श्वास मोकळे झाले

Submitted by धनुर्धर on 29 April, 2015 - 05:15

डोळ्यातील ढगांचे श्वास मोकळे झाले
साचलेल्या मनाचे आकाश मोकळे झाले

निघून गेला होता कुडी मधून जीव
जिंदा असण्याचे भास मोकळे झाले

गुलामीलाच आमुची वाटून गेली लाज
तुझ्या चरणांचे दास मोकळे झाले

पोटामधील आगीत जळून गेली भूक
कंठात अडकलेले घास मोकळे झाले

सांगू कशास आता कुणाशीही मी नाते
पायातील बेड्यांचे फास मोकळे झाले

विझवून टाकले होते देव्हार्यातले दिवे मी
देव दिसण्याचे आभास मोकळे झाले

. . . . . . . . धनंजय . . . . . . .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खयाल छानच आहेत कविता आवडली.
बेफिजीनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक ओळीचे वजन पहा. ओळ वृत्तात आहे कि नाही ते पहा. अधिक माहिती साठी बेफिजीनी गझल संदर्भात लिहिलेला लेख शोधा तो तुम्हाला मार्गदर्शक ठरेल.
पुढील लिखाणास शुभेछ्या!