आइस टी-Lemon-Honey Ice Tea with Mint Flavour

Submitted by अश्विनि-काजरेकर on 21 April, 2015 - 07:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य :
१ लिटर पाणी
३ चमचे चहा पावडर
१/४ कप मध
चवीप्रमाणे साखर
३ मोठे चमचे ताज्या लिंबाचा रस
७-८ पुदिना पाने
१०-१२ बर्फाचे क्युब्स

क्रमवार पाककृती: 

कृती :
१. पाण्यात साखर घालून पाणी उकळा. चहा पावडर घालुन पाणी एकदा मिनिट उकळून gas बंद करा.
२. चहा गळून घ्या आणि पूर्णपणे थंड होईपर्यंत थांबा.
३. लिंबाचा रस आणि मध घालून नीट ढवळून घ्या.
४. पुदिना पाने घालून ३-४ तास फ्रिज मध्ये ठेवा.
५. सर्व्ह करताना ग्लास मध्ये बर्फाचे तुकडे घालून वरून आइस टी ओता आणि मस्त एन्जॉय करा.

अधिक टिपा: 

टिप: पुदिना पानांच्या ऐवजी आलं किसून घातलं तरी मस्त स्वाद येतो.

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users