मासे (४९) चोर बोंबिल/सोयरे बोंबिल

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 28 April, 2015 - 06:37
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चोर बोंबिल किंवा सोयरे बोंबिल
हिंग पाव चमचा
१ चमचा हळद
२ चमचे मसाला किंवा १ चमचा मिरची पूड
गरजे नुसार मिठ
तळण्यासाठी तेल
आल-लसुण,मिरची-कोथिंबीर पेस्ट (हे ऑप्शनल आहे)

क्रमवार पाककृती: 

चोर बोंबिल किंवा सोयरे बोंबिल ची खवले काढून घ्यावीत. शेपुट, पर काढून टाकावेत. मासा आतून पुर्ण साफ करून त्याचे साधारण तिन तुकडे करावेत. आता ह्या तुकड्या तिन वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घ्याव्यात.
धुतलेल्या तुकड्यांना (जर आवडत असेल तर आल-लसुण वाटण लावावे) हिंग, हळद, मसाला, मिठ चोळून घ्यावे.

तवा गरम झाला की त्यावर तेल सोडून ह्या तुकड्या तळण्याठी ठेवाव्यात. गॅस मिडीयम ठेवावा.
५-६ मिनिटांनी तुकड्या पलटून दुसर्‍या बाजुन ५-६ मिनिटे शिजू द्यावे.

खरपूस गरमागरम तुकड्या जेवणासाठी वाढाव्या.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी २ तुकड्या
अधिक टिपा: 

चोर बोंबिल किंवा सोयरे बोंबिल हे दिसायला साधारण खरबी सारखे असतात.
बोंबील मध्ये जसे केसा सारखे बारीक काटे असतात तसे ह्यात मध्ये मध्ये कडक काटे असतात. म्हणजे करली सारखे पण तोकडे.
खाण्यासाठी हा मासा मांसल व चविष्ट आहे.
हा जास्त महाग नसुन मध्यम किंमतीतच मिळतो.

माहितीचा स्रोत: 
मासळी बाजार
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोरपंखीस,
चुकुन तोंडात काटा लागलाच तर जबड्याचा पुर्ण जोर लावून त्याला चावून टाकायचा.. काही नाही होतं..
बत्तीस वेळा घास चावणे मासे खाण्यावरुन निघालं असावं.. Lol

मोरपंखीस फक्त करली-काटी, पाला दाताळ, आणि हे बोंबील ह्यात काटे जास्त असतात जे व्यवस्थित सावकाश काढले तर घशात नाही जात. माझ्या मते हे काटे इतकेही हानीकारक नसतात की पोटात गेल्यावर काही त्रास होईल.

आणि हे वरचे सोयरे बोंबील आहेत जे साधारण बोईट सारखे दिसतात. पण जे मऊ केसांचे बोंबील तुम्ही म्हणता ते बॉम्बे डक. ते वेगळे.
ते नुसते 'बोंबिल'वर लिहीलय मी.

त्या बोंबिलमध्ये केसासारखे काटे असतात जे अगदी मऊ असतात त्याने काहीच हानी होत नाही. ते अडकतही नाहीत घशात. आणि मध्ये एक काट्याची दांडी असते तीही काहीजण खातात. पण ती बाजूला काढतात.
लहान बोंबील मध्ये एवढे केसाळ काटे नसतात शक्यतो बोंबील लहान घ्यायचे म्हणजे ह्या केसाळ काट्यांचा प्रश्न येत नाही आणि ते चांगलेही लागतात.

Pages