येडोबाच्या नावानं.........चांगभलं

Submitted by बाजीराव-अवी on 30 April, 2015 - 01:37

जवळपास सहा वर्षानंतर माझ्या आजोळी यात्रेला जाण्याचा योग आला. मा़झे आजोळ येराड ता. पाटण जि. सातारा हे श्री. येडोबा देवामुळे तिर्थक्षेत्र म्हणुन प्रसिध्द आहे. श्री.जोतिबा प्रमाणेच श्री. येडोबादेवाचे भक्तही संपुर्ण महाराष्ट्रात आहेत. दरवर्षी यात्रेला अलोट गर्दी असते. हनुमान जयंती म्हणजे पोर्णिमेपासुन यात्रा सुरु होते. पाच दिवस चालणार्‍या यात्रेत दोन दिवस सभिण्यांचे असतात. पहिल्या दिवसी धाकटा आणी दुसर्‍या दिवसी मोठा सभिणा, तिसरा दिवस देवाला पुरण पोळी वाहण्याचा तर बा़की दोन दिवस मोठा बाजार भरतो आणी पाचव्या दिवशी यात्रेची सांगता होते.
यात सगळ्यांत महत्वाचे म्हणजे दोन्ही सभिणे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातुन आलेल्या सासणकाठ्या पाहण्यासाठी भक्तांची गर्दी जमते आणी येडोबाच्या नावानं चांगभलंच्या जयगोषानं आणी गुलालाच्या ऊधळणीत परिसर न्हाऊन जातो.
shree Yedoba.jpg
मुख्य मंदिर
Mandir_0.jpgIMG_20150406_103519_0.jpgDeep Maal_0.jpg
मुख्य सासणकाठी
IMG_20150406_103852.jpg
सभिणा सुरु
IMG_20150406_125940.jpgIMG_20150406_110911.jpgIMG_20150406_130536.jpgIMG_20150406_131227_1.jpg
प्रतिक्षा मुख्य सासणकाठीची
IMG_20150406_132207_1.jpg

प्रतिक्षा संपली
IMG_20150406_131452_1.jpgIMG_20150406_130512.jpgIMG_20150406_130945.jpgPicsArt_1430364974686.jpg
कळसाच्या भेटीला
IMG_20150406_131227_1_0.jpgPicsArt_1430364974686_0.jpgPicsArt_1430364839526_0.jpgIMG_20150406_130542_1_0.jpgShree Yedobad.jpgPicsArt_1430364936396.jpgIMG_20150407_142840_0.jpg
दोन दिवसानी सासुरवाडीची यात्रा असल्याने जाणे झाले. तेथील पालखीही येडोबाच्या यात्रेत येथे. मग यात्रेच्या आदल्या रात्री परत गावात आणुन ग्रामदेवत मोलोबाच्या देवळापर्यंत वाजत गाजत नेली जाते.
IMG_20150407_184824.jpgIMG_20150407_184902.jpgIMG_20150407_185203_1.jpgIMG_20150407_185655.jpg
जाता जाता
गुणवंतगड (किल्लेमोरगिरी ता.पाटण) माझ्या घराजवळुन
पुढच्या भेटीत याच्याविषयी
IMG_20150411_165457.jpgCollage_0.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो मोबाइलने काढलेत काय?

चांगली आहे जत्रा.
बगाड असतं का?
सातार्‍यात काहि ठिकाणी असत बगाड.

मी पहिल्यांदाच लिहण्याचा प्रयत्न केला आहे. गुलालामुळे कॅमेरा नाही वापरता आला सगळे फोटो मोबाईलने काढलेत.
काही चुका असल्यास सांगाव्यात

नाही या यात्रेत बगाड नसते. गुलाल खोबर्‍याची ऊधळ आणी सभिण्यात नाचण्याची मजा यांमुळे कॅमेरा नाही वापरला

ते छबिना असेल..
छबिना.. म्हणजे देवाची पालखीतुन मिरवणुक काढतात, सासनकाठ्या नाचवतात, गुलाल-खोबर उधळतात.

लहानपण पाटण ला गेले .तेंव्हा येराड ची यात्रा बघितली आहे..खुद्द पाटण ला ही केरा नदीच्या काठी मोठी यात्रा भरायची.मस्त मज़्ज़ा.
झकासराव,
बगाड़ हां प्रकार वाई जवळ बावधन म्हणून जे गाव आहे तिथे असतो..पण भयानक प्रकार असतो तो.चाळीस पन्नास फूट उंचीवर टांगलेला माणूस अधून मधून दोन्ही हात तोंडावर घेऊन शंखध्वनी करत असतो ते पहावत नाही.दूसरी तीसरी मध्ये वाईला राहायला असताना पाह्यला होता तो प्रकार..

फोटो छान आहेत.

अप्रैल मध्ये गावाहून येताना सातार्याच्या आसपास रस्त्यावर बर्याच ठिकाणी गुलाबी रंगात रंगलेले लोक पाहिले. अजुनही होळी चालु आहे का असे वाटलेले. वरच्या फोतोतला गुलाबी रंग पाहून कोड़े उलगडले.

ते छबिना असेल.. हो छबिनाच पण सभिणा हा आमच्या इकडील परंपरागत शब्द आहे म्हणुन लिहला.
येडोबा . हा कुठला देव ? काय कथा आहे ? .................मलाही खुप माहित नाही माहिती घेऊन सविस्तर लिहतो

माहिती घेऊन सविस्तर लिहतो>>
कृपया लिहा . मध्ययुगीन काळामध्ये दगडाला शेंदून फासून ग्रामीण , असंकृत आणि अशिक्षित समाजाने अनेक काल्पनिक देव निर्माण केले आहेत . उदा . खंडोबा (मल्हारी ), म्हसोबा ,येडोबा ,हा बाबा आणि तो बाबा. तसाच ठमाई, खामाई ,येणाई , जानाई हि आई आणि ती आई. आणि त्यांच्या उपासनेचे अर्थहीन प्रकार सुधा . उदा . भंडारा , गुलाल उधळणे , तळी भरणे , काठ्या नाचवणे , बगाड इत्यादि .

ग्रामीण , असंकृत समाज ..............?
सारिका तुम्हाला ग्रामीण अशिक्षीत म्हणायचे आहे का ? आणी देवांबद्द्ल म्हणाल तर हा ज्याच्या त्याच्या श्रध्देचा प्रश्न आहे.

ज्याच्या त्याच्या श्रध्देचा प्रश्न आहे. >>> Proud
आणि अंधश्रद्धेचा हि . श्रद्धेच्या नावावर अस्तित्वातच नसलेल्या खोट्या देवांची उपासना करण्याचं output काय असणार आहे ? वेळेचा आणि श्रमाचा अपव्यय .

अहो सारिका३३३, सदर पोस्ट "प्रकाशचित्रण" ह्या category तील आहे. photos वर comments द्या ..
श्रद्धा / अंधश्रद्धा ह्याच्यासाठी बर्याच इतर पोस्ट आहेत की ..

श्रद्धा / अंधश्रद्धा ह्याच्यासाठी बर्याच इतर पोस्ट आहेत की ..>>>
हो . पण त्याच्यात येडोबाचा उल्लेख नाही ना Proud

हो . पण त्याच्यात येडोबाचा उल्लेख नाही ना फिदीफिदी >>>
"श्रद्धेच्या नावावर अस्तित्वातच नसलेल्या खोट्या देवांची" माहिती जाणून घेण्यासाठी आपण फारच उत्सुक आहात असं दिसतंय .. Proud
By the way, "खरे देव आणि खोटे देव" हे कसलं categorization? सविस्तर सांगाल काय??

फारच उत्सुक आहात असं दिसतंय .>>>
मी उत्सुक नाहीये .मला माहित आहे हे देव नाहीचेत तर त्यांच्याबद्दल सांगणार काय डोंबलं ?. इतरांचे डोळे जरा उघडावेत. लोकांनी चुकीच्या मार्गाने जावू नये म्हणून मी आपलं विचारलं तर बघा . उत्तर आलं कि नाही "...............मलाही खुप माहित नाही माहिती घेऊन सविस्तर लिहतो" म्हणून .
मी काही चुकीचं बोलत असेल तर सांगा ह्या देवांना काही शास्त्रीय आधार आहे का ? कुठल्याही धर्म ग्रंथात ह्यांचा उल्लेख आहे का ? ह्यांच्या उपासनेने कोणालाही हे देव असल्याची प्रचीती आली आहे का ? खर्या देवांची (हरी - हर ,गणपती , दत्त , दुर्गा वगेरे वगेरे )उपासना केल्याने निदान काही फायदा तरी होईल . ह्यां काल्पनिक देवांच्या मागे वेळ घालवून काय मिळणार ? मी केवळ विरोधासाठी विरोध करत नाहीये . मी स्वतः देव - धर्माची कट्टर समर्थक आहे . पण जे चूक आहे ते आहे .

"मला माहित आहे हे देव नाहीचेत तर त्यांच्याबद्दल सांगणार काय डोंबलं" >>
कोणी कोणाला देव मानायचं आणि कोणाला नाही, हे तुम्ही कोण ठरवणार?
आधी सांगितल्याप्रमाणे, हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे ..

"इतरांचे डोळे जरा उघडावेत. लोकांनी चुकीच्या मार्गाने जावू नये" >>
इतकीच जर समाजसेवा करायची इच्छा असेल तर, त्यासाठी हा "platform" नाहिये आणि त्यासाठी ही "post" ही नाहीये.

"ह्यां काल्पनिक देवांच्या मागे वेळ घालवून काय मिळणार" >>
अहो, मुळात देव हीच concept काल्पनिक आहे,

"ह्यां काल्पनिक देवांच्या मागे वेळ घालवून काय मिळणार" >>
हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. गणेशोत्सवात चार लोकं एकत्र येउन तो ज्या प्रकारे साजरा करतात, त्याला तुम्ही वेळ घालवण म्हणणार नाही काय?

"र्या देवांची (हरी - हर ,गणपती , दत्त , दुर्गा वगेरे वगेरे )उपासना केल्याने निदान काही फायदा तरी होईल" >>
माझ्या मते उपासना वगैरे स्वतःच्या समाधानासाठी करतात. इछित गोष्ट साध्य झाली म्हणजे देव पावला म्हणायचं ..

मला इतकंच म्हणायचं आहे की, तुमचे "बरोबर" विचार मांडण्यासाठी ही पोस्ट नाहीये..

ओ बाई मी विचारलेल्या प्रश्नाचं आधी उत्तर द्या कि . नसेल माहित तर नाही म्हणा . फुकटची irrelative बडबड कशाला करताय ? धागाकार्त्याने निदान त्याला माहित नाही असं स्पष्ट तरी सांगितलं

इतकीच जर समाजसेवा करायची इच्छा असेल तर, त्यासाठी हा "platform" नाहिये आणि त्यासाठी ही "post" ही नाहीये.>>>
मी समाजसेवा केली तर तुम्हाला मिरच्या झोम्बयचं काय कारण आहे ? स्वताही करायची नाही . दुसर्यालाही करू द्यायची नाही . ह्या काल्पनिक देवांना मोठे करणारे तुमच्यासारखेच चाप्टर लोक आहेत .
माझ्या बोलण्याला आधार आहे . आणि पुरावाही आहे . तुमच्या बोलण्याला काय आधार आहे ते सांगा

हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे >>>
देव हीच concept काल्पनिक आहे>>>
स्वतःच्या बोलण्यातला विरोधाभास तपासून बघा आधी

हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. गणेशोत्सवात चार लोकं एकत्र येउन तो ज्या प्रकारे साजरा करतात, त्याला तुम्ही वेळ घालवण म्हणणार नाही काय?>>>
ऑफ corse म्हणणार . सार्वजनिक गणेशोत्सवाचा आणि अध्यात्माचा- धर्माचा काय संबंध ? गणेशाची उपासना वेगळी आणि सार्वजनिक गणेशोत्सव वेगळा .

माझ्या मते उपासना वगैरे स्वतःच्या समाधानासाठी करतात. इछित गोष्ट साध्य झाली म्हणजे देव पावला म्हणायचं ..>>>
मग तुमचे हे येडोबा , खंडोबा , बिरोबा असले देव पावतात का ?

ओ सारिका३३३, फुकटची irrelevant (irrelative नव्हे!!) बडबड तुम्ही करताय .. ते पण"प्रकाशचित्रण" ह्या category मधल्या पोस्ट वर फालतुच्या comments करुन आणि वर समाजसेवा करण्याचा खोटा आव आणून.. (आणि बहुतेक फुकटचं internet वापरुन.. नाही, शनिवार- रविवारी काहीच comment दिली नाहीत हो.. )

ओ बाई मी विचारलेल्या प्रश्नाचं आधी उत्तर द्या कि>>
कसला प्रश्न? तुम्ही मला काही विचारलंत का??

माझ्या बोलण्याला आधार आहे . आणि पुरावाही आहे >>
ऑफ course (corse नव्हे!!!) असतील.. तुमचा आधार आणि तुमचा पुरावा तुम्ही तुमच्यापाशीच ठेवा आणि योग्य त्या धाग्यावर प्रदर्शित करा!!!

मग तुमचे हे येडोबा , खंडोबा , बिरोबा असले देव पावतात का ?>>
परत, हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे!!! ह्याचा अर्थ असा नाही कि, तुम्ही दुसऱ्यांच्या श्रद्धेची खिल्ली उडवावी ..

सारीका३३३ तुमची अंधश्रद्धा आणी श्रद्धा यांबद्दलची संकल्पना नक्की काय आहे?
कारण निव्वळ भक्ती म्हणजे अंधश्रद्धा नव्हे. आणी राहता राहिला मला या देवांबद्दल किती माहीत आहे याचा,
तुम्हाला जेव्हढी हरिहर गणपती विष्णु यांबद्दल माहित आहे तेवढीच या देवांबद्दल आमच्या वाडवडिलांनी सांगितल्याप्रमाणे मला माहित आहे

तुम्ही शहरातील लोक खुशाल आम्हाला असंस्कृत म्हणा पण संस्कृती नक्की कोठे जपली जाते हे पहा.
यात्रा म्हणजे वर्षभर शेतात राबणार्या शेतकर्‍याला निदान एकदा तरी नातेवाईकांना भेटण्याचा उत्सव
यात्रेदिवशी घरच्या लेकी सुनांना आणी चुली वरच्या डाळी भाताच्या आदणांना क्षणभर ऊसंत नसते. तर शहरी संस्कृतीत पाहुणे एक दिवस राहीले तरी सण होत नाहीत.
माझ्या मते उपासना वगैरे स्वतःच्या समाधानासाठी करतात. इछित गोष्ट साध्य झाली म्हणजे देव पावला म्हणायचं ..>==+++१ (आणी यालाच श्रद्धा म्हणतात)

मग तुमचे हे येडोबा , खंडोबा , बिरोबा असले देव पावतात का ?>>
परत, हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे!!! ह्याचा अर्थ असा नाही कि, तुम्ही दुसऱ्यांच्या श्रद्धेची खिल्ली उडवावी ..
.................+१

मी समाजसेवा केली तर तुम्हाला मिरच्या झोम्बयचं काय कारण आहे ?
यात समाजसेवा कोठे आहे? तुम्ही विषय सोडुन अवास्तव टीका करताय आणी त्यांनी फक्त ही गोष्ट तुमच्या
लक्षात आणुन दिली एवढच.

तुम्ही मांडलेला मुद्दा आम्हालाही पटतो. पण टीकाही ठराविक पातळीवर योग्य असते. आणी ती मुद्देसुद असावी लागते. एकीकडे देवांवर तुम्ही टीका करताय आणी अमुक देव पावतो तमुक पावत नाही हे तुम्हीच म्हणताय.
गुलाल उधळणे , तळी भरणे , काठ्या नाचवणे , बगाड यात कोणती अंधश्रद्धा आहे हे स्पष्ट करा.
उगात हाताखाली कि-बोर्ड आहे म्हणुन काहीही टीपु नका.

सोनपालवी तुमचे आभार (सारिकांजीवर टीका बद्दल नाही तर मुद्दा पटवुन सांगितल्या बद्दल)

येडोबाच्या नावानं.........चांगभलं मस्त प्रचि आहेत. Happy
तो दुसर फोटो मोठा करुन टाक जरा,