बरेचसे मायबोलीकर परदेशस्थ असल्याने त्यांना भरपुर विमानप्रवास घडत असणार. प्रवास म्हटला की अनुभव आलेच. विमानप्रवासातही अनुभव थोडेच चुकताहेत? हा बीबी अशाच गंमतीजंमती शेअर करण्यासाठी.
माझा विमानप्रवास अतिशयच मर्यादित आहे. तरीसुद्धा त्यात मला एक गंमतीशीर अनुभव आला. तो इथे देते.
लेहला गेलो होतो. येताना दिल्ली विमानतळावर बोर्डींगपास घेताना काऊंटरवरच्या बाईला "विन्डो सिट प्लिज" ही विनंती केली. बाई जरा जास्तच हायफाय होती. चेह-यावरची इस्त्री न मोडता तोंडातल्या तोंडात कायतरी पुटपुटून तिने मला दोन बोर्डींग पास दिले. नंबर चेक केले तर दोन्ही नंबरात ४-५ आकड्यांचा फरक होता. "दोन्ही सीट्स विन्डो सीट्स आहेत बहुतेक" असे अनुमान मी जराशा खुशीतच काढले. जातानाही मी विंडो सीट मागितलेल्या तेव्हा एकच विन्डो मिळालेली, तीही दुर्दैवाने माझ्या बोर्डींगपासाला. त्यामुळे विमानात चढल्यावर लेकीने दादागिरी करुन ती स्वतःला बळकटावलेली.
विमानात चढल्यावर कळले की काऊंटरवाल्या बाईने तिच्या सिट अलोकेशनच्या स्वातंत्र्याचा मी योग्य तो आदर न राखल्याचा सुड माझ्यावर उगवलेला. आम्हा दोघींच्याही सिट्स चक्क मिडल सिटस होत्या. आणि त्याही एकमेकींपासुन दुर. मुलीच्या बाजुच्या विंडो सिटवर एक स्त्री बसलेली आणि तिच्या बाजुची सिट रिकामी होती. मी मिडल सिटवर न बसता बाजुच्या सीटवर बसले पण आयल सिटवाला बाब्या आल्यावर मला नाईलाजाने मिडलला शिफ्ट व्हावे लागले. माझ्या बाजुच्या विंडोला कोणी स्त्री यावी ही आशा मी बाळगुन होते पण थोड्या वेळाने तिथेही एक बाब्या आला. दोघांच्या मध्ये बसणे मला जरा त्रासदायक वाटू लागले म्हणुन मग मी आयलवाल्याला मिडलला बसण्याची विनंती केली . (भारतीय विमानातुन प्रवास करणा-यांना माहित असेल की विमानातल्या सिटा आपल्या एस्टीमधल्या सिटापेक्षाही जास्त अनकंफर्टेबल असतात). बिचारा बसल्याबसल्या त्याची डायरी काढुन काहीतरी लिहित होता. मिडल सिटवर त्याला लिहायला थोडा त्रास होणार होता पण त्याने माझी विनंतीला मान देऊन जागा बदलली.
मी माझ्या सीट बसुन लेकीवर एक डोळा ठेऊन होते. तिच्या शेजारी जर कोणी आले नाही तर तिथे जाऊन बसण्याचा माझा बेत होता. विमान आता जवळजवळ भरत आलेले आणि हवाईसुंद-यांची लगबग सुरू होती. मी एकीला वाटेतच थांबवुन "मी त्या अमुकतमुक सीटवर बसु का" म्हणुन विचारले. माझ्या शेजा-याने ते ऐकले. तो माझ्याकडे चमकुन बघत राहिला. थोड्या वेळाने त्याने मला विचारले, "तुला खरेच त्या तिथे जाऊन बसायचे आहे काय?" त्याच्या आवाजात जरा जास्तच खेद भरलाय असे मला वाटले आणि क्षणार्धात त्याच्या डोक्यात काय चाललेय ते माझ्या लक्षात आले. त्याने माझ्यासाठी जागा बदलल्यावरही मला तिथे अनकंफर्टेबल वाटतेय आणि म्हणुन मी तिथुन उठुन जिथे दोन बायका बसल्यात तिथे त्यांच्या शेजारी जाऊन बसायला धडपडतेय असा त्याचा ग्रह झालेला बहुतेक. मी त्याला सांगितले की माझी मुलगी तिथे त्या सिटवर बसलीय आणि तिच्या शेजारची जागा अजुनही रिकामी आहे. ते ऐकल्यावर तो मान मागे टाकुन दोन मिनिटे हसत राहिला. मग त्याने मला आधीच एकत्र सीट्स का घेतल्या नाहीत म्हणुन विचारले. मी त्याला सगळा किस्सा सांगितला आणि आम्ही दोघांनी मिळून त्या बाईला हव्या तशा शिव्या घालुन घेतल्या. मग अजुन थोड्या गप्पा मारत होतो तेवढ्यात हवाई सुंदरीने येऊन मला त्या दुस-या सीट्वर बसायची परवानगी दिली. मग अजुन थोड्या गप्पा मारुन मी लेकीशेजारी जाऊन बसले. मी थोड्या वेळाने पाहिले तर तो बाब्या परत आयलसीटवर शिफ्ट होऊन मधल्या रिकाम्या सीटमुळे मस्त व्यवस्थित मोकळाढाकळा बसुन त्याच्या डायरीत काहीतरी खरडत होता. 
तर मंडळी तुमचेही काही गंमतीशीर अनुभव असतील तर येऊ द्या.
ओव्हर बूकिंग झाले, एकच सीट
ओव्हर बूकिंग झाले, एकच सीट नंबर दोन जणांना दिला, ज्यादा सामानासाठी रिसिट न घेता (
हे पूर्वी व्हायचे आता नाही ) पैसे भरले, आयत्यावेळी फ्लाइट बदलले, कनेक्टींग फ्लाईट चुकले... अश्या अनेक कारणांसाठी मला अपग्रेड मिळाले आहे. पण एक मात्र आहे, हवाई सुंदर्या, हा अपग्रेड करून आलाय म्हणून कमी लाड करत नाहीत. करायचे तेवढेच करतात.
केनया एअरवेजमधे तर चक्क डिझायनर कपबशी मधे मसाला चहा दिला होता. ( बाय द वे, सिंगापूर एअरलाइन्स मधे मस्त मसाला चहा मिळतो. )
निधप, जेट मुंबई नेवार्क (
निधप, जेट मुंबई नेवार्क ( ब्रसेल्स ला स्टॉप ओव्हर) मी नवरा अन लेक तिघे जण होतो. लेग स्पेस जास्त म्हणून इमर्जन्सी एक्झिट ची रो ३ सिट्स वेब चेकिन करून बूक केल्या होत्या. प्रत्यक्षात, लहान मुलाना ,इमर्जन्सी एक्झिट रो मधे सिट असाईन करता येत नाही म्हणून सिट्स बदलाव्या लागल्या . ब्रसेल्स पर्यन्त एक सिट अपग्रेड आणि पुढे तिन्ही अप्ग्रेड.
एकदा एयर इंडिया बंगलोर पुणे पण मिळाली होती अपग्रेड करून . ( फ्रि॑वेन्ट फ्लायर कार्ड नसूनही ) ह्याबाबतीत माझ नशीब जोरात !
कैरो-बहारीन-मुंबई असा गल्फ
कैरो-बहारीन-मुंबई असा गल्फ एअरचा प्रवास होता. मी नेहमीच शक्यतो गल्फ एअर टाळतो. ऐन वेळेस प्लॅन केल्यामुळे फक्त गल्फ एअरचेच बुकिंग उपलब्ध होते, मी ज्या दिवशी कैरोहून निघणार होतो त्याच्या आधल्यादिवशीच गल्फ एअरच्या कैरो-बहारीन विमानाला बहारीन उतरताना अपघात झाला होता. त्यामुळेही कदाचित गल्फ एअरचं विमान बर्यापैकी रिकामं होतं. बहारीनला विमान व्यवस्थित उतरवल्यावर 'अल्ला हू अकबर'च्या आरोळ्या झाल्या.
बहारीन-मुंबई विमानाने नियोजित वेळेवर टेक ऑफ केलं. हेही विमान बर्यापैकी रिकामं होतं. मस्कतवरुन ऊडत असताना ३७००० फूट उंचीवरुन विमानाने अचानक नोज डाईव्ह घ्यायला सुरुवात केली. केवळ २५-३० सेकंदात विमान ९००० फूटांवर आलं. तोपर्यंत विमानात प्रवाशांची आरडाओरड, रडारड असा सगळा गोंधळ चालू होता. तेवढ्यात पायलटने अनाउन्स केलं की केवळ १० सेकंदांनी आमच्या विमानाने दुसर्या विमानाबरोबर होऊ घातलेला head on collision टाळला होता. लागोपाठच्या दिवशी २ मेजर अपघात गल्फ एअरच्या नावावर होण्याचे टळले.
मुंबईला उतरताच गल्फ एअरला रामराम केला तो आजपर्यंत.
इन्ने, चोळ मीठ जखमेवर..
इन्ने, चोळ मीठ जखमेवर..
आशुतोष०७११ बाप्रे !!!
आशुतोष०७११ बाप्रे !!!
बापरे तोषा!
बापरे तोषा!
इन्ना, असा टर्ब्युलन्स मी
इन्ना, असा टर्ब्युलन्स मी कलकत्त्याहून एकटी येताना अनुभवला होता. पण दिरांनी आधीच सांगून ठेवलं होतं की ह्या भागात भरपूर टर्ब्युलन्स असतो त्यामुळे मी विमान धडाधडा हलू लागल्यावरही निवांत राहिले होते.
मुंबई दिल्ली प्रवासात एकदा (२३ डिसेंबर) जयपूरवरुन विमान मागे फिरवून इंदूरला उतरवलं होतं आणि रात्री कुडकुडत्या थंडीत एका हॉटेलमध्ये नेलं होतं. रात्री जेवणच दिलं नाही. सगळ्या पॅसेंजर्सनी भूक भूक केल्यावर भजी तळून दिली होती. दुसर्या दिवशी दुपारी परत एअरपोर्टला आणून संध्याकाळी दिल्ली. तरी सकाळी ११ वाजता माझा इंदुरात फिरुन माहेश्वरी साडी घ्यायचा विचार होता जो नवर्याने हाणून पाडला होता.
अश्विनी , हो इथे हैद्राबाद
अश्विनी , हो इथे हैद्राबाद पुणे सेक्टर ला ही असतो नेहेमीच टर्ब्युलन्स, पण टायफून चा अनुभव म्हणजे, आयुष्यातल्या सगळ्याची उजळणी ,पापांची माफी , ज्यासाठी निघाले होते त्या प्रोजेक्ट च आता काय होईल अशी काळजी, लेकाला निघताना रागावल्याची , नवर्या शी भांडल्याची खंत, आईबाबांना रोज फोन न केल्याबद्दल बोच, अकांट नंबर्स , वेगवेगळे पासवर्ड्स आता नवर्याला शोधता येतिल का ,गळ्यातल्या चेन अन बोटातल्या अंगठीवरून मला ओळखतील का, फेसबूकावर न्युज ब्रेक केल्यावर कोण कोण काय काय लिहिल ... एक ना दोन , सग्ळ सग्ळ अर्ध्या तासात कॉम्पॅक्ट
इन्ना, काय हे!
इन्ना, काय हे!
९ वीच्या परिक्षेनंतरच्या
९ वीच्या परिक्षेनंतरच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आईबाबांबरोबर केरळ, तामिळनाड वगैरे ट्रिपला गेले होते होते तेव्हा मुंबई-मदुरै विमानाने गेलो होतो. तेव्हा विमानात खायला प्यायला देत असत. हवाई सुंदरी काय हवं विचारायला आली तिच्या मेनूपैकी मी मॆंगो पल्प मागितला. मस्त पैकी मॆंगो पल्पचा एक ग्लास आणि दोन मोठ्ठ्या कुक्या दिल्या तिने आणून. ते कॊम्बो मला इतकं आवडलं. आणि बहुतेक त्या काळात रेअर असलेला विमानप्रवास, सगळा गुळगुळीत, चकचकीत माहौल म्हणूनही असेल पण मॆंगो पल्प आणि गुडडे बिस्किटे(याचीच फक्त चव त्या कुक्यांच्या जवळ जाणारी होती असे मी ठरवले होते) हे माझे समाधी फूड बनले होते पुढे अनेक वर्ष.
त्याही आधी मी पाच वर्षांची असताना आम्ही मुंबईहून गोव्याला विमानाने गेलो होतो. विमानात चॉकलेट गोळ्या सर्व्ह करायला हवाई सुंदरी आली. आईने मला शिस्त म्हणून दटावले एकच घे. मी बावळटासारखे एकच घेतले. पण आईचा जाम राग आला होता. माझ्या शेजारी अजून एक माझ्याएवढाच असावा असा मुलगा बसला होता त्याने त्याच्या मुठीत मावली तेवढी सगळी चॉकलेटस घेतली. मग तर मला अजूनच वंचित वाटू लागले. तोवर ती हवाई सुंदरी निघून गेली होती. परत बोलवायचे कसे, अजून मागायचे कसे, देईल का? एवढेच प्रश्न मनात.. विमानातून उतरेपर्यंत मला फक्त तो चॉकलेट गोळ्यांनी भरलेला वाडगाच दिसत होता. अजूनही मला त्या प्रवासातले तेवढेच दॄश्य लक्षात आहे..
इन्ना...
इन्ना...
जबरी धागा आहे.... हहपुवा.....
जबरी धागा आहे.... हहपुवा..... आज दीड पान वाचले, उद्या बाकि वाचतो.
Emirates air hostess kindly
Emirates air hostess kindly shared her ghasphoos lunch as they ran out of veg stuff.
Indian air hostess was surprisingly rude in my Cleveland to Chicago ride (AA). Aftermath got to know that she wanted me to put my purse on my seat besides me. Kisi aur ka gussa mujh gareeb par nikaalaa! A flight attendant in Delhi to hyd flight had given me almost 4 or 5 water bottles. He woke me up to hand me chilled water bottle!
Can't type in Marathi using phone.
हे आधी कधीतरी लिहिले होते..
हे आधी कधीतरी लिहिले होते.. आमच्या साडूंचा चिरंजीव (वय वर्षे ६).. गाड्या, ट्रक्स असले खेळ सतत खेळायचा . एकदा आई बरोबर दिल्ली मुंबई विमानाने आला. विमान धावपट्टीवर धावायला लागल्याबरोबर...
'आता अॅक्सिडेंट, टक्कर..., फायर ब्रिगेड...' ही नेहमीच्या खेळातली बडबड चालू केली. शेजारचा प्रवासी इतका टरकला की आईला म्हणाला, 'बेह्नजी, आपके बेटे को चूप करवाओ.. मुझे बहोत डर लगता है..."
नागपूर मायबोलीवर फार वेगळ्या
नागपूर मायबोलीवर फार वेगळ्या कारणांकरता प्रसिध्द असलं तरी नागपूरवासियांच्या नागपूरप्रेमाच्या अनेक कारणांपैकी, तिथलं अचरटपण एक महत्त्वाचं कारण आहे. उदाहरणादाखल...
नात्यातली एक मुलगी नागपुरात माहेरपण उरकून घरी निघाली. घरी चेक इन बॅगा भरून कुलपं लावून बंद केल्यामुळे निघताना भरलेल्या ओटीचा नारळ हँडबॅगेत व्यवस्थीत प्याक करून घेतला. नागपूर एअरपोर्टावर सेक्युरिटीचेकमध्ये तो नारळ काही पास होईना. ही तो नारळ फेकू देईना. मिनिटभराच्या वाटाघाटींनंतर सेक्युरिटीवाला म्हणाला, "नारळ फोडून आणला तर नेऊ देईन". नारळ फोडायचा कुठे हा विचार डोक्यात येण्यापूर्वीच तिथल्या माणसानं एका दिशेला बोट दाखवून 'तिथे फोडून घ्या' सांगितलं. फोडलेला नारळ, मिळवलेल्या एका प्लास्टिक बॅगेत बसून सेक्युरिटी चेकमधून सुखरूप बाहेर पडला.
नारळ फोडायला स्पेशल दगड असलेलं नागपूर विमानतळ जगातलं एकमेव ठरायला हरकत नाही.
त्या फ्येमस दगडाचं दर्शन घ्यायचं राहूनच गेलं याचं दु:ख आहे.
इन्ना..
इन्ना..

डासांचा किस्सा जबरी आअहे
डासांचा किस्सा जबरी आअहे

इथला डासांविषयींचा कळवळा बघुन पेटावाल्यांच्या डोळ्यांतुन धबधबे वाहतील
मजेशीर आहेत सगळे किस्से.
मजेशीर आहेत सगळे किस्से.
नारळ फोडायला स्पेशल दगड
नारळ फोडायला स्पेशल दगड असलेलं नागपूर
विमानतळ जगातलं एकमेव ठरायला हरकत
नाही.
>>
:हहपुवा:
नारळ फोडायला स्पेशल दगड
नारळ फोडायला स्पेशल दगड असलेलं नागपूर विमानतळ <<<
अरारा...
भन्नाट धागा. डास, बाळाचा
भन्नाट धागा. डास, बाळाचा बाबा, नारळ, उवा, जपान..... हहपुवा झाली नुसती.
माझ्या एका मैत्रिणीने उद्योग केला होता.. उत्खननाला वापरलेलं जॅकेट तसंच्या तसंच उचलून दार्जिलिंगला घेऊन गेली होती. विमानात बसायच्या आधी चेक-इन करताना पोलिसांना दहा इंची दणदणीत सुरा (एक्स्कव्हेशन नाईफ) खिशात सापडला. अधिकारी वेडे झाले होते इतक्या सोफिस्टिकेटेड बाईच्या खिशात तो सुरा बघून... तिच्या नवर्याने एकदम मी तिला ओळखत नाही असा पवित्रा घेऊन पुढे निघून गेला (असे तिचे म्हणणे)
इकडे असतील नसतील तेवढ्या रॅन्कचे अधिकारी धावत आले. तिने काय झालं ते सांगितल्यावर सगळ्यात वरिष्ठ अधिकार्याने संतापून लाल होऊन विचारलं की. 'आर यू मॅड?' म्हणून... सुरा जमा करून गुपचूप विमानात बसली नी काय!
भन्नाट धागा. डास, बाळाचा
भन्नाट धागा. डास, बाळाचा बाबा, नारळ, नारळ फोडायचा दगड, उवा, जपान..... हहपुवा झाली नुसती. >>+१
आशुतोष०७११ >> बापरे!
उद्याच विमान प्रवास करत्ये. हा धागा आठवत राहिल प्रवासा दरम्यान. Hopefully या धाग्यावर येऊन लिहावं असं काही घडणार नाही.
- आशुतोष०७११ आणि इतर काही अनुभव बघता!
पण इथे परत येऊन लिहीता यावं - अशी प्रार्थना ही करते
डास, बाळाचा बाबा, नारळ, नारळ
डास, बाळाचा बाबा, नारळ, नारळ फोडायचा दगड >> सगळेच
दणदणीत सुरा >>
हा किस्सा प्रवासात नाही तर
हा किस्सा प्रवासात नाही तर प्रवासाच्या आधी घडला आहे.
म्हणतात ना काम ना धाम…) च्या लोकांशी संपर्क झाला होता. त्यापैकी दि-आंद्रे चे कार्ड माझ्या पाकिटात होते. अमेरिकेत कम्युनिस्ट असणे हे जवळजवळ टेररिस्ट असण्य़ाइतकच डेंजर. मग अजून चेकाळणे. आता त्यांनी माझी ब्याग आणि जाकीट स्वाब करून स्फोटकांचे अंश मिळतात का हे तपासायला सुरुवात केली. पुन्हा एकदा - गेल्याच आठवड्यात आम्ही विद्यापीठात हर्बल पेन मेडिकेशन
चा आस्वाद घेतला होता. माझ्या जाकिटावर वीडचे ट्रेसेस मिळाल्यावर अजून चेकाळणी. ते इतके घाबरले की त्यांनी तिथले सिक्युरिटी काउंटर काही वेळाकरिता बंद केले आणि सुमारे १५-२० सिक्युरिटी पर्सोनेल माझ्या भोवती उभे राहून मला प्रश्न विचारू लागले आणि त्यांनी डीटेन्शन सर्व्हिसला बोलावलं. सिक्युरिटी डीटेन्शन सर्व्हिस एके ४७ किंवा तत्सम घेऊन येतात. आणि एका वेळेस ४ जण येतात. मग अशी आमची वरात वरच्या मजल्यावर निघाली. एका मोठ्या खोलीत मला मध्यभागी एका खुर्चीवर बसवलं आणि ४ पोलीस माझ्यावर बंदुका (एके ४७) रोखून त्यांचा बॉस मला प्रश्न विचारू लागला. माझ्या आईवडिलांपासून ते मित्र कोण, प्रोफेसर कते, भारतात काय करत होतास, इथपर्यंत जगातील सर्व प्रश्न त्यांनी मला विचारले. माझ्या ब्याग मधील चड्डीपासुन पुस्तकापर्यंत सर्व सामान तपासलं. सुमारे एक तासभर हा मुलाखतीचा कार्यक्रम चालला. मी जे विमान बुक केलं होतं ते तर त्यांनी मला बोर्ड करूच दिलं नाही. मग एक बंदुकधारी मला घेऊन चेक इन काऊण्टर्पाशी आला ब्याग चेक इन करायला लावली आणि मला माझ्या नवीन विमानापर्यंत सोडून आला. नंतरच्या लोकांना वाटलं मी कोणी व्हीआयपीच आहे.
अमेरिकेत नवीन नवीन होतो. शिकत होतो. जेमतेम ३ महिने झाले होते. आणि ४ दिवस सुटीसाठी बहिणीकडे एल ए ला विमानाने चाललो होतो. अतिशय शहाणपणा करून पासपोर्ट घरीच ठेवला होता. महाराष्ट्र सरकारच ड्रायव्हिंग लायसन्स आणि पॅन कार्ड घेऊन निघालो. सन फ्रांसिस्को - एल ए फ़्लाईट ला काही प्रॉब्लेम आला नाही. एल ए हून निघायच्या वेळी समजलं की विमानतळावर "ऑरेंज अलर्ट" आहे. म्हणजे सर्वांची कसून तपासणी वगैरे. मी ट्रेकिंग करायचो म्हणून बहिणीने मला टेंट भेट दिला. कुठे चेक-इन करायचा म्हणून तसाच सिक्युरिटी मध्ये गेलो (मूर्खपणा). त्या ब्याग मधले खिळे आणि स्टेक्स वगैरे बघून आणि ऑरेंज अलर्टमुळे सिक्युरिटी वाले चेकाळले. आणि गंमत सुरु झाली. त्यानी मग माझं सरकारी आयडी मागितलं. महाराष्ट्र सरकार पाहून अजून चेकाळले. मग त्यानी माझ्या पाकिटाचा ताबा घेतला. मागच्या आठवड्यात विद्यापीठात रिव्होल्युशनरी कम्यूनिस्ट पार्टी ऑफ युएस (सुप्रीम लीडर बॉब अव्हाकीयन आणि दि-आंद्रे टीटर - हे स्वतःच स्वतःला सुप्रीम लीडर वगैरे म्हणून घेतात
बापरे निकित!!
बापरे निकित!!
बापरे..
बापरे..
भारी किस्सा आहे निकित !
भारी किस्सा आहे निकित !
भारी किस्सा आहे.
भारी किस्सा आहे.
निकित मस्त किस्सा. एवढे होउन
निकित मस्त किस्सा. एवढे होउन तुला विमानात बसू दिले हे विशेष !
भारतात अमेरिकन ड्रायव्हिंग लायसन्स आणि स्टेट आयडी दाखवल्या वर मला विमानतळाच्या बाहेरच्या पोलिसाने आत सोडायलाही सपशेल नकार दिला होता. पासपोर्ट व्हिसा स्टॅम्पिंग साठी दिला आहे हे सांगूनही काहीही उपयोग झाला नाही. अमेरिकेत राहल्यावर इथे येऊन जास्त शहानपणा करता वगैरे ऐकवुन झाले. शेवटी एक जुना पुराणा महाराष्ट् दुचाकी लायसन्स पर्स मध्ये सापडला म्हणून काम झाले.
धमाल ते बाप रे सगळ्या
धमाल ते बाप रे सगळ्या रेंजच्या गमती आहेत इथे!
निकीत, वाचताना बाप रे झालं! तुमचा पासपोर्ट नव्हता तेच बरंच झालं! एकदा tag झाला की दरवेळी सिक्युरिटीला त्रास!
गमतीशीर अनुभव फार नाहीत पण भारतातून पहिल्यांदा अमेरिकेत येताना एक किस्सा घडला. मला निघण्याच्या दिवशी सकाळी अचानक वाटायला लागलं की आपल्या bags lock शिवाय चेकइन करणं dangerous आहे! माझ्या आसपास TSA locks मिळणे शक्य नव्हते. सुदैवाने UT Austin ला शिकायला येणाऱ्या आम्ही चौघी एकाच विमानाने येणार होतो. म्हणून त्यातल्या एका मैत्रिणीला फोन करून आणायला सांगितली दोन कुलुपं.
संध्याकाळी एअरपोर्टवर जायला निघालो तर मुसळधार पाऊस! घरी थोडसं रडून झालं होतं (खरं तर खूप वाईट वाटत नव्हतं, कारण excitement च जास्ती होती) पण तरी विमानतळावर बाय करताना पुन्हा चेहरे पडले होते आम्हा चौघींचे! आत गेलो, bags check in केल्या boarding passes घेतले आणि मग जरा एका ठिकाणी बसलो. तेवढ्यात माझ्या मैत्रिणीने अत्यंत तत्परतेने माझ्या हातात दोन TSA locks असलेले पाकीट ठेवले. मी दोन क्षण त्या पाकिटाकडे बघितलं आणि नंतर आम्हा दोघींना एकदमच साक्षात्कार झाला! आणि आम्ही वेड्यासारख्या हसत सुटलो! कारण इतका आटापिटा करून आणलेली कुलुपं न लागताच माझ्या दोन्ही बॅग्ज अमेरिकेला रवाना झाल्या होत्या! बाकीच्या दोघींना कळल्यावर आम्ही सगळ्यांनी मनसोक्त हसून घेतलं! It was a much needed total stress buster for all of us!!
Pages