मंडळींना आर्थिक लाभ मिळवून देतील. एकंदरीत हा महिना समिश्र स्वरूपाचा आहे.

कर्क : कर्क राशीचा स्वामी चंद्र चतुर्थात, राहू तृतीयात व बुध लाभात हे योग प्रकृती उत्तम ठेवील. तसेच चंद्र आई व मनाचा कारक असल्याने तुम्ही घरच्या सर्व मंडळी बाबत भाऊक होणार असे दिसते. द्वितीयेश रवि दशमात असला तरी आर्थिक व्यवहार जपून करावेत. तृतीयेतील राहू अनेक लहान प्रवास देणार आहे. हा प्रवास ज्यांचा फिरतीचा उद्योग आहे त्यांना फायदेशीर होईल. पंचमेश मंगळ मुलांची काळजी ठेवणार नाही. तरीपण थोडे लक्ष देणे गरजेचे आहे. जोडीदाराशी मात्र थोडी कुरबूरी होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना काळजी घेतल्यास अपघात टळतील. नवमेश गुरु प्रथम भावात व बुध लाभात वर लिहिल्या प्रमाणे प्रवासातून लाभ हे दर्शवत आहे. दशमेश मंगळ लाभात व रवि दशमात कामाच्या ठिकाणी नक्की लाभ मिळवून देतील. फक्त मिळालेला लाभ नीट जपून ठेवणे आवश्यक आहे. एकंदरीत हा महिना बऱ्यापेकी आहे.

सिंह : सिंह राशीचा स्वामी रवि नवमात व गुरु पंचमेश धार्मिक कार्यास योग्य आहे. ज्यांना ह्या गोष्टीची आवड आहे अशांनी जरूर लाभ घ्यावा कारण योग्य वेळेस केलेल्या कार्याचा जास्त फायदा मिळतो. प्रकृति उत्तम राहील. काळजी नसावी. कन्या राशीचा स्वामी बुध दशमात व रवि नवमात तुमच्या कामात नशिबाचा सहयोग दाखवत आहे. पण आर्थिक आवक सर्वसाधरण राहणार आहे. तृतीयातील चंद्र महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धार्मिक स्थळांना भेट देण्याचा योग दाखवत आहे. वेल उत्तम आहे. त्यामुळे फिरून यायला हरकत नाही. बाराव्या भावातील गुरु शेयर अगर तत्सम गुंतवणूक सावधानतेने करावेत असा इशारा देत आहे. कौटुंबिक वातवरण खेळीमेळीचे राहील असे वाटते. दशमेश शुक्र लाभात व बुध दशमात हे योग नोकरी अगर व्यवसाय करणारास उत्तम आहेत. कामाची दखल घेतली जाईल असे कार्य हातून घडेल. लाभतील शुक्र अनेक गोष्टी मनाप्रमाणे पार पडतील. एकंदरीत हा सर्व बाजूनी उत्तम आहे.

कन्या : शरीर प्रकृति किरकोळ तक्रारी वगळता छान राहील. द्वितीयेश शुक्र दशमात, चंद्र द्वितीयात आर्थिक लाभाचे योग आहेत. लेखक, प्रकाशक, पुस्तक विक्रेते इत्यादींना काळ उत्तम आहे. व्यवसाय छान होईल असे वाटते. मुलाबाळांच्या अभ्यासाची काळजी नको. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. सुसंवाद घडतील. अष्टमातील रवि, मंगळ अचानक आर्थिक लाभ नाक्कीन देणार. नवमातील बुध धार्मिक व्यावसायिक यांना अडी अडचणीतून जायला लावून मग मनासारखे घडवेल. दशमात शुक्र व लाभात गुरु हे दोन्ही ग्रह नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना चांगले असून भरपूर लाभ करून देतील. एकंदरीत हा महिना सर्व दृष्टीने उत्तम आहे. एन्जॉय ....

तूळ : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चंद्र तुळेत, शुक्र नवमात, अनेक चांगल्या व मनासारख्या घटना घडण्याचा काळ आहे.प्रकृति पण छान राहणार आहे. त्यामुळे परिस्थितीचा भरपूर उपयोग करू घेणे तुमच्या हातात आहे. इतके जरी छान असले तरी आर्थिक आवक या बाबत दिरंगाई होईल असे वाटते. तृतीयेत धनु राशीचा स्वामी गुरु दशमात,बुध अष्टमात व शुक्र नवमात अडी अडचणीतून तुम्ही पुढे जाणार आहात. मुला बाळांचा अभ्यास तुम्हाला घ्यावा लागेल असे दिसते. शेयर अगर तत्सम गुंतवणूक जरा जपूनच करा. सप्तमातील मंगळ कौटुंबिक वातावरण जरा गरम ठेवील पण रवि तेथेच असल्याने पटकन निवळण्याची पण शक्यता आहे. गुरु दशमात व बुध अष्टमात नोकरी अगर व्यवसायात बराच ताण देणारा आहे. लाभेश रवि सप्तमात व शुक्र नवमात काही आर्थिक फायदा करून देतील. द्वादश भावातील राहू काहींना प्रवासाचे योग आणेल असे वाटते. एकंदरीत हा उत्तम आहे असे वाटते.

वृश्चिक : वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ सप्तमात, रवि षष्ठात प्रकृतीस जपणे अगत्याचे आहे. द्वितीयेश गुरु नवमात व बुध सप्तमात आर्थिकदृष्ट्या फार काही छान दिसत नाही. तृतीयेश शनि लग्नात, शुक्र अष्टमात वाद विवाद,चर्चा इत्यादी पासून दूर राहिल्यास शांतता मिळेल. मुलाबाळांच्या अभ्यासाबाबत चिंता राहणार नाही. कलगी नसावी. सप्तमात मंगळ, बुध, शुक्र अष्टमात कौटुंबिक वातावरण गरम राहण्याची शक्यता आहे. थोडे नमते, गोडी गुलाबीने घेतल्यास नो प्रॉब्लेम्स. सहकुटुंब धार्मिक स्थळांना भेटी देण्याचा योग आहे. जरूर भेट द्या. राहू लाभात आहे. धन भावातून आवक कमी असली तरी राहूमुळे ती कसर तुमच्या कामाच्या ठिकाणी भरून निघेल. अष्टमेश सप्तमात, द्वादशेष अष्टमात, कुणाच्यातरी आजारानिमित्त हॉस्पिटलला भेट देण्याचा संभव आहे. एकंदरीत महिना संमिश्र आहे..

धनु : धनु राशीचा स्वामी गुरु अष्टमात आणि बुध षष्ठात, शरीर प्रकृतीस जपणे आवश्यक आहे. दोन्ही भाव प्रकृतीस मारक आहेत. द्वितीयेश शनि बाराव्या भावात आणि शुक्र सप्तमात त्यामुळे खर्चाची बाजू बरीच वाढती राहील असे दिसते. मुलाबाळांच्या अभ्यासाच्या दृष्टीने काळजीचे कारण नाही. वर लिहिल्याप्रमाणे षष्ठातील मंगळ आणि बुध ह्यामुळे उष्णतेचे विकार किंवा बुधामुळे मज्जासंस्थेबाबत त्रास होऊ शकतात. सप्तम भावातील शुक्र आणि षष्ठातील मंगळ-बुध कौटुंबिक स्वास्थ्यात थोडाफार बिघाड आणू शकतात. राहू दशमात आणि बुध षष्ठात नोकरी अगर व्यवसायात आर्थिक दृष्ट्या उत्तम आहेत. एकंदरीत हा महिना संमिश्र राहील असे दिसते.

मकर : मकर राशीचा स्वामी शनि लाभात आणि शुक्र षष्ठात, प्रकृती सर्वसाधारण ठीक राहील. शनि वक्री असल्याने आर्थिक बाबतीत दिरंगाई होण्याची शक्यता आहे. तृतीयेश गुरु अष्टमात आणि बुध पंचमात ज्यांची मुले बरीच मोठी झाली असतील, त्यांच्याशी किरकोळ स्वरूपाचे वादाचे प्रसंग येतील, तरी मुलांबरोबर सामोपचाराने घ्यावे. रवि चतुर्थात आणि मंगळ-बुध पंचमात ही ग्रहस्थिती मुलाबाळांच्या अभ्यासाच्या दृष्टीने उत्तम आहे. षष्ठेश बुध पंचमात आणि रवि चतुर्थात ह्या ग्रहस्थितीमुळे वर लिहिल्याप्रमाणे प्रकृतीबाबत काळजी करण्याचे कारण नाही. सप्तमातील गुरु जोडीदाराबरोबर सलोख्याचे वातावरण ठेवील. अष्टमेश रवि चतुर्थात आणि शुक्र षष्ठात त्यामुळे वाहने जपून चालवणे आवश्यक आहे. नोकरी अगर व्यवसाय करणाऱ्यांना काही प्रमाणात लाभ होण्याची शक्यता आहे. लाभेश मंगळ पंचमात व शनि लाभातच वक्री असल्याने वर लिहिल्याप्रमाणे काही बाबतीत बरीच दिरंगाई होण्याची शक्यता आहे. एकंदरीत महिना संमिश्र राहील असे दिसते.

कुंभ : कुंभ राशीचा स्वामी शनि दशमात आणि शुक्र पंचमात ह्या ग्रहस्थितीमुळे प्रकृती उत्तम राहील. द्वितीयेश गुरु षष्ठात आणि बुध चतुर्थात असल्याने ज्यांना घरासंबंधी कर्ज घ्यायचे आहे त्यांचे हे काम लवकर मार्गी लागेल. तृतीयातील रवि काही लोकांना प्रवासाचे योग दाखवतो. पंचमात शुक्र आणि चतुर्थात मंगळ-बुध मुलाबाळांच्या अभ्यासाच्या दृष्टीने उत्तम आहेत. षष्ठातील गुरु आर्थिक लाभाच्या दृष्टीने चांगला आहे, काहीतरी आर्थिक लाभ नक्की होणार हे दर्शवतो! जोडीदाराशी सुसंवाद राहील व घरातील वातावरण आनंदी राहील. अष्टमेश बुध चतुर्थात आहे व रवि तृतीयात त्यामुळे वाहने चालवताना सावधगिरी बाळगावी. नवमातील चंद्र महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वर लिहिल्याप्रमाणे बऱ्याच लोकांना प्रवासाचे योग दाखवत आहे. दशमात शनि व तृतीयात रवि असल्याने तुमच्या हाती घेतलेल्या कार्यात यश मिळेल. शनि वक्री असल्याने कदाचित कार्यातील यश मिळण्यास थोडा विलंब लागेल. एकंदरीत हा महिना चांगला आहे.

मीन : मीन राशीचा स्वामी गुरु पंचमात व शनि नवमात ह्यामुळे १-५-९ धर्मत्रिकोण असल्याने हा काळ सत्संग करण्यासाठी उत्तम आहे. धार्मिक बाबी अगर अध्यात्माची आवड असणाऱ्यांनी ह्या संधीचा लाभ जरूर घ्यावा. द्वितीय स्थानातील रवि आर्थिक बाबतीत फारसा उपयोगाचा नाही. तृतीयात मंगळ आणि बुध हे दोन ग्रह ज्यांचा व्यवसाय शिक्षणाशी संबंधित आहे (पुस्तक विक्रेते, लेखक, कमिशन एजंट इ.) त्यांना हा काळ यशदायी आहे. शुक्र चारचाकी वाहनाचा कारक असल्याने काही लोकांना कार घेण्याचा योग येईल. गुरु पंचमात आणि शुक्र चतुर्थात असल्याने मुलाबाळांचा अभ्यास आणि एकंदरीत प्रगती उत्तम राहील. षष्ठेश रवि द्वितीयात आणि शुक्र चतुर्थात, घरासंबंधी किंवा घरातील इतर गोष्टींसाठी कर्ज घ्यायचे असल्यास काम सुरळीत व जलद होण्याची शक्यता दाखवतात. जोडीदाराशी जुळवून घेतल्यास वातावरण सलोख्याचे राहील. दशमेश गुरु पंचमात आणि बुध तृतीयात हा योग तुमच्या कामाच्या दृष्टीने उत्तम आहे. लाभेश शनि नवमात असल्याने आर्थिक लाभ म्हणावा तितका होऊ शकणार नाही, मात्र अध्यात्मिक लाभ भरपूर होतील. एकंदरीत हा महिना आर्थिकदृष्ट्या कमी व अध्यात्मिक दृष्ट्या बरेच लाभ मिळवून देणारा आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users