आठवनिंच्या गर्दित

Submitted by मिलिंद खर्चे on 27 April, 2015 - 09:34

तिला प्राजक्त खुप आवडतो. अजुन रात्र रात्र जागुन तो ही प्राजक्त उमलन्याची वाट बघतो. प्राजक्ताच्या उमलनारया मुक्या कळ्याना आपल्या मुक्या भावनांशी जोळु लागतो. हळु-हळु मंद गतीने वाढणारा गारवा, त्यात अलगद उमलनारी प्राजक्त कळी त्याला वेळावुन सोडते. ती उमलन्याच्या उंबरठ्यावर असणारी प्राजक्त कळी आणि सौम्यतेने बहरलेली त्याची प्रीती यात त्याला साम्यता जाणवते. आठवनिंच्या गर्दित हरवून पुन्हा तो ते क्षण जगु लागतो.
फुललेला प्राजक्त व् त्या वरील मोत्या प्रमाने भासनारे दव बिंदुना न्याहळु लागतो. त्यात त्याला न-जाने कसले अनामिक सुख लाभते. हर्षित होउन तो प्राजक्तच्या चैतन्य निर्माण करनारया गंधाला मानत साठवुन घेतो. कसली अवचित कल्पना त्याच्या मनाला वेडाउन जाते कुना ठाउक?
कधी तरी कोरया राहिलेल्या त्याच्या मनाच्या पाटीवर तो काहि विलक्षण रेघाटू लागतो. बघता बघता त्या रेघोटयांचे शब्द होवून मनाच्या कागदावर उमटले जातात. क्षणात कसली भावना शुन्य मरगळ त्याच्या लोचनात जानवुन ते चिंब-चिंब होतात. पाकळी वरील दव-थेंबाच्या सोबतीला त्याचे नीर ओघळु लागतात. त्या उन्मत करणाऱ्या रम्य सकाळी त्याचे भाव पुष्प बदलून, त्याला विरहाच्या सागरात बुळउन जातात.
तांबळ पिकलेली सकाळ, हवेतील मंद गारवा, सोबतीला प्राजक्त सुगंध, चिव-चिव नारी किलबिलनारी चिमनी पाखर, मंदिरातील घंटेचा तो सुमधुर नांद, अवकाशातील अस्तित्वासाठी झटनारे तारे, नवचैतन्याने गार-गार हिरवी झालेली सृष्टि आणि उमललेली प्राजक्त कळि. या अश्या उल्हास दायक वातावरणात, दव थेंबांनप्रमाने त्याच्या भावनांची झालेली हेळसांड , ह्रुदयात कोरल्यागत म्हणते,,
"तू आयुष्यात
प्राजक्तच्या दव थेंबांनप्रमाने आलीस,
सकाळच्या कोमल रवी किरणांन सोबत प्राजक्तला फुलवून,
दव थेंबांनप्रमाने स्वत: हरवुन गेलीस.

....मिलिंद

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users