अकादमी 9 :- अंतिम पग

Submitted by सोन्याबापू on 26 April, 2015 - 04:21

ऑब्स्टकल एंड रुट मार्च झाल्यावर एक दिवस आमची रिटन टेस्ट झाली, मुल्की कायदे, सीमावर्ती राज्यांची संस्कृती, अर्थकारण इत्यादी विषयांचे पेपर्स झाले, नाही म्हणले तरी ती एक परीक्षाच होती, आजवर शिकवलेले सारे विषय फारच नवीन वाटत होते कारण जास्ती करून आम्ही ह्या सब्जेक्ट लेक्चर मधे डोळे उघडे ठेऊन झोप काढायचो. तेव्हा मदतीला आले ते आमच्या मित्रांचे पदवी ज्ञान अन लोकेशन, पुनीत आम्हाला अर्थशास्त्र शिकवे, गौड़ा कायदा, गुरुंग अन सांगे उत्तर भारतीय सीमावर्ती क्षेत्रांची माहिती देत असत अन माझ्या सारखे गुड फॉर नथिंग "बीएससी" आइटम ती भक्तिभावे टीपुन घेत असु, अश्याच प्रकारे फायरिंग टेस्ट ही पार पडली, अन शेवटी उगावला तो रिजल्ट चा दिवस. मी केलेल्या तूफ़ान मकऱ्यांमुळे मला काही रँक वगैरे यायची अपेक्षा नव्हती , त्यामुळे रॅट रेसिंग न करता आम्ही फ़क्त टेस्ट्स देत होतो. आमच्या पुर्ण बॅच मधे घासु असे ठरवून कोणीच नव्हते ! अन्ना सारखे जे बुद्धिजीवी होते त्यांना ही ट्रेनिंग ने कम्पलीट बदलून टाकले होते. रिजल्ट आमचा अनपेक्षित होता इंडिविजुअल टेस्ट्स मधे मी पाचवा होतो अन गृप टेस्ट ला आमची कंपनी सेकंड होती. थोडक्यात आम्ही सगळे कमीअधिक अंतराने पास झालो होतो. 35 च्या बॅच मधे मी 5 वा होतो. टॉपर पुनीत , सेकंड मोसाय, थर्ड गिल, फोर्थ समीर, अन्ना अन सांगे 8 वर टाई कीश्या 7 अन गौड़ा 9 . टॉप 10 ला नऊ आम्हीच होतो, रिजल्ट नोटिस बोर्ड वर डिक्लेअर झाला अन सोबत आम्हाला पोस्ट लंच फॉल इन ची ऑर्डर ही आली. मस्त लंच झाल्यावर आम्ही फॉल इन झालो अन ऑडिटोरियम ला पोचलो तेव्हा विक्रम सर तिथे आले. आपल्या छोट्याश्या एड्रेस मधे त्यांनी आम्हाला सर्वांना शुभेच्छा दिल्या अन पुढे म्हणाले

"बॉयज अब तयारी शुरू होगी पास आउट परेड की, पास आउट परेड मतलब जो कुछ तुमने सीखा है उसे तुम्हारे माता पिता के समक्ष पेश करना, बोहोत ख़ास दिन होता है ये जब मातापिता दोनों दो साइड खड़े हो कर के आपके कंधे पर स्टार सजायेंगे, तुम सिविल लाइफ में अपने अंतिम पग लोगे और जिंदगी सेवा में झोक दोगे, जनरली जो टॉपर्स होते है वो परेड कमांडर और डेप्युटी परेड कमांडर होते है, पर एक और काम है , एक प्रेजेंटेशन होगा, इस दीक्षांत समारोह में एक मॉक ड्रिल भी होगा, एक एम्बुश दिखाया जायेगा जिसके एन्ड में तिरंगी फ्लेयर फायर किये जायेंगे, परेड खुबसूरत बनाने के लिये इसकी खुब जरूरत है पर उसमे मेहनत भी डबल है. अब जैसे ट्रेडिशन है परेड कमांडर होगा पुनीत शुक्ला और डेप्युटी परेड कमांडर होगा सुदीप्तो सेन उर्फ़ अपना मोसाय, अब मैं आपको पाच मिनट देता हूँ, आप अपने में से बेहतरीन 6 लडाखे चुनो जो एम्बुश प्रेजेंटेशन देंगे"

मी शांत बसुन कोण भारी एम्बुश करेल हा विचार करतच होतो तोवर माझा पलीकडे बसलेला पुनीत अन समोर बसलेला मोसाय ताड़कन उभे राहिले,

"सर, हमको जिसने दोस्त बनाया सबके साथ दोस्ती से रहा , सबको हँसाता रहा , सर एम्बुश पार्टी लीड करेगा अपना रगड़ोत्तम भारती बापुसहेब" पुनीत

"सर हाम बी वही सोचताय" मोसाय

मी उगीच अवघडून बसलो , मला टेंशन आले होते! आईबाबां समोर प्रेजेंटेशन द्यायचे!!

"किसीको कोई आपत्ती?"

आपापल्या कंपनीज सोबत काही सेकंड मधे डिस्कशन करुन गुरुंग , मोसाय, गिल, गौड़ा , सांगे एकसुरात म्हणाले

"नो सर कोई आपत्ती नहीं है" अन जगमित्र नाम्या बापूसाहेब "प्रेजेंटेशन पार्टी" चा लीडर झाला पुढे सर्वमताने पार्टी डीसाइड झाली ती म्हणजे

1 मी
2 समीर
3 गुरुंग
4 अन्ना
5 किश्या
6 गिरीश यादव

आमच्या पैकी गुरंग सोडुन कोणीच कंपनी कमांडर नव्हते सो आम्हाला एम्बुश करताना पुढल्या परेड ला लीड करायचे टेंशन नव्हते.

आता आमचे डेली रूटीन बदलले, रोज पहाटे उठणे, रनिंग करून झाले की पहाटे 6 ते 0830 ड्रिल प्रैक्टिस, ती झाली की ब्रेकफास्ट, त्या नंतर लंच पर्यंत इतर लोकांस वेपन साफ़ सफाई ला कोत ला बसवत अन आम्ही एम्बुश ची प्रैक्टिस करत असु, चीफ गेस्ट म्हणुन आमचे डायरेक्टर जनरल येणार होते, ते कुठे बसतील, विजिटर गैलरी कुठली असेल , आम्ही कुठे कसे एंटर करू, पुनीत अन मोसाय कुठे उभे असतील इत्यादी आम्ही पहिले समजून घेतले, ते घेतल्यावर मग आमची करवाई काय असेल ते समजवले गेले, जनरल रूपरेषा काहीशी अशी होती

प्रथम आम्ही पासआउट चा सेरेमोनियल ड्रेस घालून "निरिक्षण" ला उभे राहणार, ओपन जिप्सी मधुन डीजी इंस्पेक्शन झाले की आम्ही एम्बुश वाले , गेस्ट स्थानापन्न होईस्तोवर पासआउट परेड च्या मागे असलेल्या तटबंदी टाइप बंधकामाच्या मागे जाणार तिकडे मोजुन 8 मिनट होते हाती, तेवढ्यात camouflage चढवून तयार राहणार, तोवर अद्जुडेँट साहेब वेलकम एड्रेस देणार, तो झाला की आमचे नाव पुकारले जाणार, मग आम्ही ठरवल्या प्रमाणे प्रेजेंटेशन देणार, ते होऊन आम्ही परत चेंज ला गेलो की डेप्युटी अद्जुडेँट साहेब "कोर्स रिव्यु" देणार (परत 8 मिनट) आता आम्ही परत चेंज करून आमच्या कंपनी मधे फॉलइन होणार, ते झाले की आम्ही विश्राम होणार, मग चीफ गेस्ट चा एड्रेस, स्टार्स अन स्पोर्ट्स अकडेमिक्स वगैरे ची अवॉर्ड्स डिस्ट्रीब्यूशन चा कार्यक्रम, तो झाला की मंचा समोरून सलामी देत परेड अन तो संपला की "अंतिम पग" टाइल क्रॉस करणे, ते क्रॉस झाले की 5 मिनट मधे आमचे पालक आमच्या खांद्यांवर स्टार्स ची पट्टी जोडणार, ते झाले की त्याच्याच बाजूला असलेल्या amphitheater ला आम्ही हाइट नुसार उभे राहणार मग एकसुरात भारताचे संविधान अन महामहिम राष्ट्रपती महोदय ह्यांना एकनिष्ठ रहायची शपथ ,अन मग आयुष्यात पहिल्यांदा घातलेली पीक्ड कॅप टॉस करायचा सेरेमनी, मग आम्ही मोकळे. असा एकंदरित कार्यक्रम होता.

ह्याच रूटीन ची भयानक परफेक्शन ने प्रैक्टिस आम्ही करत असु. पहिल्या दिवशी टाइमिंग जरा गड़बड़ झाले (27 सेकंड लेट) तर आम्ही सारे एम्बुश पार्टी वाले रगड्याचे धनी झालो, नंतर एक दिवस ऑर्डर द्यायला मोसाय चुकला तर त्याला अन उर्वरित ट्रूप ला रगड़ा!. असे एकंदरित चालले होते, एखाद्याला अवॉर्ड मिळाल्यास त्याने फॉलआउट कसे व्हायचे , गेस्ट ला ग्रीट कसे करायचे हाती दिलेले स्टार्स/अवार्ड नजर न हलवता शेजारी उभे असलेल्या बड़े उस्तादजी च्या हाती कसे द्यायचे, ह्याची प्रैक्टिस ही होत असे,

पहिल्या दिवशी तर मला विजिटर गैलरी मधे आई बाबा दिसायला लागले होते, अन मी विचलित होऊन चुकलो होतो, तेव्हा बड़े उस्ताद समजावत म्हणाले

"बेटा पैदा करनेवाली है वो, उसके सामने ऐसे कमजोर होंगे तो हमलोग को बड़ा करनेवाली के लिए ड्यूटी कैसे करेंगे? ध्यान लगा बापूसाहेब, गलती नहीं होनी चाहिए"

डोक्यात त्या वाक्यांनी लख्ख प्रकाश पडला होता अन प्रवास सुरु झाला तो परफेक्शन च्या दिशेने,आमच्या घरी लेटर्स गेली होती, अतिशय मानाने देशासाठी पोटची पोरे देणाऱ्या आमच्या आई बापाला पासआउट परेड ला हजर राहयची "रिक्वेस्ट" केली गेली होती, now it was our job to put on a good show, अन शेवटी तो सोन्याचा दिवस उजाडला....

मला, सांगे ला, पुनीत ला अन समीर ला प्रैक्टिस झाल्यावर बड़े उस्ताद ने सांगितले

"तुम चार दौड़ के अपने गेस्ट हाउस जाओ और अपने पेरेंट्स की व्यवस्था ठीक करवाओ"

तो क्षण, रेलवे स्टेशन आठवले घरचे, बाबांचे शब्द,

"जा मागे वळून पाहू नकोस, निरोप घेणे कठीण होते...."

"नीट रहा जितका व्यायाम करशील तितके खात जा..."

गेस्टहाउस ला रूम नंबर 5 ला मी पोचलो तेव्हा मी चेंज करून आमचे ब्लेजर घातले होते, पॉश अश्या त्या खोलीत माझे बाबा अन आई अवघडून बसले होते, मी आत गेलो, अन आई ला म्हणालो

"आई, कशी आहेस ग!?"
लगबगीत ती अन बाबा उठले, मी सरळ पाय धरले त्यांचे तसे बाबा म्हणाले
"बाळ आज अण्णा असते तर खुप गर्व वाटला असता त्यांना" अन मी दोघांना कव घातली, कारण शब्द संपले होते!.
थोड़ी विचारपुस झाली तेव्हा मला समजले स्टेशन ला स्वतः शर्मा उस्ताद त्याना रिसीव करायला गेले होते, अत्यंत मानाने त्यांना आणले गेले होते, तो मान त्यांच्यासाठी मी कमवला आहे ही फीलिंग फार जबरदस्त होती.

थोडावेळ बोलत बसलो तसा हळूच दारात सांगे दिसला, त्याच्या मागोमाग पुनीत अन समीर

"मे आय कम इन बापूसाहेब?"

"अरे तुम लोग,आओ आओ"

आईबाबांच्या पाया पडले ते, मी ओळख करून दिली

"आई बाबा हे माझे भाऊ, हा समीर हरयाणा चा आहे, हा पुनीत कानपूर चा, हा नेमा सांगे हा सिक्किम चा बरका"

मोठ्या अप्रुपाने दोघे त्यांना बघत होते, बाबांनी हळूच विचारले

"सांगे ला हिंदी समजते न रे?"

गडगड़ाटी हसु आले मला तेव्हा पहिली मैत्री आठवली आमची!

"हो ! अहो तुमच्या माझ्यासारखा भारतीय आहे तो!"

मग ते लोक माझ्या मित्रांशी बोलत बसले, आई म्हणाली

"बेटा इसने किसीको परेशान नहीं किया ना"

"नहीं आंटीजी ये और हम सबको साथ में परेशान करते थे" समीर बोलला!

त्यांची व्यवस्था करुन मी बाकीच्या पेरेंट्स ना भेटलो, अन परत आपापल्या कामाला लागलो होतो

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सेरेमोनियल ड्रेस मधे तटबंदी मागे उभे होतो, अन गढ़ी च्या दारा सारखे ते मोठे दार उघडले, पुनीत चा खणखणीत आवाज उमटला

"परेडsssssssबाए सेsssss तेजsssss चलss" एक साथ कदम से कदम आम्ही बाहेर पडलो, अन विजिटर गैलरी मधल्या लोकांनी जल्लोष केला,

"परेडssss थमsssss" नेमक्या जागेवर आम्ही उभे होतो, तेवढ्यात चीफगेस्ट आले, अन पोडियम वर उभे राहिले, तेव्हा एक ओपन जिप्सी आली , त्यात गेस्ट, मागे अद्जुडेँट सर सोर्ड घेऊन उभे राहिले, मग आमच्या परेड चे निरिक्षण झाले, ते परत जागेवर गेले तेव्हा आम्ही एम्बुश वाले फॉलआउट होऊन मागच्या मागे चेंज करायला पोचलो होतो तेव्हा अद्जुडेन्ट सरांचा ओपनिंग एड्रेस सुरु होता, तो झाल्यावर सूत्रसंचालन करणारे विक्रम सर म्हणाले

"अब आपके सामने फ़ोर्स के कॉम्बैट स्किल्स का एक प्रेजेंटेशन होगा, प्रेजेंटेशन लीड कर रहे है ओसी बापुसहेब, साथ में है ओसी समीर सांगवान, ओसी तेजु गुरुंग, ओसी गिरीश यादव, ओसी किशोर उमरीकर, ओसी एस दिवाकर.

आम्ही आमची प्रत्यक्षिके सुरु केली, धावत येऊन धावा पोजीशन , ती घेतली की मग बेनट फाइटिंग चे वेगवेगळे हात अन शेवटी चार दिशाना तोंड करुन क्राउच पोजीशन मधे समीर गुरुंग अन्ना अन कीश्या त्या घेर्यात जमिनीवर क्राउच झालेला गिरीश अन मधे उभा मी , मी हाती आडवी राइफल घेऊन

"धावाssssssआsssआsssss"

केले तेव्हा समोरच्या तिघांनी फ्लेयर्स उघडली अन सुंदर तिरंगी धुर निघायला सुरुवात झाली, अन टाळ्याचा कड़कड़ाट झाला, आता आम्ही चेंज करुन येईस्तोवर विक्रम सर "कोर्स रिव्यु" देत होते, कोर्स कसा सुरु झाला, टीम्स ची प्रोग्रेस , काय शिकवले इत्यादी त्यांनी सांगितले तोवर आम्ही चेंज करून परत फॉलइन झालो होतो, फॉलइन होताच आम्हाला पुनीत ने विश्राम केले, परत सावधान केले अन गेस्ट सरांचा एड्रेस सुरु झाला,भारतापुढली बॉर्डर सिक्यूरिटी चैलेंजेज , प्रोब्लेम्स, फ़ोर्स ची ट्रेडिशन वगैरे सांगून झाल्यावर ते पोडियम ला उभे राहिले, आता एक एक ओसी ला बोलवुन स्टार्स अन त्याने जिंकलेले अवॉर्ड्स दिले जाऊ लागले, त्याच वेळी माझे नाव पुकारले गेले, विक्रम सर माझे "रिपोर्ट कार्ड" वाचत होते

"ओसी बापूसाहेब, आयडी नंबर xxxxx, मॅपरीडिंग फील्ड एक्सरसाइज के दौरान और रुटमार्च नाईट एक्सरसाइज के दौरान अद्वितीय नेतृत्वगुण के प्रदर्शन के लिए , अद्जुडेँट रिबन "

मी फॉल आउट झालो, मार्च करत गेस्ट कड़े आलो, सावधान करून एक कड़क सलूट घातला तितकाच कड़क रिप्लाई आला, बाजूला उभ्या बड़े उस्ताद ने मखमली ट्रे पुढे केला, त्यात असलेला स्टार्स चा छोटा डबा त्यांनी मला दिला मी तो नजर न ढळु देता परत उस्तादजी ला दिला मग रिबन दिली ती सुद्धा तशीच परत दिली. मग परत जाउन फॉलइन झालो , अन त्या सोनेरी दिवसाचा सुवर्ण क्षण आला, परत एकदा पुनीत चा आवाज गरजला

"परेडsssssss मंच के सामने से सलामी देते हुए आगे बढ़ेगाssss तेज चलssss"

पोलिस बैंड च्या "सारे जहाँ से अच्छा" वर आम्ही लयबद्ध कदम टाकत सलामी दिली, अन 3-3 च्या ओळित आस्तेकदम "अंतिम पग" ची टाइल क्रॉस केली, आजवर परेड ग्राउंड मधे येताजाता ती टाइल कोणीही क्रॉस करायची नाही असा कड़क दंडक होता, ती टाइल आजसाठी राखीव होती, ती आम्ही पार केली होती, सिविलियन आयुष्यातले शेवटचे पाऊल टाकून आम्ही आमच्या नव्या लाइफ चे पहिले पाऊल टाकले होते. झटपट आईबाबांनी त्यांना सुपुर्त केले गेलेले स्टार माझ्या खांद्यावर चढवले, अन बाबांनी खांद्यावर थाप मारली,

"जा शपथ घे, ट्रेनिंग पुर्ण कर" विलक्षण गर्वाने मी amphitheater ला पोचलो, तिथे आम्ही सावधान मधे उभे झालो, माधोमध विक्रमसर झेंडा घेऊन उभे होते, अन अद्जुडेँट साहेबांनी शपथ "अडमिनिस्टर" करायला सुरुवात झाली आम्ही त्यांच्या मागोमाग एक एक वाक्य बोलु लागलो,

***"In the name of the President of the Soverign Socialist Secular Democratic Republic of India....

.....till I draw my last breath"

ओथ घेऊन 4 सेकंड झाले असतील तोवर आम्ही अंतःप्रेरणेने एकाचवेळी विलक्षण ओरडा करत कॅप्स टॉस केल्या, तो शेवटचा क्षण होता , तो क्षण आम्हाला जणू सांगत होता,

"हा तुमचा indiscipline मधला शेवटचा क्षण, टोप्या उड़वा ओरडा, काय वाटेल ते करुन घ्या one last time in this life"

वर टॉस केलेल्या कॅप्स झेलून आम्ही परत डोक्यावर ठेवल्या अन आवेगाने एकमेकांना मिठ्या मारू लागलो!! एक एक क्षण आठवत होता आम्हाला

"बाई आमारा मग फ्लोर पे पड़ती"

"हैलो दोस्त मैं पुनीत"

"मेरा एक भाई है elder brother"

"सर हमसे नहीं होतायsssss"

अन असेच अगणित क्षण!!

त्यानंतर आम्ही आमच्या पेरेंट्स अन मित्रांच्या पेरेंट्स ना भेटलो, सगळ्यांचे पेरेंट्स गोल करून उभे असताना मधे आम्ही 9 पोरे होतो, मी ओरडलो

"ओसी रगड़ाssss" लगेच पोरांनी वाकुन् पुशप सुरु केल्या!!! 1 2 3 ..... 10

मग उभे राहून जल्लोष!! हे कौतिक पहायला आई वडला सोबत उस्तादजी ही उभे होते सगळे

त्यांना पाहताच आम्ही धावलो बड़े उस्ताद च्या पाया पडायला मी झेपावलो तो त्यांनी मला मधेच अडवले अन शेवटचा धड़ा दिला,
"अरे नहीं नहीं साबजी अब आप झुकना नहीं, कंधे पर स्टार्स है आपके, आपकी और आपके देश की शान है वो, आपके नागरिको का भरोसा है वो, झुकाना नहीं....."

असे म्हणत बड़े उस्तादजी अन इतर उस्तादांनी चक्क आम्हाला सलूट केले आम्ही विलक्षण अवघड़लो , तेव्हा बड़े उस्ताद पुढे बोलले

"....अब आप अफसर है साहब , आप पासआउट हो चुके है और हम उस्ताद लोग आपके जूनियर्स, ट्रेनिंग में कुछ बोल दिया हो तो यही ग्राउंड पे छोड़ कर जाइए साहब, मन छोटा नहीं करना, कड़े अफसर बनाने के लिए बोल भी कड़े रखने पड़ते है साहब...जय हिंद"

मला अरुणाचल ला पोस्टिंग मिळाले होते, बाकी लोकांना ही कुठे कुठे पोस्टिंग लागली होती,संध्याकाळी डिनर चा फक्कड़ इंतजाम होता पण घास उतरत नव्हता, डिनर नंतर आई बाबांना गेस्टहाउस ला सोडून आम्ही मेस ला जमलो, आज अधिकारी म्हणून राजरोस रम चे लार्ज घेऊन 9 लोक बसलो, शांतपणे घुटके घेत गप्पा केल्या अन आपापल्या खोल्यांत झोपलो, सकाळी लवकर मी आईबाबा सोबत निघणार होतो 10 दिवस घरी मग पोस्टिंग ला पळायचे होते. पुनीत , समीर, सांगे अन कीश्या संध्याकाळीच निघाले होते त्यांना सी ऑफ़ करताना आम्ही सगळे अनावर रडलो होतो, कारण ड्यूटी च्या नादात आता मित्र परत कधी भेटतील काही खरे नव्हते, सकाळी मी निघायच्या आधी मी गिल, मोसाय, गौड़ा, अण्णा, गुरुंग अन गिरीश ला असाच भेटलो, निग्रहाने पोरांना सांगितले गेट पर्यन्त येऊ नका, जिप्सी आली सामान लोड झाले, आई बाबा मागे बसले मी समोर , मेन गेट पाशी आलो तसे मी जिप्सी थांबवली , खाली उतरलो एकदा अकादमी डोळे भरून पाहिली, ओलसर डोळ्यांनी परत गाडी बसलो,गाडी स्टेशन कड़े निघाली तेव्हा मी डोळे मिटुन बसलो होतो, चेहऱ्यावर वारे लागत होते अन कानात शब्द घुमत होते

"मैं सुभेदार भरत नारायण चौधरी.....जात से जाट हूँ.....अब हम एकसाथ पैलेस जाएंगे"

आयुष्याचा एक विलक्षण काळ स्मृतीत सोनेरी अक्षरात छापला गेला होता, मी एक अधिकारी झालो होतो.

(लेखनसीमा) बाप्या


*** ती शपथ ते शब्द परमपवित्र असतात, ते एकदाच उच्चारायचे असतात नंतर ते उच्चारायचे लिहायचे नसतात, म्हणुन पुर्ण शपथ दिली नाहिए, क्षमस्व!.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापू ...बापू ... बापू .... !!!

सॅल्यूट सॅल्यूट सॅल्यूट !
अश्रु काढलेत तुम्ही...

तुमच्यात एक जबरा लेखक दडलेला आहे. त्याला मोठे करा हीच विनन्ती.
किती चित्रमयता , किती नाट्यमयता !!

बापरे,
वाचतानाच डोळ्यांतून पाणी कधी वहायला लागलं कळलं नाही.
काय हृदयस्पर्शी लिहीलंयत!
पूर्ण लेखमालेकरिता माझ्याकडून मानाचा मुजरा.

आता वेळ असल्यास सैन्याचे/अतिरीक्त फौजांचे प्रकार , प्रभाग त्यांचे कार्यं आणि अधिकार याबद्दल सविस्तर लिहाल का?

वाचतानाच डोळ्यांतून पाणी कधी वहायला लागलं कळलं नाही.
काय हृदयस्पर्शी लिहीलंयत!
पूर्ण लेखमालेकरिता माझ्याकडून मानाचा मुजरा.>> +११११......

अप्रतिम लेखमाला!

धन्यवाद बापूसाहेब!!!

आई शप्पथ! अर्ध वाचून झाल्यावरच स्क्रीन धूसर झाली. या भागाची आतुरतेने वाट बघत होते! फार प्रभावी लिहीलय!
तुम्हाला अनेक शुभेच्छा आणि एव्हढा सुंदर प्रवास (मोबाइल वरुन लिहून) आम्हाला घडवल्याबद्दल तुमचे आभार! Happy

बापुसाहेब एकदम जबरद्स्त...............!!!
जय जवान जय किसान...............!!!

मधेच डोळे भरून आले... पुढचं सगळं नुस्त्या कल्पनेनेच.
बापूसाहेब... फार फर श्रीमंत करून टाकलत आम्हाला...
तुम्हाला लाखो धन्यवाद.

एक अविस्मरणीय लेखमाला ..
अकादमी आणि तुमच्या आठवणीतील सुंदर काळाची सैर घडवून आणल्याबद्दल आभारी.. खरचं खुप सुंदर लिहिता .
लिहित राहा Happy

मायबोलीवर असल्याचा आज पुन्हा एकदा खूप अभिमान वाटला., म्हणूनच ईतके सर्वोत्त्म काहीतरी वाचायला मिळाले..
सर! पुन्हा पुन्हा कडक सॅल्यूट!!

अप्रतिम !! फार आवडली ही मालिका!
आता वेळ असल्यास सैन्याचे/अतिरीक्त फौजांचे प्रकार , प्रभाग त्यांचे कार्यं आणि अधिकार याबद्दल सविस्तर लिहाल का? >>> +१
या अकादमी मधे तुम्ही आलात त्या आधीची पार्श्वभूमी, निवडीची प्रोसेस, या पासिंग आउट परेडनंतर कोणती रॅन्क मिळते ? ते उस्तादजी आता ज्युनियर्स कसे वगैरे काही प्रश्न पडलेत!

रगडोत्तम भारती श्रीमान बापूसाहेब,

आमचा एक कडक्क सलाम आपल्या चरणी रुजू! काय प्रसंग रंगवलेत तुम्ही म्हणून सांगू. जणू डोळ्यासमोर घडताहेत. बंधुभाव म्हणजे काय हे सैनिकाकडूनच शिकायला पाहिजे. तुमच्या मातापित्यांनाही विनम्र वंदन.

त्या शपथेच्या मजकूराविषयी तुमच्या भावना जाणून आहे. तुम्हाला ती एकदाच घेऊन समजते. मात्र आम्हा नागरी लोकांच्या मनावर ती परतपरत सांगून बिंबवायला पाहिजे.

आ.न.,
-गा.पै.

जबरदस्त!! पास आऊटआपरेड आणि एकूणच सर्व प्रसंग वाचताना अंगावर रोमांच उभं राहिलं.

तुम्हाला एक कडक सॅल्यूट!!

जबरदस्त बापूसाहेब.. एक चित्रपट उभारलात डोळ्यासमोर ..

अंतिम भाग हे शीर्षक वाचूनच अरेरे वाटलेले.. पण यापुढचे पोस्टींग झाल्यानंतरचे अनुभवही असेच लिहाल .. वाट पाहतोय Happy

कडक..

बापूसाहेब काय बोलू ! मानाचा मुजरा तुम्हाला ..

अंतिम भाग हे शीर्षक वाचूनच अरेरे वाटलेले.. पण यापुढचे पोस्टींग झाल्यानंतरचे अनुभवही असेच लिहाल .. वाट पाहतोय >>>>>> +१११

खूप मस्त.. देशात नसल्यानं मागच्या वर्षी माझ्या भाच्याच्या एनडीए च्या पीओपीला जाऊ शकलो नाही. तुमच्या वर्णनातून थोडीफार कल्पना आली Happy

तीन वेळा उघडून वाचायला लागला मला हा लेख! दर वेळी डोळे भरून येत होते की पुढचं दिसेनासं होत होतं!
धन्यवाद इतकी सुंदर लेखमाला लिहून तुमच्या अकादमीतल्या दिवसांची ओळख करून दिल्याबद्दल!

Pages