खरेदीची लाट - 'अलि एक्स्प्रेस'

Submitted by दक्षिणा on 17 April, 2015 - 05:55

सध्या जो उठतो तो ऑनलाईन काही ना काही खरेदी करतोच करतो. फ्लिप्कार्ट, स्नॅपडिल सारख्या वेबसाईट्स तर बहुपरिचित आहेत.
त्यातला एक मोठा खजिना म्हणजे 'अलि एक्स्प्रेस' www.aliexpress.com या वेबसाईटवर काय मिळत नाही ते पहावं लागेल. (अर्थात सर्व काही मिळतं.)
ऑनलाईन खरेदी आणि आपण या धाग्यावर या वेबसाईटची ओळख झाली आणि मी बरिच खरेदी केली. थोडी प्रॉडक्ट्स रिसिव्ह झाली, बाकिच्यांच्या प्रतिक्षेत आहे.

एकूण या धाग्यावर आपण अलिवरून केलेली खरेदी, तिथले अनुभव. आपल्याला मिळालेल्या प्रॉडक्टस चे फोटो आणि त्याच्या लिंक्स देऊया. म्हणजे आपण खरेदी केलेलं एखादं प्रॉडक्ट इथे कुणाला आवडलं तर झटकन त्या लिंकवर जाऊन विकत घेता येईल. शिवाय मिळालेलं प्रॉडक्ट नेमकं कसं दिसतं ते ही कळेल.

अलिवर खरेदी करताना डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरलं तरी ओटिपी जनरेट न होता पैसे कट होतात. आत्तापर्यंत मला तरी अलिचा अनुभव उत्तम आहे. चला मग खरेदी शेअर करूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्षिणा,
अलिवर खरेदी करताना डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरलं तरी ओटिपी जनरेट न होता पैसे कट होतात. >>>>>
हो मलाही से अनुभव,,,+ बेंकेकडून येणारा transaction मेसेज मोबाईलवर आला नही.....:(
हे मात्र doubtfull आहे....

मझी खरेदी.....
http://www.aliexpress.com/snapshot/6607452666.html?orderId=66782961578216

पेमंट व्हेरिफिकेशन झले आहे....

माझे डेबिट कार्ड चालले काही प्रोब्लेम न येता. सध्या कमी कीमतीच्या ७-८ ऑर्डर टाकल्या आहेत. ज्वेलरी आणि पेन ड्राइव्ह नक्की घेण्यासारखी आहेत.
अगदी सुरुवातीला १ डॉलरची १२ फुलपाखरांचा सेट मागवला होता. तो आला २ दिवसापूर्वी. मस्त आहे.

१ टीबी चा पेनड्राइव्ह १३ डॉलर ला आहे, तो ऑर्डर करायच्या विचारात आहे.

@दक्षीणा - तुम्हाला कुठली प्रॉडक्ट आत्तापर्यंत मिळाली?