Submitted by सुनिधी on 19 April, 2015 - 10:17
पैशाच्या व्यवहाराबद्दल सरकारी रजिस्ट्रेशन करण्यासाठी पुण्यात MOU करायची आहे. त्याकरता योग्य वकील सुचवा. धन्यवाद.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुण्यात कुठे हवा आहे? एरिया
पुण्यात कुठे हवा आहे? एरिया कुठला?
बाणेर. एरीयाचे काही विशेष
बाणेर. एरीयाचे काही विशेष महत्व आहे का? कुठले वकील करावेत याचेपण नियम असतात का?
सुनिधी, ईमेल बघ.
सुनिधी, ईमेल बघ.
नाही एरियाचे काही नियम नाहीत
नाही एरियाचे काही नियम नाहीत आणि सगळे MOU रजिस्टर देखील करावे लागत नाहीत. पण जवळचा वकील सांगितला असता म्हणून विचारले. जवळचा वकील तुम्हाला pathlegal.in इथे मिळू शकेल.
पहाते, सिं. व विनिता. thx a
पहाते, सिं. व विनिता. thx a lot.
MOU च का? Agreement का
MOU च का? Agreement का नको?
MOU केले तर ते ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करावे लागते. (चू.भू.द्या.घ्या.)
करार (Agreement) १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर चालेल.
व्यवहारात कशाप्रकारे किती रक्कम अन्तर्भूत आहे यावर मजकूर तसेच रजिस्ट्रेशन फी वगैरे ठरेल.
वकिलामार्फत करणेच योग्य.
आम्हाला mou फक्त
आम्हाला mou फक्त acknowledgement (आम्ही ज्यांना पैसे दिलेत ते 'आम्ही सुनिधी यांचे इतकेइतके देणे लागतो व ते इतक्या तारखेला परत करु' यावर सही करणार आहेत. तर ही एमोयु फक्त notarized करावी की व्यवस्थित stamp duty भरुन रजिस्टर करावी?
वकील म्हणताहेत नोटरी चालते,
वकील म्हणताहेत नोटरी चालते, ते अशा भरपूर करतात. काहीच काळजी नाही, पण रजिस्टर पण करतील जर आम्ही सांगितले तर.
इथे केवळ माहिती म्हणुन विचारत आहे के नोटरीत नंतर (पैसे परत मिळण्यात अडचण आली तर) काही अडथळे येतात का? कोणाला अनुभव?
लिंबुटिंबु, सॉरी, आज तुमचा प्रतिसाद पाहिला. बरोबर, वकील करतील तेच करु पण नेमका प्रश्न आला. जरी ते म्हणताहेत काही काळजी नाही तरी कधीकधी प्रत्यक्ष वाईट अनुभवातुन गेलेल्यांकडुन जास्तीची माहिती मिळते म्हणुन विचारले.
तर ही एमोयु फक्त notarized
तर ही एमोयु फक्त notarized करावी की व्यवस्थित stamp duty भरुन रजिस्टर करावी?>>>>>>>
रजिस्ट्रेशन कराच.. नुसते नोटराईझ नको. पैशाचा मामला आहे. जितकी पेपर ट्रेल आणि सरकार दरबारी नोंद असेल तितके चांगले.
MOU केले तर ते ५०० रुपयांच्या
MOU केले तर ते ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करावे लागते. (चू.भू.द्या.घ्या.)
करार (Agreement) १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर चालेल.
>> नाही. आजकाल कोणत्याही कराराला किमान ५००/- (किंवा त्या करारावर येणारी स्टॅम्प ड्युटी यातली जी रक्कम जास्त) चा स्टॅम्प पेपर घ्यावा लागतो.
MOU केले तरीही ते किमान ५०० रुपये किंवा त्या करारावर येणारी स्टॅम्प ड्युटी यातली जी रक्कम जास्त तेवढ्या किमतीचा स्टॅम्प पेपर जोडावा लागतो.
तर ही एमोयु फक्त notarized
तर ही एमोयु फक्त notarized करावी की व्यवस्थित stamp duty भरुन रजिस्टर करावी?
>> ते संपुर्णपणे व्यवहारावर अवलंबून आहे.
तुमच्या व्यवहारात नोटरी पुरेशी आहे असं प्रथमदर्शनी वाटत असलं तरी किती रक्कम इन्व्हॉल्व्ड आहे यावरही अवलंबुन आहे.
पुढे कोर्टात केस वै. करावी लागली आणि स्टँप ड्युटी कमी भरलेली आहे हे लक्षात आले तर कोर्ट त्या वेळी ड्युटी भरुन केस फाईल करण्याची परवानगी देते.
पण रजिस्ट्रेशन असे ऐनवेळी होऊ शकत नाही. कारण समोरची पार्टी नंतर नकार देऊ शकते.
कुठले वकील करावेत याचेपण नियम
कुठले वकील करावेत याचेपण नियम असतात का?
>> नाही. पण शक्यतो त्या-त्या एरियातल्या वकिलाचे रोजचे येणेजाणे असल्याने सरकारी कार्यालयात त्यांची ओळख असते आणि काम पटकन होते. (प्रॅक्टिकल अॅस्पेक्ट).
थँक्स पियू, मनस्मी.
थँक्स पियू, मनस्मी.