दुरावा

Submitted by मिलिंद खर्चे on 27 April, 2015 - 09:23

तू सोबतीस होता पण भेटला कधी ना
मांडून डाव गेला जो परतला कधी ना
झाला असा मुका की भासे खुजी अबोली
फसवाच हा अबोला तू सोडला कधी ना
संगीत जीवनाचे कोठे कसे विरजले
जो छेडला तराना तू ऐकला कधी ना
लावून प्रीत ज्योती गेलास दूर देशी
सोसू कसा दुरावा जो मानला कधी ना
खोटेच ही ठरावे का वचन तू दिलेले ?
जे शब्द वेचले ते तू पाळले कधी ना
आता सुरात जळते रोजच चिता मनाची
जखमात शोधते मी जो भेटला कधी ना
केली कठोर शिक्षा माझ्याच आठवांनी
केला असा गुन्हा मी जो उमजला कधी ना
....मिलिंद

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गझलेतील भाषा आवडली.

दोन दोन ओळी सुट्ट्या लिहिण्याचा एक प्रघात आहे, म्हणजे 'शेर' स्वरुपात लिहिण्याचा! हे आपले सहज सुचवले.

खयाल तसे पूर्वी आल्यासारखे वाटले.

चु भु द्या घ्या